Paush Bhagwat Ekadashi 2025 Date: विश्वाचे रक्षक मानले जाणारे भगवान विष्णू यांची कृपा मिळवण्यासाठी एकादशीचा व्रत करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. भगवान विष्णू यांची मनोभावे पूजा केल्यास जीवनातील सर्व दुःख दूर होऊन इच्छा पूर्ण होतात,असेही म्हणतात. पौष महिन्यातील यंदाची पुत्रदा एकादशी 30 डिसेंबर साजरी करण्यात आली. वैष्णव परंपरेनुसार याच एकादशीचे म्हणजे भागवत एकादशीचे व्रत कोणत्या दिवशी करावे, 31 डिसेंबर की 1 जानेवारी 2026 रोजी? याबाबत तुमचाही गोंधळ झाला असेल तर ही माहिती शेवटपर्यंत वाचा....
When Is Paush Bhagwat Ekadashi 2025 On 31st December Or 1st January 2026
पौष महिन्यातील पुत्रदा स्मार्त एकादशी 30 डिसेंबर रोजी साजरी करण्यात आली, पुत्रदा एकादशी व्रताचे पारण 31 डिसेंबर रोजी करावे.
भागवत एकादशी कधी आहे? | When Is Paush Bhagwat Ekadashi 2025
वैष्णव परंपरेनुसार पौष महिन्यातील एकादशीचे व्रत 31 डिसेंबर पाळले जाईल.
भागवत एकादशी 2025 व्रताचे फायदे | Paush Bhagwat Ekadashi 2025 Vrat Significance
- मनाला शांतता लाभते.
- आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती होते.
1 जानेवारी 2026 रोजी सकाळी 7.12 वाजेपासून ते सकाळी 9.24 वाजेदरम्यान व्रताचे पारण करू शकता. या शुभ मुहूर्तावर व्रताचे विधीवत पारण करावे.
ज्योतिषी श्रीकेतन कुलकर्णी यांनी काय सांगितलंय?- एकादशीच्या दिवशी श्रीसूक्त आणि पुरुष सूक्ताचे पठण करावे.
- ज्योतिषी श्रीकेतन कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार एकादशीच्या दिवशी संध्याकाळच्या वेळेस घरातील बाळकृष्णाच्या मूर्तीचा दूध, पाणी आणि पंचामृताने अभिषेक करावा.
- बाळकृष्णाच्या मूर्तीस केलेल्या अभिषेकाचे तीर्थ सर्वांना द्यावे.
(नक्की वाचा: Paush Putrada Ekadashi 2025 Paran Muhurat: पौष पुत्रदा एकादशी व्रत पारणाविना अपूर्णच, शुभ मुहूर्त आणि विधी वाचा)
भागवत एकादशीचे व्रत कसे करावे? | Paush Bhagawat Ekadashi 2025 Vrat | December 2025 Month Ekadashi- पहाटे सूर्यादयापूर्वी उठून स्नान-ध्यान करावे.
- एकादशीचे व्रत विधीवत करण्याचा संकल्प करावा.
- चौरंगावर पिवळ्या रंगाचे वस्त्र अंथरावे आणि भगवान विष्णूंची मूर्ती स्थापित करावी.
- भगवान विष्णूंची पूजा करून आवडीचा नैवेद्य अर्पण करावा.
- भगवान विष्णूंच्या कथेचे पठण करावे, आरती-प्रार्थनाही करावी.
- प्रसादाचे वाटप करावे
- दुसऱ्या दिवशी व्रताचे शुभ मुहूर्तावर पारण करावे.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
