सणासुदीला शहरातील नागरिक दाबून खरेदी करणार, उलाढालीचा आकडा ऐकाल तर डोळे पांढरे होतील

Dussehra Diwali shopping : हा महिना सणांचा महिना आहे. या सणांच्या काळात देशभर जोरदार खरेदी होते.

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:


पितृपक्ष संपण्यास काही दिवस शिल्लक आहेत. आता संपूर्ण देशाला नवरात्र, दसरा आणि दिवाळीचे वेध लागले आहेत. हा महिना सणांचा महिना आहे. या सणांच्या काळात देशभर जोरदार खरेदी होते. हा काळ दुकानदार आणि उत्पादक कंपन्यांसाठी चांगलाच गडबडीचा असतो. वर्षातील याच कालखंडात ग्राहक त्यांचा खिसा सैल करतात. त्याचा फायदा करुन घेण्यासाठी प्रत्येकांचीच चढाओढ सुरु असते.

लोकल सर्कल्सनं याबाबत केलेल्या सर्वेक्षणाच्या नुसार 2024 मधील सणांच्या कालखंडात देशाच्या शहरी भागातील लोकं 22 बिलियन डॉलर (1.85 लाख कोटी रुपये) खर्च करणार आहेत. भारतीय लोकं कोणत्या गोष्टींवर खर्च करणार याचं विश्लेषणही लोकल सर्वेनं यामध्ये केलं आहे. देशातील 342 जिल्ह्यांमधील 49,000 प्रतिक्रियांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

किती जण करणार ऑनलाईन खरेदी?

गेल्या काही दिवसांमध्ये सणांच्या कालखंडात ऑनलाईन खरेदीचा कल वाढला आहे. या सर्वेक्षणानुसार या कालखडांंमध्ये जवळपास 13 टक्के जणांनी खरेदीसाठी ई-कॉमर्सचा उपयोग करणार असल्याचं स्पष्ट केलंय. तर 70 टक्के लोकांनी स्थानिक/रिटेल स्टोर्समधून खरेदी करण्यासा पसंती दर्शविली आहे. 

कशावर करणार जास्त खर्च?

या सर्वेक्षणानुसार सणासुदीच्या कालखंडा पूजा साहित्य तसंच सणांसाठी लागणाऱ्या किरणा मालाची खरेदी सर्वात जास्त करतात. या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 70 टक्के लोकांनी पूजा साहित्य खरेदी करणार असल्याचं सांगितलं. 64 टक्के जणांनी सणासाठी किराणा खरेदी करणार असल्याची माहिती दिली. याचाच अर्थ 10 पैकी 7 जण पूजा साहित्य आणि किराणा मालाची खरेदी करणार आहेत.

Advertisement

( नक्की वाचा : नवरात्रीमध्ये मिरवण्यासाठी बजेट नाही ? काळजी नको! कपडे ते ज्वेलरी इथं' सर्व मिळेल ' भाड्यानं! )
 

या सर्वेक्षणातील निष्कर्षानुसार

- जवळपास 40 टक्के लोकं घरांच्या सजावटीवर खर्च करतील.
- 38 टक्के लोकांनी ब्यूटी आणि फॅशन प्रॉडक्ट्सवर खर्च करण्याचं प्लॅनिंग केलं आहे.
- गॅझेट्सच्या खरेदीसाठी पैसे खर्च करणार असल्याची माहिती 22 टक्के लोकांनी दिली
- AC, कुलर, फ्रिज या घरातील मोठ्या वस्तुंची खरेदी करणार असल्याचं 18 टक्के लोकांनी सांगितलं.

किती खर्च करण्याची तयारी?

आगामी सणांच्या कालखंडात दर दोन पैकी एक व्यक्ती म्हणजे 50 टक्के लोकांची 10,000 रुपयांपेक्षा जास्त खर्च करण्याची तयारी आहे. 

या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या लोकांना तुम्ही किती पैसे खर्च करणार? तसंच हा खर्च तुमच्या नियमित खर्चापेक्षा वेगळा आहे का? हे प्रश्न विचारण्यात आले. त्यावर 26 टक्के लोकांनी या सणासाठी वेगळा खर्च करण्याचं प्लॅनिंग केलं नसल्याची माहिती दिली. 

( नक्की वाचा : नवरात्रीसाठी 400 रुपयांमध्ये मिळतील घागरा चोळी आणि जॅकेट, मुंबईतल्या 'या' मार्केटला लगेच द्या भेट! )
 

- 4 %  लोकांची 1,00,000 रुपयांपेक्षा जास्त तर तितक्याच लोकांची  50,000 ते 1,00,000 रुपयांच्या दरम्यान खर्च करण्याची तयारी आहे.
- 18%  लोकांचं बजेट 20,000 ते 50,000 रुपयांपर्यंत आहे. तर सर्वात जास्त 26% लोकांनी या सणांच्या कालखंडामध्ये 10,000-20,000 खर्च करण्याची प्लॅनिंग केली आहे. 
- 14% लोकं 5,000-10,000 दरम्यान खर्च करणार आहेत. तर 8 % लोकांचं कमाल बजेट  2,000 रुपये आहे. 


या सर्वेक्षणात 342 जिल्ह्यांमधील 49,000 जणांनी दिलेल्या उत्तरांचा समावेश आहे. ही उत्तर देणाऱ्यांमध्ये 61 1% पुरुष होते, तर 39% महिला होत्या. या सर्वेक्षणात सहभागी झालेले 44%  लोकं टियर-1 शहरांमधील होते. 34% टीयर - 2, तर  22% लोकं टी-4 आणि टीयर - 5 जिल्ह्यांमधील होते. 

Advertisement