फ्रिजमध्ये चुकूनही ठेवू नका ही 5 फळं, आरोग्यावर होतो वाईट परिणाम

त्यामुळे अशी फळे फ्रिजमध्ये ठेवण्याचे जाणिवपूर्वक ठाळणे चांगले ठरेल. ही कोणती फळं आहेत त्यावर आपण एक लक्ष टाकणार आहोत.

जाहिरात
Read Time: 2 mins

list of Fruits That Should Not Be Refrigerated: बहुतेक लोकांना वाटते की फळं फ्रिजमध्ये ठेवल्याने ती जास्त काळ सुरक्षित राहतात. पण तज्ज्ञ सांगतात की प्रत्येक फळ फ्रिजमध्ये ठेवणे योग्य नाही. काही फळं अशी आहेत, ज्यांना फ्रिजमध्ये ठेवल्याने त्यांची पौष्टिक मूल्ये कमी होतात. शिवाय त्यांची चवही बिघडते. एवढंच नव्हे, काही वेळा ही फळं लवकर खराब होऊन आरोग्याला नुकसानही पोहोचवू शकतात. त्यामुळे अशी फळे फ्रिजमध्ये ठेवण्याचे जाणिवपूर्वक ठाळणे चांगले ठरेल. ही कोणती फळं आहेत त्यावर आपण एक लक्ष टाकणार आहोत. 

1 केळी फ्रिजमध्ये ठेवू नका
केळी हे असं फळ आहे जे कधीही फ्रिजमध्ये ठेवू नये. फ्रिजमध्ये ठेवल्याने केळीचा रंग काळा पडू लागतो. यात असलेली इथिलिन गॅस (Ethylene gas) आजूबाजूला ठेवलेल्या इतर फळांना पिकवण्याचं काम करते. म्हणून केळी नेहमी खोलीच्या सामान्य तापमानातच ठेवावी.

2. एव्होकॅडो खोलीच्या सामान्य तापमानावर ठेवा
जर कच्चा एव्होकॅडो फ्रिजमध्ये ठेवला तर तो लवकर खराब होतो. फ्रिजमध्ये ठेवल्याने एव्होकॅडो पिकण्याची प्रक्रिया थांबते. तर बाहेर ठेवल्यास तो नैसर्गिकरित्या पिकून खाण्यायोग्य बनतो.

3. कलिंगड आणि खरबूज कापण्याआधी बाहेरच ठेवा
खरबूज जोपर्यंत तुम्ही कापत नाही, तोपर्यंत ते फ्रिजबाहेरच ठेवावे. बाहेर ठेवल्याने त्यात गोडवा आणि चव वाढते. कापल्यानंतरच ते फ्रिजमध्ये ठेवणे योग्य आहे, जेणेकरून ते सुरक्षित राहतील.

Advertisement

4. सफरचंद फ्रिजमध्ये जास्त वेळ ठेवू नका
सफरचंदात असलेले नैसर्गिक एन्झाइम्स त्याला पिकवण्याचं काम करतात. जास्त वेळ फ्रिजमध्ये ठेवल्याने सफरचंद जास्त पिकते. यामुळे त्याची चव आणि पोत (texture) दोन्ही खराब होऊ शकतात.

5. आंबा आणि लिची फ्रिजपासून दूर ठेवा
आंबा (Mango) यात असलेले अँटीऑक्सिडंट्स फ्रिजमध्ये ठेवल्याने कमी होतात. परिणामी, त्याचे पोषक तत्व कमी होऊ लागतात. लिची (Litchi) हे एक नाजूक आणि रसदार फळ आहे. फ्रिजमध्ये ठेवल्याने ते आतून लवकर खराब होऊ लागते आणि चव बिघडते.

Advertisement

प्रत्येक फळ फ्रिजमध्ये ठेवणे योग्य नाही. केळी, आंबा, लिची, एव्होकॅडो, खरबूज आणि सफरचंद यांसारखी फळं खोलीच्या सामान्य तापमानावर जास्त आरोग्यदायी आणि चविष्ट राहतात. फळं योग्य प्रकारे ठेवल्याने केवळ त्यांची पौष्टिकताच टिकून राहत नाही, तर आरोग्यावरही सकारात्मक परिणाम होतो.