Rakshabandhan 2024 : श्रावण महिन्याची सुरुवात यंदा सोमवारनं झाली आहे. तसंच शेवटच्या दिवशी देखील सोमवार आहे. श्रावण महिन्यात कुमारिका तसंच महिला महादेवाची (lord shiva) उपासना करतात. मनासारखा जोडीदार मिळावा म्हणून त्या सोमवारचं व्रत करतात. यंदा श्रावण महिन्यात पाच सोमवार आहेत. 19 ऑगस्ट रोजी देखील श्रावणी सोमवार असून त्याच दिवशी रक्षाबंधनाचा (Rakshabandhan) सण देखील आहे. त्यामुळे 19 ऑगस्ट रोजी रक्षाबंधानाच्या दिवशी श्रावणी सोमवारचा उपवास करावा की नाही याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
19 ऑगस्टला असलेल्या श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी संस्कृत दिवस, नारळी पौर्णिमा, राखी पौर्णिमा आणि गायत्री जयंतीचा उत्सव आहे. हा एक दुर्मीळ योग आहे. ज्योतिषाचार्यांनी दिलेल्या माहितीनुसार रक्षा बंधनाच्या कोणताही उपवास करता येतो. तुम्ही त्या दिवशी श्रावणी सोमवारचा उपवास करण्यात काहीही अडचण नाही.
रक्षाबंधनाचा मुहूर्त कधी?
रक्षाबंधन 19 ऑगस्ट रोजी आहे. त्या दिवशी सकाळी 3.44 मिनिटांनी हा सण सुरु होईल. रात्री 11.55 वाजता हा सण समाप्त होईल. यावर्षी राखी बांघण्यासाठी कोणताही शुभ मुहूर्त नाही. कारण त्या काळात भद्रकाळ आहे. भद्रकाळाची वेळ पहाटे 5.30 ते दुपारी 1.32 पर्यंत आहे. तुम्हाला राखी बांधायची असेल तर ती भ्रदकाळाच्या नंतर बांधा. राखी बांधण्याची वेळ दुपारी 1.32 ते संध्याकाळी 4.20 पर्यंत आहे.
ट्रेंडिंग बातमी - जगन्नाथ मंदिराचे चारही दरवाजे उघडले, मंदिरातील 22 पायऱ्यांचं रहस्य माहिती आहे का?
श्रावणी सोमवारचा उपवास का करतात?
श्रावण महिना शंकर आणि पार्वतीशी संबंधित आहे. पौराणिक कथांनुसार या महिन्यात पार्वती मातेनं महादेवाला प्रसन्न करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली. त्यांनी हे व्रत केलं होतं. याच कारणामुळे श्रावण महिना महादेवाचा अतिशय आवडता महिना मानला जातो. या महिन्यात भक्त मंदिरात जाऊन शिवलिंगावर जलाभिषेक करतात. फुलं अर्पण करतात. तसंच आपली मनोकामना पूर्ण व्हावी यासाठी महादेवाचा आशीर्वाद मागतात.
स्पष्टीकरण : ही माहिती सामान्य ज्ञान आणि समजुतींवर आधारित आहे. NDTV मराठी याबाबत कोणतीही हमी देत नाही.