लिंबू हे व्हिटॅमिन सी चा खजिना आहे हे सर्वांनाच माहिती आहे. मात्र, लिंबामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम सारखे महत्त्वाचे मिनरल्स देखील आढळतात. या सर्व पोषक तत्वांच्या एकत्रितपणामुळे लिंबू शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. उन्हाळ्यात लिंबू पाणी पिऊन शरीराला थंडावा आणि ऊर्जा मिळते. परंतु थंडीत लिंबू पाणी पिऊ शकतो का, असा प्रश्न अनेकांना पडतो. तज्ज्ञांनुसार, योग्य पद्धतीने सेवन केल्यास थंडीतही लिंबू पाणी पिणे आरोग्यासाठी फायद्याचे ठरू शकते.
थंडीत लिंबू पाणी कसे प्यावे?
थंडीच्या दिवसांत लिंबू पाणी घ्यायचे असल्यास, ते कोमट पाण्यात मिसळून प्यावे. तसेच, सकाळी लवकर न पिता, 10 ते 11 वाजेच्या दरम्यान घ्यावे. जेव्हा हवामान थोडे बरे असते, तेव्हा ते पिणे योग्य ठरते.
फायदे:
लिंबू पाणी शरीराला डिटॉक्स (Detox) करण्यास मदत करते. त्यामुळे शरीरात साचलेले विषारी पदार्थ (Toxins) बाहेर पडतात. थंडीत अनेकदा बिघडलेल्या पचनसंस्थेसाठी लिंबू पाणी खूप उपयुक्त आहे. ते पचनाच्या समस्या दूर करण्यास मदत करते. यामुळे चयापचय (Metabolism) क्रिया सुधारते. ज्यामुळे वजन कमी (Weight Loss) होण्यास मदत मिळते. लिंबू पाणी त्वचेला आतून नैसर्गिकरित्या चमकदार बनवते.
तोटे:
लिंबू फायद्याचे असले तरी त्याचे अतिसेवन हानिकारक ठरू शकते. थंडीत जास्त प्रमाणात लिंबू पाणी पिल्यास दातांमध्ये संवेदनशीलता (Sensitivity) वाढू शकते. यामुळे आम्लपित्त (Acidity) किंवा पोटाशी संबंधित समस्या वाढू शकतात. अतिसेवनामुळे सर्दी-पडसे आणि घसा खवखवणे (Sore Throat) अशा समस्याही निर्माण होऊ शकतात. त्यामुळे याचे सेवन मर्यादित ठेवावे.