आधी 'Mini-moon', मग 'Big-moon'! देशभरातील नवविवाहित जोडप्यांमध्ये लोकप्रिय होत असलेला नवा ट्रेंड काय आहे?

Honeymoon Trend:  लग्नानंतरच्या धामधुमीनंतर प्रत्येक नवविवाहित जोडप्याला हनिमून (Honeymoon) अर्थात मधुचंद्राची ओढ लागलेली असते.

जाहिरात
Read Time: 3 mins
Honeymoon Trend: नवविवाहित जोडप्यांमध्ये हा ट्रेंड सध्या वाढत आहे. (प्रतिकात्मक फोटो)
मुंबई:

Honeymoon Trend:  लग्नानंतरच्या धामधुमीनंतर प्रत्येक नवविवाहित जोडप्याला हनिमून (Honeymoon) अर्थात मधुचंद्राची ओढ लागलेली असते. शांत डोंगर किंवा समुद्रकिनाऱ्यावरील निवांतपणा अनुभवण्यासाठी ते उत्सुक असतात. पण, आता भारतीय जोडप्यांच्या या ट्रेंडमध्ये एक मोठा बदल झाल्याचं समोर आलं आहे. एका नव्या अहवालानुसार, आता नवविवाहित जोडपी लग्नानंतर एक नाही, तर दोन सुट्ट्यांची (two vacations) योजना आखत आहेत!

पहिली सुट्टी म्हणजे काही दिवसांची छोटी आणि लगेच केलेली ट्रिप, ज्याला 'मिनी-मून' (Mini-moon) म्हटलं जात आहे. तर, दुसरी म्हणजे पारंपारिक, लांब आणि मोठी सुट्टी, ज्याला 'बिग-मून' (Big-moon) असं नवं नाव मिळालं आहे. भारतीय ट्रॅव्हल प्लॅटफॉर्म 'थ्रिलॉफिलिया' (Thrillophilia) च्या एका अहवालातून हा महत्त्वाचा बदल दिसून आला आहे.

मिनी-मून' आणि 'बिग-मून' म्हणजे काय?

थ्रिलॉफिलियाचा हनिमून ट्रॅव्हल रिपोर्ट 2025-26 सांगतो की, आताची जोडपी लग्नाचे समारंभ संपल्यानंतर लगेच 3 ते 5 रात्रींचा मिनी-मून प्लान करत आहेत. यानंतर, लग्नानंतर काही महिन्यांनी ते लांब आणि अनुभवांनी परिपूर्ण असा बिग-मून प्लान करतात. मिनी-मून ट्रिप्सचा हा ट्रेंड झपाट्याने वाढत असून, यात वर्षागणिक 18 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. नवविवाहित जोडपी त्यांचा पहिला वर्ष एकत्र कसा घालवतात आणि प्रवास करतात, यात हा एक मोठा बदल आहे.

( नक्की वाचा : Parenting Tips: तुमचे बाळ 'या' स्थितीत झोपत असेल, तर लगेच सावध व्हा! डॉक्टरांनी सांगितली सर्वात सुरक्षित पद्धत )
 

नवविवाहित जोडपी 'मिनी-मून' का निवडत आहेत?

थ्रिलॉफिलियाच्या अहवालानुसार, मिनी-मूनला पसंती मिळण्याची काही खास कारणं आहेत:

लग्नाचा थकवा:  लग्नसमारंभाच्या धावपळीनंतर नवविवाहित जोडप्यांना लगेच आराम करण्यासाठी आणि रिकव्हर होण्यासाठी अनुभवांनी भरलेला मिनी-मून मदत करतो.

नोकरीतील सुट्ट्या (Leave): या जोडप्यांना नोकरीतून लगेच मोठी सुट्टी (long leave) घ्यावी लागत नाही.

सोपे नियोजन: मिनी-मूनमध्ये जटिल लॉजिस्टिक्स आणि व्यवस्थापनाचा ताण नसतो, त्यामुळे लगेच प्रवास करणं सोपं जातं.

Advertisement

याउलट, लग्नानंतर काही महिन्यांनी प्लान केलेला बिग-मून जोडप्याला अधिक सखोल आणि अनुभव-आधारित प्रवासाची संधी देतो. यामुळे त्यांना त्यांच्या परस्पर आवडीनिवडीचा विचार करण्यासाठी वेळ मिळतो.  ऑफ-बीट डेस्टिनेशन (off-beat destination), आंतरराष्ट्रीय सुट्टी (international holiday) किंवा निसर्ग सौंदर्य अनुभवण्यासाठी खास फोकस करुन ते प्रवास करु शकतात.  बजेट निश्चित करून, ट्रिपला वैयक्तिक स्पर्श देऊन (personalise the trip) खरंच निवांत होऊ शकतात. मिनी-मून आणि बिग-मूनचे हे संयोजन आधुनिक भारतीय जोडप्यांसाठी लक्झरी (luxury) आणि जिव्हाळ्याची (intimacy) नवी व्याख्या ठरवत आहे.

( नक्की वाचा :VIDEO : मुस्लीम देशात साकारले 'न्यू वृंदावन'; कोण आहे 'हा' कृष्णभक्त, ज्याने साऱ्या जगाला दाखवली भक्तीची ताकद? )
 

'मिनी-मून' आणि 'बिग-मून' कशावर ठरतात?

अहवालानुसार, नवविवाहित जोडपी आता निव्वळ लक्झरीऐवजी अनुभव आधारित मिनी-मून आणि बिग-मूनला प्राधान्य देत आहेत.

रोमँटिक अनुभव: सुमारे 64 टक्के जोडपी सूर्यास्त क्रूझ (sunset cruises), व्हिला स्टे (villa stays) आणि समुद्रकिनाऱ्यावरील डिनर (beach dinners) अशा रोमँटिक किंवा प्रायव्हेट अपग्रेडचा आनंद घेतात.

Advertisement

साहसी उपक्रम: जवळपास 42 टक्के जोडप्यांच्या प्रवासात स्नॉर्कलिंग (snorkelling), झिपलाइनिंग (ziplining), डेझर्ट स्टारगेझिंग (desert stargazing) आणि आयुर्वेद रिट्रीट (Ayurveda retreats) यांसारख्या साहसी उपक्रमांचा (adventure activities) समावेश असतो.

लोकप्रिय हनिमून स्थळं (Popular Destinations)

भारतातील मिनी-मून आणि बिग-मून दोन्हीसाठी केरळ (Kerala), अंदमान (Andaman), गोवा (Goa), आणि राजस्थान (Rajasthan) ही लोकप्रिय स्थळं आहेत, कारण इथे निसर्ग आणि संस्कृतीचं सुंदर मिश्रण मिळतं. याव्यतिरिक्त, हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh), मेघालय (Meghalaya) आणि कूर्ग (Coorg) यांसारख्या शांत जागा खासगीपणा (privacy) आणि ऑफबीट अनुभव (offbeat experience) शोधणाऱ्या जोडप्यांच्या यादीत आहेत.

Advertisement

आंतरराष्ट्रीय स्तरावर (International market), थायलंड (Thailand), व्हिएतनाम (Vietnam), बाली (Bali) आणि मालदीव (Maldives) ही सर्वाधिक निवडली जाणारी ठिकाणं म्हणून पुढे आली आहेत.

Topics mentioned in this article