Swami Vivekananda Jayanti : स्वामी विवेकानंदांच्या स्टाईलमध्ये द्या हे स्पीच; 10 पॉईंट्स जे तुमचं भाषण गाजवतील

Swami Vivekananda Jayanti 2026 Speech : भारताचे महान सुपुत्र आणि आध्यात्मिक क्रांतीचे जनक स्वामी विवेकानंद यांची जयंती 12 जानेवारी रोजी देशभरात साजरी केली जाते.

जाहिरात
Read Time: 3 mins
Swami Vivekananda Jayanti Speech : स्वामी विवेकानंदांची जयंती आपण 'राष्ट्रीय युवा दिन' म्हणून साजरा करतो
मुंबई:

Swami Vivekananda Jayanti 2026 Speech : भारताचे महान सुपुत्र आणि आध्यात्मिक क्रांतीचे जनक स्वामी विवेकानंद यांची जयंती 12 जानेवारी रोजी देशभरात साजरी केली जाते. हा दिवस आपण राष्ट्रीय युवा दिन म्हणून उत्साहात साजरा करतो. स्वामी विवेकानंदांनी दिलेला 'उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका' हा संदेश आजही कोट्यवधी तरुणांना प्रेरणा देणारा ठरत आहे. शाळेतील विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या जीवनातील तत्त्वज्ञान आणि कार्याचा परिचय करून देणारे हे भाषण त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची नवी ओळख करून देईल.

भाषणासाठी 10 प्रमुख मुद्दे ( Swami Vivekananda Jayanti Speech Marathi, Key Points)

1. स्वामी विवेकानंद यांचा जन्म आणि बालपण (नरेंद्र ते विवेकानंद).
2. त्यांचे गुरु रामकृष्ण परमहंस यांच्यासोबतची भेट.
3. 1893 मधील ऐतिहासिक शिकागो धर्मपरिषद.
4. 'उठा, जागे व्हा' हा तरुणांना दिलेला मंत्र.
5. भारतीय संस्कृतीचा जागतिक स्तरावर प्रचार.
6. चारित्र्यनिर्मिती आणि शिक्षणाचे महत्त्व.
7. मानव सेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीद.
8. एकाग्रता आणि ध्येयवादाचे महत्त्व.
9. रामकृष्ण मिशनची स्थापना.
10. आधुनिक भारताच्या निर्मितीत विवेकानंदांचे योगदान.


( नक्की वाचा : Swami Vivekanand : देशभरातून प्रत्येकी 1 रुपया गोळा करुन कसं उभं राहिलं विवेकानंदांचे शिलास्मारक? )
 

स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त शाळेत करण्यासाठी भाषण (Swami Vivekananda Jayanti Bhashan In Marathi)

आदरणीय मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि माझ्या लाडक्या मित्र-मैत्रिणींनो,

आज 12 जानेवारी, म्हणजेच संपूर्ण भारताला आपल्या विचारांनी नवी दिशा देणारे महापुरुष स्वामी विवेकानंद यांची जयंती. हा दिवस आपण 'राष्ट्रीय युवा दिन' म्हणून साजरा करतो. विवेकानंदांचा जन्म १८६३ मध्ये कोलकाता येथे झाला. त्यांचे बालपणीचे नाव नरेंद्र होते. लहानपणापासूनच ते अत्यंत कुशाग्र बुद्धीचे आणि जिज्ञासू वृत्तीचे होते. 'देव कुठे आहे?' हा प्रश्न त्यांना नेहमी पडायचा, ज्याचे उत्तर त्यांना त्यांचे गुरु रामकृष्ण परमहंस यांच्याकडून मिळाले.

विवेकानंदांचे नाव घेताच डोळ्यांसमोर उभी राहते ती 1893 ची शिकागो येथील जागतिक धर्मपरिषद. जेव्हा त्यांनी 'अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनींनो' असे म्हणून भाषणाची सुरुवात केली, तेव्हा संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमले होते. त्यांनी पाश्चात्य जगाला भारतीय संस्कृती आणि वेदांताची खरी ओळख करून दिली. त्यांनी केवळ धर्मावरच नव्हे, तर मानवाच्या उद्धारावर अधिक भर दिला.

Advertisement

( नक्की वाचा : 3000 वाढपी, 100 ट्रॅक्टर्सचा ताफा, लाखो भाविकांचा जनसागर, हिवरा आश्रमातील महापंगतीचे नियोजन पाहून व्हाल थक्क )

त्यांच्या मते, शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे, तर माणसाच्या चारित्र्याचा विकास होय. ते म्हणायचे की, तुम्हाला जर स्वतःवर विश्वास नसेल, तर तुम्ही देवावरही विश्वास ठेवू शकत नाही. आत्मविश्वास हाच यशाचा खरा मार्ग आहे. आजच्या काळात जेव्हा आपण छोट्या संकटांनी खचून जातो, तेव्हा त्यांचे विचार आपल्याला बळ देतात. "शंभर वेळा अपयश आले तरी पुन्हा एकदा प्रयत्न करा," हा त्यांचा सल्ला आजही तितकाच लागू होतो.

स्वामी विवेकानंदांना तरुणांकडून खूप अपेक्षा होत्या. ते म्हणायचे, "मला शंभर नचिकेता द्या, मी या देशाचा चेहरा बदलून टाकीन." त्यांच्या दृष्टीने तरुण हा शारीरिकदृष्ट्या बलवान, मानसिकदृष्ट्या स्थिर आणि आध्यात्मिकदृष्ट्या शुद्ध असावा. त्यांनी समाजातील दीन-दलितांची सेवा करणे हीच खरी ईश्वर सेवा मानली. यासाठीच त्यांनी 'रामकृष्ण मिशन'ची स्थापना केली, जी आजही जगभरात मानवतेचे कार्य करत आहे.

Advertisement

मित्रांनो, स्वामी विवेकानंदांनी वयाच्या अवघ्या 39 व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला, पण त्यांनी दिलेले विचार अजरामर आहेत. आज त्यांच्या जयंतीनिमित्त आपण एक संकल्प करूया की, आपणही ध्येय निश्चित करू आणि ते गाठण्यासाठी कठोर परिश्रम करू. त्यांच्या शिकवणीनुसार आपण एक सुजाण आणि चारित्र्यवान नागरिक बनून देशाला प्रगतीपथावर नेऊया. शेवटी त्यांच्याच शब्दांत सांगावेसे वाटते - "उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका!"

धन्यवाद! जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र