​Top 10 Cars: मे महिन्यात 'या' गाड्यांचा जलवा! बंपर विक्री झालेल्या टॉप 10 कारची यादी पाहा

या कारने 3 टक्के वार्षिक वाढीसह टॉप 10 मध्ये आपले स्थान कायम राखले आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • मे २०२६ मध्ये भारतीय कार बाजारात मारुती सुझुकीला सर्वाधिक मागणी होती
  • मारुती सुझुकी डिझायर सर्वाधिक विकली जाणारी कार ठरली आहे
  • टाटा मोटर्सची पंच कार चौथ्या स्थानावर आहे.
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रासाठी मे 2026 हा महिना अत्यंत फायदेशीर ठरल्याचे समोर आले आहे. या महिन्यात ग्राहकांनी नवीन गाड्यांची खरेदी मोठ्या प्रमाणात केली आहे. मे महिन्यचा विचार करता कार बाजारावर मारुती सुझुकीचे (Maruti Suzuki) वर्चस्व पाहायला मिळत आहे. देशातील या सर्वात मोठ्या कार निर्मात्या कंपनीने विक्रीच्या बाबतीत पहिल्या तीन क्रमांकांवर आपले नाव कोरले आहे. टॉप 10 च्या यादीत मारुतीच्या तब्बल 6 गाड्यांनी स्थान मिळवले असल्याचं ही समोर आलं आहे.  मारुतीनंतर जर कुणाचा नंबर लागत असेल तर टाटा मोटर्सचा लागला आहे. त्यानंतर महिंद्रा आणि ह्युंदाई या कंपन्यांच्या गाड्यांना ही पसंती मिळाली आहे. या ब्रँडने ही  मारुतीला चांगली टक्कर दिल्याची आकडेवारी वरून दिसत आहे. ​मे 2026 मध्ये भारतामध्ये सर्वात जास्त खपाची कार कोणती असेल तर ती मारुती सुझुकी डिझायर (Maruti Suzuki Dzire) आहे.  24,546 कारची विक्री झाली आहे. वार्षिक पातळीवर 36 टक्क्यांची उत्तम ग्रोथ नोंदवली आहे. 

या यादीत दुसऱ्या क्रमांकावर मारुती फ्रॉन्क्स (Maruti Fronx) ही कार आहे. तिने 20,686 युनिट्सची विक्री करून सर्वांनाच चकित केले आहे. फ्रॉन्क्सने वार्षिक 10 टक्क्यांनुसार 52 टक्क्यांची जबरदस्त वाढ मिळाली आहे. ती बाजारात सर्वात वेगाने विकली जाणारी कार असल्याचं ही समोर आलं आहे. ​मोठ्या कुटुंबांची पहिली पसंती असलेली मारुती सुझुकी अर्टिगा (Maruti Suzuki Ertiga) तिसऱ्या क्रमांकावर आहे. अर्टिगाची मे महिन्यात 20,350 युनिट्सची विक्री झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही विक्री 26 टक्के जास्त आहे. टाटा मोटर्सची अत्यंत लोकप्रिय मायक्रो एसयूव्ही टाटा पंच (Tata Punch) तिच्या ईव्ही (EV) व्हर्जनसह चौथ्या स्थानावर आहे. पंचने 54 टक्क्यांच्या दमदार वार्षिक वाढीसह 20,208 गाड्या विकल्या आहेत. 

Advertisement

नक्की वाचा - Maxi Scooter: TVS ने भारतात तयार केली सुसाट 'सुपर' स्कूटर! लुक आणि फीचर्स पाहून थक्क व्हाल

तर पाचव्या क्रमांकावर टाटा नेक्सॉन (Tata Nexon) राहिली आहे. तिच्या पेट्रोल, डिझेल आणि इलेक्ट्रिक मॉडेल्सची एकूण 19,100 युनिट्स विक्री झाली. नेक्सॉनने वार्षिक 46 टक्क्यांची मजबूत वाढ नोंदवली  ​या संपूर्ण यादीमध्ये सर्वाधिक फायदा मारुतीच्या प्रीमियम हॅचबॅक कार बॅलेनोला (Baleno) झाल्याचं ही समोर आलं  आहे. बॅलेनो यादीत सहाव्या क्रमांकावर आहे. तिने 18,396 युनिट्सच्या विक्रीसह टॉप 10 गाड्यांमध्ये सर्वात जास्त म्हणजेच 58 टक्क्यांची वार्षिक ग्रोथ मिळवली आहे. सातव्या क्रमांकावर मारुतीची सदाबहार वॅगन आर (Wagon R) आहे. मारुती स्विफ्ट (Maruti Swift) आठव्या क्रमांकावर राहिली.

नक्की वाचा - Electric Vehicle: खूशखबर! EV मार्केटमध्ये होणार मोठा धमाका; ह्युंदाई कंपनी आणणार परवडणारी इलेक्ट्रिक गाडी

​एसयूव्ही (SUV) प्रेमींमध्ये स्कॉर्पिओ क्लासिक आणि स्कॉर्पिओ एनची क्रेझ  अजून ही कायम असल्याचं त्यांच्या विक्रीवरून दिसून येत आहे. ही लोकप्रिय एसयूव्ही 15,774 युनिट्सची विक्री आणि 10 टक्के वार्षिक वाढीसह नवव्या क्रमांकावर आहे. या यादीत दहाव्या क्रमांकावर मिडसाईज एसयूव्ही सेगमेंटची किंग ह्युंदाई क्रेटा (Hyundai Creta) राहिली आहे. बाजारातील अटीतटीच्या स्पर्धेतही क्रेटाने मे 2026 मध्ये 15,253 गाड्यांची विक्री केली आहे. 3 टक्के वार्षिक वाढीसह टॉप 10 मध्ये आपले स्थान कायम राखले आहे.