जाहिरात

Mahatma Gandhi Death Anniversary :गांधीजींच्या पुण्यतिथीला शाळेत करा 'हे' भाषण, शिक्षकांसह सर्व होतील प्रभावित

Mahatma Gandhi Death Anniversary 2026 Speech :  राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी 30 जानेवारी हा दिवस हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो.

Mahatma Gandhi Death Anniversary :गांधीजींच्या पुण्यतिथीला शाळेत करा 'हे' भाषण, शिक्षकांसह सर्व होतील प्रभावित
Mahatma Gandhi Death Anniversary 2026 Speech : या निमित्तानं शाळेमध्ये गांधीजींच्या विचारांचे स्मरण करण्यासाठी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.
मुंबई:

Mahatma Gandhi Death Anniversary 2026 Speech :  राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी 30 जानेवारी हा दिवस हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो. या निमित्तानं शाळेमध्ये गांधीजींच्या विचारांचे स्मरण करण्यासाठी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. सत्य, अहिंसा आणि साधेपणाचा संदेश जगाला देणाऱ्या या महामानवाचा वारसा नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी हा कार्यक्रम एक महत्त्वाचे पाऊल ठरेल.

भाषणाचे 10 प्रमुख मुद्दे (Mahatma Gandhi Death Anniversary Speech Marathi Main Points )

1. महात्मा गांधींचे पूर्ण नाव आणि बालपण.
2. दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेदाविरुद्धचा लढा.
3. अहिंसेचे तत्त्वज्ञान आणि त्याचे जागतिक महत्त्व.
4. चंपारण्य आणि खेडा सत्याग्रहाची सुरुवात.
5. असहकार चळवळ आणि सविनय कायदेभंग.
6. दांडी यात्रा आणि मिठाचा सत्याग्रह.
7. स्वदेशीचा नारा आणि चरख्याचे महत्त्व.
8. अस्पृश्यता निवारण आणि सामाजिक एकता.
9. भारत छोडो आंदोलन (1942).
10. गांधीजींच्या विचारांची आजच्या काळातील गरज.

महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त संपूर्ण भाषण (Mahatma Gandhi Death Anniversary Marathi Speech )

सन्माननीय मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि माझ्या प्रिय मित्रांनो.

आज 30 जानेवारी, म्हणजेच आपल्या देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी. या दिवसाला आपण हुतात्मा दिन म्हणूनही ओळखतो. मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी पोरबंदर येथे झाला, पण त्यांचे कार्य केवळ एका गावाबद्दल किंवा देशाबद्दल मर्यादित नव्हते, तर ते संपूर्ण जगासाठी मार्गदर्शक ठरले.

(नक्की वाचा : Economic Survey: पैसेही कमावणार आणि निसर्गही जपणार! आर्थिक सर्वेक्षणात पहिल्यांदाच पर्यावरणावर मोठा 'डाव' )

गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेत असताना वर्णभेदाचा जवळून अनुभव घेतला आणि तिथेच त्यांनी अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी 'सत्याग्रह' हे शस्त्र शोधले. भारतात परतल्यानंतर त्यांनी चंपारण्य, खेडा आणि अहमदाबाद येथील आंदोलनांमधून सामान्य माणसाला संघटित केले. त्यांनी देशाला शिकवले की, शस्त्र न उचलताही अहिंसेच्या मार्गाने मोठे साम्राज्य नमवता येते.

1930 मधील दांडी यात्रा हे त्यांच्या जिद्दीचे सर्वात मोठे उदाहरण आहे. केवळ मीठ उचलून त्यांनी ब्रिटीश सत्तेचा पाया हादरवून टाकला. गांधीजी केवळ राजकीय नेते नव्हते, तर ते एक समाजसुधारक होते. त्यांनी अस्पृश्यतेविरुद्ध लढा दिला, ग्रामस्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि स्वदेशी वस्तूंचा वापर करण्याचा आग्रह धरला. चरखा हे केवळ सूत कातण्याचे यंत्र नव्हते, तर ते स्वावलंबनाचे प्रतीक होते.

आजच्या जगात जिथे हिंसा आणि द्वेष वाढत आहे, तिथे गांधीजींचे सत्य आणि अहिंसेचे विचार अधिक प्रासंगिक वाटतात. "माझे जीवन हाच माझा संदेश आहे," असे म्हणणाऱ्या या महात्म्याने देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला. 30 जानेवारी 1948 रोजी त्यांची प्राणज्योत विझली, पण त्यांचे विचार आजही आपल्यात जिवंत आहेत. आपण सर्वांनी त्यांच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करूया, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.

जय हिंद!
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com