Trending News:10 लाखांची नोकरी सोडून जर्मनी गाठले!, भारतीय तरुणीने असं पाऊल का उचलले? कारण ऐकून हैराण व्हाल

वर्क-लाइफ बॅलन्स आणि तिथले वातावरण उत्तम असले तरी, उन्हाळ्यात 38 अंश आणि हिवाळ्यात उणे 10 अंश अशा टोकाच्या हवामानाचा सामना करावा लागतो.

जाहिरात
Read Time: 3 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • 26 वर्षांच्या एका भारतीय विद्यार्थिनीने वार्षिक 10 लाख रुपयांचr नोकरी सोडून जर्मनी गाठली
  • जर्मनीतील विद्यापीठात आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी प्रति सेमिस्टर दीड लाख रुपयांचे शिक्षण शुल्क असते
  • जर्मनीत राहण्याचा खर्च २४ लाख रुपये असून घरभाडे, विमा, प्रवास आणि अन्न यासाठी मासिक मोठा बजेट लागते
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

Education expenses in Germany: एक भारतीय तरुणीने चक्क 10 लाखाचं पॅकेज असणारी नोकरी सोडली आहे. भारतात शिक्षण घेतल्यानंतर तिला ही नोकरी मिळाली होती. सर्व काही ठिक होतं. पण त्याच वेळी तिने ही नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. त्या मागचं कारण ही तिने सांगितला. शिवाय 10 लाखांची नोकरी सोडून सध्या तिली जर्मनीत किती खर्च येत आहे याचा हिशेब ही तिने सांगितला आहे. त्याचीच चर्चा सध्या नेटकरी करत आहेत. जर्मनीमध्ये उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. मात्र, तिथला खर्च आणि प्रत्यक्ष जीवनशैली कशी असते, याचा अनुभव हीडलबर्ग विद्यापीठात शिकणाऱ्या एका 26 वर्षीय भारतीय तरुणीने मांडला आहे. भारतात वार्षिक 10 लाख रुपयांची नोकरी सोडून तिने संशोधनासाठी जर्मनीचा मार्ग निवडला.

या विद्यार्थिनीच्या मते, जर्मनीतील विद्यापीठात प्रवेश असला तरी आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी प्रति सेमिस्टर दीड लाख रुपये शुल्काची तरतूद आहे. दोन वर्षांच्या पदव्युत्तर शिक्षणासाठी साधारण 30 लाख रुपयांचा खर्च येतो. यामध्ये 24 लाख रुपये राहण्याचा खर्च आणि 6 लाख रुपये शैक्षणिक शुल्काचा समावेश आहे. जर्मनीला जाण्यापूर्वी 'अकाऊंट'मध्ये 12 लाख रुपये जमा करावे लागतात, ज्यातून दरमहा खर्चासाठी ठराविक रक्कम मिळते.

Advertisement

नक्की वाचा - Alcohol vs Lifestyle: जास्त मद्यपान करूनही युरोपीय लोक भारतीयांपेक्षा तंदुरुस्त कसे? 'हा' आहे दोघांमधला फरक

ऐवढा मोठा खर्च भागवण्यासाठी तिला जर्मनीत काम करणे गरजेचे होते. त्यासाठी हा खर्च भागवण्यासाठी ती एका दुकानात पार्ट टाइम काम करते. तिथे तिला तासाला 13 युरो म्हणजे भारतीय रुपयामध्ये तासाला 1400 रुपये वेतन मिळते. त्यातूनच ती आपल्या महिन्याचा खर्च भागवत असते. त्यातू ती घर भाडे 450 युरो म्हणजे 49,000 रुपये, विमा 145 युरो म्हणजे  15,500 रुपये, प्रवास पास 45 युरो म्हणजे 4,800 रुपये, खाणे 150 युरो  म्हणजे 16,000 रुपये खर्च येतो. तो खर्च ती तिथेच पार्ट टाईम काम करून भागवते. 

नक्की वाचा - Airplane Color: विमानांचा रंग पांढराच का असतो? या मागे दडली आहेत 5 मोठी कारणे

वर्क-लाइफ बॅलन्स आणि तिथले वातावरण उत्तम असले तरी, उन्हाळ्यात 38 अंश आणि हिवाळ्यात उणे 10 अंश अशा टोकाच्या हवामानाचा सामना करावा लागतो, असेही तिने नमूद केले. जर्मनीतील जीवनशैलीबद्दल बोलताना तिने सांगितले की, तिथे घरकाम, स्वयंपाक आणि सरकारी कागदपत्रांची पूर्तता स्वतःलाच करावी लागते. सुरुवातीला हे कठीण वाटते, पण यामुळे आत्मविश्वास वाढतो. तिथले रस्ते, सार्वजनिक वाहतूक आणि मोकळी हवा मनाला आनंद देणारी आहे. लोकांमध्ये कामाच्या आणि वैयक्तिक आयुष्याचा समतोल (Work-life balance) चांगला आहे.

नक्की वाचा - Pune News : आईचा मित्र बनला नराधम,13 वर्षांच्या मुलीला शाळेत नेतो म्हणून भर रस्त्यात कारमध्येच...पुण्यात संताप

वांशिक भेदाबद्दल (Racism) विचारले असता तिने सांगितले की, अनुभव संमिश्र आहेत. बहुतांश लोक चांगले वागतात, मात्र काही वृद्ध व्यक्तींचे वागणे कधीकधी रुक्ष वाटते. तरीही, 30 लाख रुपये खर्च करून घेतलेला हा निर्णय शैक्षणिक प्रगती आणि वैयक्तिक स्वातंत्र्यासाठी योग्य असल्याचे तिने म्हटले आहे.जर्मनीमध्ये उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. त्यात विद्यार्थीनेने घेतल्या निर्णयाबाबत सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. काहींनी तिचे कौतूक केले आहे.