Best Budget 7 Seater Cars In India : जर तुम्ही 7-सीटर कार घेण्याचा विचार करत असाल आणि तेही बजेटमध्ये, तर येथे आम्ही तुम्हाला एकापेक्षा एक जबरदस्त 5 कारचे पर्याय सांगणार आहोत. या सर्व 7-सीटर कार उत्कृष्ट मायलेज तर देतातच. पण या कार्सची किंमत 6 ते 10 लाखांच्या बजेटमध्येही उपलब्ध आहे.कमी बजेट आणि चांगल्या परफॉर्मन्समुळे या पाचही कार्स भारतीय ग्राहकांच्या आवडत्या गाड्यांच्या यादीत आहेत.याच कारणामुळे या भारतातील सर्वात स्वस्त 7-सीटर कार्स ठरल्या आहेत. विशेष म्हणजे या कार्समध्ये संपूर्ण कुटुंब आरामात बसू शकतं.
1. निसान ग्रेवाइट (Nissan Gravite)
या कारला सर्वात स्वस्त 7-सीटर कार म्हणणे चुकीचे ठरणार नाही.या कारची किंमत जवळपास 5.65 लाखांपासून (एक्स-शोरूम) सुरू होते. ही एक नवीन बजेट-फ्रेंडली MPV आहे,जी 7 लोकांसाठी डिझाइन करण्यात आली आहे आणि किंमतही कमी बजेटमध्ये ठेवण्यात आली आहे
2. रिनॉल्ट ट्रिबर (Renault Triber)
ही एक उत्कृष्ट बजेटमधील 7-सीटर कार आहे. या कारची किंमत अंदाजे 5.76 लाख ते 8.60 लाखांपर्यंत आहे. या कारमध्ये 7 सीट्स आणि जबरदस्त फिचर्स आहेत. सीट्स गरजेनुसार फोल्ड करता येतात.
नक्की वाचा >> Inspirational Story: दोन भावांचं रातोरात चमकलं नशिब..कमी वयातच लाखोंची Mercedes केली खरेदी, जगभर होतेय चर्चा
3. मारुती सुझुकी एर्टिगा (Maruti Suzuki Ertiga)
भारतातील लोकप्रिय 7-सीटर कारपैकी एक म्हणजे मारूती सुझुकी एर्टिगा..ही कार कमी बजेटमध्येही खरेदी करता येते आणि मार्केटमध्ये या कारची खूप लोकप्रियता आहे. याची किंमत काही बेस व्हेरिएंटमध्ये अंदाजे 8.96 लाखांपासून सुरू होते.
4. महिंद्रा बोलेरो (Mahindra Bolero)
ही एक लो बजेट SUV-टाइप 7-सीटर कार आहे. या कारची किंमत अंदाजे 9.48 लाख ते 9.96 लाख इतकी आहे. तुम्हाला SUV सारखी रोड-प्रेझेन्स आणि मजबूत बॉडी हवी असेल,तर बोलेरो सिरीज एक उत्तम पर्याय आहे.
नक्की वाचा >> Trending News: 16 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना स्मार्टफोन वापरण्यास बंदी? भारतातील 'या' राज्यात लवकरच..
5. मारुती इको (Maruti Eeco)
ही सर्वात किफायतशीर 7-सीटर व्हॅन-स्टाइल कार आहे. या कारची किंमत अंदाजे 5.69 लाखांपर्यंत आहे. कमी बजेट असलेल्या कुटुंबांसाठी ही एक उत्कृष्ट 7-सीटर कार मानली जाते.