Shardiya Navratri Auspicious Items: नवरात्री 2025 मध्ये तुम्हीला जर सुख-समृद्धी प्राप्त करून घ्यायची असेल तर काही खास गोष्टी तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरू शकतात. हिंदू धर्मात नवरात्रीचे 9 दिवस देवी दुर्गाला समर्पित आहेत. या दिवसांत देवी घरात येते. आपल्या भक्तांना भरभरून आशीर्वाद देते, असं म्हणतात. पण तुम्हाला माहित आहे का, नवरात्रीच्या या दिवसांत काही खास गोष्टी घरात आणल्यास तुमचं नशीब चमकू शकतं. तुमची भरभराट होवू शकते. त्यामुळेच घरात सुख समृद्धी नांदावी यासाठी या गोष्टी खूपच महत्वाच्या मानल्या जातात.
या गोष्टी घरात आणा आणि नशीब बदला
शंख:
शंख घरात सकारात्मक ऊर्जा आणतो. नवरात्रीत शंख विकत आणून तो दररोज वाजवा. यामुळे घरातलं भांडण-तंटण दूर होऊन सुख-शांती येते. शंखाला देवी लक्ष्मीचं रूप मानलं जातं. त्यामुळे जिथे शंख असतो, तिथे लक्ष्मी कायम वास करते.
श्रीयंत्र:
जर तुम्हाला आर्थिक अडचणी असतील, तर नवरात्रीत श्रीयंत्र घरात आणून त्याची पूजा करा. यामुळे तुमचे सगळे आर्थिक प्रश्न सुटतील आणि घरात कधीही पैशांची कमी पडणार नाही.
मोरपंख:
मोरपंख हे खूप शुभ मानलं जातं. घरात मोरपंख ठेवल्याने ज्ञान आणि सकारात्मकता वाढते. नवरात्रीत मोरपंख आणून त्याला ईशान्य दिशेच्या पूजाघरात ठेवा. यामुळे घरातली नकारात्मक ऊर्जा दूर होते.
तुळस आणि केळीचं रोप:
नवरात्रीत तुळस आणि केळीचं रोप घरात लावणं खूप फायदेशीर आहे. तुळस लावल्याने वास्तुदोष दूर होतात, तर केळीचं रोप तुमच्या घरात सौभाग्य आणतं.
इतर काही खास गोष्टी:
तुम्ही नवरात्रीत बछड्याला दूध पाजणाऱ्या गाईची मूर्ती किंवा देवी-देवतांचे फोटो असलेलं नाणं घरी आणू शकता. यामुळेही तुमचं नशीब उजळेल, असं मानलं जातं.
(येथे दिलेली माहिती सामान्य मान्यता आणि माहितीवर आधारित आहे. एनडीटीव्ही याची पुष्टी करत नाही.)