- चहा बनवताना प्रथम पाणी गरम करून त्याला चांगली उकळी येण्याची वाट पाहावी, नंतरच चहा पावडर टाकावी
- आले किंवा वेलची असल्यास ती पाण्यात उकळताना टाकावी जेणेकरून चहाचा अर्क नीट उतरतो
- चहा पावडर पाच मिनिटे उकळल्यानंतर साखर टाकावी आणि साखर पूर्ण विरघळल्यावर दूध घालावे
Perfect Tea Recipe: भारतात चहा हे केवळ एक पेय नसून तो अनेकांच्या भावनेचा विषय आहे. कडक चहा, आले-वेलची चहा अशा विविध आवडी प्रत्येकाच्या असतात. मात्र, एक 'परफेक्ट' चहा बनवण्यासाठी साहित्याचा क्रम अत्यंत महत्त्वाचा असतो. अनेकजण दूध, पाणी आणि साखर एकत्र उकळतात, पण यामुळे चहाची खरी चव निघून जाते. चहा बनवणे ही एक कला आहे. पण अनेकदा चुकीच्या क्रमाने साहित्य टाकल्यामुळे चहाचा मूळ स्वाद हरवतो. उत्तम चहा बनवण्यासाठी 'स्टेप बाय स्टेप' पद्धत फॉलो करणे आवश्यक आहे.
योग्य क्रम काय असावा?
1. पाणी आणि उकळी:
- चहा बनवण्यासाठी सर्वप्रथम पाणी गरम करायला ठेवावे. पाण्याला चांगली उकळी आल्यावरच त्यात चहा पावडर टाकावी. यामुळे चहाचा अर्क पाण्यात नीट उतरतो. जर तुम्हाला आले किंवा वेलची टाकायची असेल, तर ती याच वेळी टाकावी.
2. साखर की दूध?:
- चहा पावडर 5 मिनिटे उकळल्यानंतर त्यात साखर टाकावी. साखर पूर्णपणे विरघळली की मगच सर्वात शेवटी दूध टाकावे.
3. मंद आचेवर शिजवणे:
- दूध टाकल्यानंतर चहा पुन्हा 5 मिनिटे मंद आचेवर उकळू द्यावा. जेव्हा चहाला गडद रंग येतो, तेव्हा गॅस बंद करावा. या पद्धतीमुळे चहाचा स्वाद आणि सुगंध अधिक काळ टिकून राहतो.
अशा प्रकारे बनवलेला चहा तुम्ही बिस्किट किंवा तुमच्या आवडत्या स्नॅक्ससोबत घेऊ शकता. ही छोटीशी सुधारणा तुमच्या चहाचा अनुभव पूर्णपणे बदलून टाकेल.अनेकांचा दिवस चहाचा कप हातात घेतल्याशिवाय सुरू होत नाही. पण चहाची चव बिघडली की पूर्ण मूड जातो. चहा कडक आणि चविष्ट व्हायचा असेल, तर तो बनवण्याची एक खास ट्रिक आहे. 99.9 टक्के लोकांना चहामध्ये आधी काय टाकावे हेच माहित नसते, त्यामुळे चहा कधी पाणीचट तर कधी जास्त गोड लागतो. वरिल प्रमाणे जर चहा केला तर तो नक्कीच परफेक्ट बनतो.