Navratri Fast: नवरात्रीचा उपवास कधी सोडाल? जाणून घ्या शुभ वेळ अन् योग्य पद्धत

ज्योतिषांच्या मते तुम्ही अष्टमी, नवमी किंवा दशमीला उपवास सोडत आहात, तर त्या दिवशी देवी दुर्गा आणि तिच्या रूपांची पूजा करावी.

जाहिरात
Read Time: 2 mins

नवरात्र उत्सव सर्वत्र उत्साहात साजरा होत आहे. याच नवरात्रात उपवास धरले जातात. आश्विन महिन्यात शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून ते अगदी दशमीपर्यंत नवरात्रीचा उपवास असतो. या वर्षी मात्र तृतीया 2 दिवस असल्यामुळे नवरात्र 10 दिवसांची आहे. या काळात देवी दुर्गा व तिच्या नऊ रूपांची पूजा होते. शिवाय उपवास ही धरला जातो. 22 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या काळात नवरात्र आहे. या नवरात्रात उपवास सोडण्याची योग्य वेळ कोणती याबद्दल लोकांमध्ये अनेक समज आहेत. हिंदू धर्मात उपवास सोडणे आवश्यक गरजेचे असते. तसे केल्यानंतरच तुमचा उपवास पूर्ण झाला असे समजले जाते. शारदीय नवरात्रीत उपवास कधी सोडला जातो. त्यासाठी योग्य वेळ कोणतही आहे हे आपण समजून घेणार आहोत. 

नवरात्राचा उपवास नवमी संपल्यानंतर आणि दशमी सुरू झाल्यावर सोडावा, हीच योग्य वेळ आहे.  याचाच अर्थ नवव्या दिवसाच्या समाप्तीनंतर दहाव्या दिवशी नवरात्रीचा उपवास सोडणे अधिक चांगले मानले जाते. म्हणून नवव्या दिवसाच्या समाप्तीनंतरच उपवास सोडावा असेही सांगितले जाते. त्यामुळे त्याच दिवशी उपवास सोडावा. ही परंपरा  निर्णयसिंधु या सारख्या धर्मग्रंथांमध्ये सांगितली आहे. उपवास नवमीपर्यंतत करावा असं ही सांगितलं जातं. तोच उपवास पूर्ण उपवास समजला जातो. 

नक्की वाचा - Happy Dussehra 2025 Wishes: रावण नव्हे रामासारखे वागण्याची प्रतिज्ञा घ्या, दसरा सणाच्या खास शुभेच्छा पाठवा

दशमीला नवरात्रीचा उपवास सोडणं हे सर्वांत शुभ मानले जाते. म्हणून 2 ऑक्टोबरला सकाळी सव्वा सहानंतर कधीही उपवास तुम्ही  सोडू शकता. शिवाय जर तुम्हाला अष्टमी तिथीला कन्येची पूजा केल्यानंतर उपवास सोडायचा असेल, तर अष्टमी तिथीच्या संध्याकाळी सहा वाजून सहा मिनीट या नंतर तुम्ही उपवास सोडू शकता. जर तुम्हाला नवमीचा उपवास सोडायचा असेल, तर नवमी तिथीच्या संध्याकाळी सहा वाजून सहा मिनीटांनी  सुरू होईल आणि 1 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सात वाजेपर्यंत चालेल. त्यानंतर तुमचा उपवास सोडण्यास तुम्ही मोकळे आहात. 

नक्की वाचा - Dussehra 2025: यंदा दसरा कधी आहे, 1 की 2 ऑक्टोबर? योग्य तारीख आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या

Advertisement

ज्योतिषांच्या मते  तुम्ही अष्टमी, नवमी किंवा दशमीला उपवास सोडत आहात, तर त्या दिवशी देवी दुर्गा आणि तिच्या रूपांची  पूजा करावी. शिवाय नकळत झालेल्या चुकांसाठी माफी मागायची असं ही ज्योतिष सांगतात. त्यानंतर भात खाऊन उपवास सोडावा हा उत्तम मार्ग उपवास सोडण्याचा समजला जातो. पुढे  तुम्ही प्रसादाची खीर, हलवा, पुरी आणि इतर गोडधोड पदार्थ   खाऊ शकता. त्यातून तुमचा उपवास सुटेल. उपवास सोडताना एक खास काळजी घ्या. ज्या वेळी उपवास सोडाल त्यात  लसूण-कांदा खाऊ नका. हा  उपवास फक्त देवीला दाखवलेल्या प्रसादानेच सोडा.