- धार्मिक विधींमध्ये कांदा आणि लसूण यांचा वापर टाळला जातो
- लसूण आणि कांदा शरीरात उष्णता निर्माण करतात आणि कामुक ऊर्जा वाढवण्यास कारणीभूत ठरतात
- साधू, वैष्णव आणि दीक्षित ब्राह्मण लसूण-कांदा न खाण्याचे कारण भक्तीमार्गावर स्थिर राहणे आहे
धार्मिक विधी, देवपूजा आणि नैवेद्य तयार करताना आपण कांदा (Onion) आणि लसूण (Garlic) यांचा वापर टाळतो. व्रत-वैकल्ये किंवा कोणत्याही शुभ कार्यासाठी बनवलेल्या आहारातही यांचा समावेश केला जात नाही. यामागे केवळ धार्मिक मान्यताच नाहीत, तर काही विशिष्ट गुणधर्मांशी संबंधित कारणेही आहेत. धार्मिक दृष्टिकोनातून, लसूण आणि कांदा 'राजसिक' आणि 'तामसिक' गुणधर्म वाढवतात. ज्यामुळे व्यक्तीच्या इच्छा-आकांक्षा तीव्र होतात आणि इंद्रियांवरचे नियंत्रण राखणे कठीण होते. मांसाहारी उत्पादने नसतानाही, त्यांचा मानवी स्वभावावर (Mode) मांसाहारासारखाच परिणाम होतो, असे मानले जाते.
नक्की वाचा - Home Remedies: पांढरे केस काळे करण्यासाठी लावा 'हे' तेल, काही दिवसातच होतील काळेभोर केस
राजसिक आणि तामसिक गुण
लसूण आणि कांदा हे तामसिक अन्न मानले जाते आणि त्यांचा संबंध शरीरातील कामुक ऊर्जा (Sensual Energy) वाढवण्याशी जोडला गेला आहे. तसेच, हे पदार्थ सेवन केल्याने शरीरात उष्णता (Heat) निर्माण होते, असेही मानले जाते. याव्यतिरिक्त, कांदा आणि लसूण यांचा समावेश 'रजोगुणी' पदार्थांमध्ये केला जातो. याचा अर्थ असा की हे खाद्यपदार्थ व्यक्तीला त्यांच्या इच्छांवरचे नियंत्रण गमावण्यास प्रवृत्त करू शकतात, ज्यामुळे प्राथमिक गरजा आणि इच्छा यांमध्ये फरक करणे व्यक्तीला कठीण होते.
साधना आणि सेवेतील महत्त्व
साधक किंवा साधू, तसेच वैष्णव आणि दीक्षित ब्राह्मण लसूण-कांदा खात नाहीत. कारण त्यांचे मुख्य लक्ष्य सांसारिक इच्छा पूर्ण करणे नसून, आपल्या भक्तीमार्गावर स्थिर राहणे आणि देवांच्या विग्रह सेवांमध्ये (Idol Worship) समर्पित राहणे हे असते. त्यामुळे, या पदार्थांनी तयार केलेला स्वयंपाक देवतांना अर्पण करणे योग्य मानले जात नाही.
पौराणिक कथा
वेदांनुसार, लसूण आणि कांदा खाणाऱ्या व्यक्तीचे शरीर मजबूत होते, पण त्याची बुद्धी राक्षसांसारखी सांसारिक आणि अशुद्ध होते. यामागे एक कथा सांगितली जाते. राहू-केतूने फसवणूक करून अमृत प्राशन केले, तेव्हा भगवान विष्णूंनी सुदर्शन चक्राने त्यांचे मस्तक धडापासून वेगळे केले. त्यावेळी राहूची लाळ (पांढरी) आणि केतूच्या रक्ताचे (लाल) काही थेंब पृथ्वीवर पडले. या थेंबांच्या मुळांपासूनच कांदा आणि लसणाची उत्पत्ती झाली. म्हणूनच हे पदार्थ देवाच्या नैवेद्यात वापरले जात नाहीत.