कुचू-पुचू' ते 'वास्तेगुना हुइंया'...तुम्हाला FOMO होण्यापूर्वी समजून घ्या Gen Z च्या सर्व शब्दांचे नेमके अर्थ

Gen Z Slang Meaning: सध्या देशभर चर्चेत असलेल्या जनरेशन झेडच्या शब्दांचे अर्थ तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे.

जाहिरात
Read Time: 4 mins
Gen Z Slang Meaning:   जनरेशन झेडची एक खास भाषा आहे. (प्रतिकात्मक फोटो)
मुंबई:

Gen Z Slang Meaning:  सोशल मीडियावरील मीमची भाषा कधी आपल्या देशाच्या संसदेत वापरली जाईल असा विचार तुम्ही कधी केला होता का? पण भारतीय संसदीय इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं आहे. संसदेतील गंभीर चर्चेदरम्यान 'वास्तेगुना हुइंया'सह अनेक ट्रेंडी Gen-Z (जेन-झी) स्लैंग्सचा वापर करण्यात आला आणि हे शब्द आता संसदेच्या अधिकृत नोंदींचा भाग बनले आहेत.

28 जुलै रोजी 'अँटी-पेपर लीक विधेयका'वर (सार्वजनिक परीक्षा सुधारणा विधेयक) चर्चा सुरू असताना खासदारांनी इंटरनेट स्लँग्सची संपूर्ण डिक्शनरीच उघडली. सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या खासदारांनी एकमेकांवर राजकीय निशाणा साधण्यासाठी Gen-Z च्या भाषेचा वापर केला. संसदेत वापरल्या गेलेल्या या शब्दांचे नेमके अर्थ काय आहेत, ते जाणून घेऊया.

Advertisement

1. Clock It (क्लॉक इट)

या शब्दाचा सोपा अर्थ म्हणजे एखादी गोष्ट किंवा समस्या वेळीच समजून घेणे, ओळखणे किंवा पकडणे असा होतो.

संसदेत कोणी वापरला हा शब्द:

भाजप खासदार बांसुरी स्वराज यांनी अँटी-पेपर लीक विधेयकावर बोलताना सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही समस्या वेळेत ओळखली. Gen-Z च्या भाषेत सांगायचे तर 'Modi ji clocked it.' म्हणजेच मोदी सरकारने ही समस्या समजून घेऊन त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न केला.

( नक्की वाचा : प्रियांका गांधींनी ज्यांना 'गोमूत्र तज्ज्ञ' म्हटलं, ते V Kamakoti कोण आहेत? सर्वांना माहिती हवी ही ओळख )
 

2. Delulu (डिलुलू)

हा शब्द 'Delusional' या इंग्रजी शब्दावरून तयार झाला आहे. वास्तवापासून दूर राहून स्वतःच्याच काल्पनिक जगात किंवा भ्रमात जगणाऱ्या व्यक्तीसाठी हा शब्द वापरला जातो. उदाहरणार्थ- अभ्यास न करता टॉपर बनण्याचे स्वप्न पाहणे किंवा तयारी न करता मुलाखतीत पास होण्याचा अतिआत्मविश्वास असणे. Gen-Z अशा लोकांना मजेत 'Delulu' म्हणतात.

संसदेत कोणी वापरला हा शब्द:
सत्ताधारी आणि विरोधी पक्ष दोघांनीही एकमेकांच्या दाव्यांवर टोमणे मारताना या शब्दाचा वापर केला. शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी विरोधकांच्या आंदोलनावर टिप्पणी करताना म्हटले की, विरोधक आधी 37 दिवस 'MIA' होते, नंतर त्यांना 'FOMO' झाला आणि शेवटी ते 'Delulu' मध्ये जगू लागले की विद्यार्थी त्यांच्यासोबत येतील, पण कोणीही आले नाही.

( नक्की वाचा : 1 तारखेला बँक खाते पुन्हा शून्य; 2 लाख पगार असूनही 'या' चुकीमुळे 20 लाखांच्या कर्जात अडकला तरुण! )
 

3. FOMO (फोमो)

FOMO चा फुल फॉर्म 'Fear Of Missing Out' असा आहे. म्हणजेच आपल्याकडून एखादी महत्त्वाची संधी, इव्हेंट किंवा ट्रेंड सुटून तर जाणार नाही ना, या भीतीला FOMO म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचे तर, तुमचे मित्र फिरायला गेले आणि तुम्हाला बोलावले नाही, किंवा एखादा व्हायरल ट्रेंड सुरू असताना आपण मागे पडलो आहोत असे वाटणे.

Advertisement

संसदेत कोणी वापरला हा शब्द:
शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी विरोधकांवर टोला लगावत म्हटले की, सुरुवातीला विरोधक आंदोलनापासून दूर राहिले आणि नंतर FOMO मुळे ते या विरोधात सामील झाले.

4. MIA (एमआयए)

MIA चा फुल फॉर्म 'Missing In Action' असा आहे. एखाद्या महत्त्वाच्या प्रसंगी किंवा ठिकाणाहून गायब असणे, असा याचा अर्थ होतो. जसे की, ऑफिसची महत्त्वाची बैठक सुरू आहे आणि मुख्य सदस्यच अनुपस्थित आहे, तर Gen-Z म्हणेल 'He is MIA.'

Advertisement

संसदेत कोणी वापरला हा शब्द:
शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनीच या शब्दाचा वापर केला. आंदोलनाच्या सुरुवातीच्या दिवसांत विरोधक MIA होते, असा आरोप त्यांनी केला.

5. Kuchu Puchu (कुचू पुचू)

हा कोणत्याही डिक्शनरीतील अधिकृत शब्द नाही. प्रेम व्यक्त करण्यासाठी, कोणाचे जास्त लाड करण्यासाठी किंवा एखाद्या गोष्टीची हलकीफुलकी मजा उडवण्यासाठी हा शब्द वापरला जातो. सोशल मीडियावर अनेक मीम्स आणि व्हायरल व्हिडिओंनंतर हा शब्द खूप प्रसिद्ध झाला.

संसदेत कोणी वापरला हा शब्द:
काँग्रेस खासदार दीपेंद्र सिंह हुड्डा यांनी सरकारच्या धोरणांवर आणि दाव्यांवर टोमणा मारताना व्हायरल मीम संवाद 'वास्तेगुना हुइंया' आणि 'कुचू पुचू' चा वापर केला.

6. Vasteguna Huiya (वास्तेगुना हुइंया)

सध्या इंटरनेटवर हा शब्द प्रचंड गाजत आहे. जंतर-मंतरवर कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान 'वास्तेगुना हुइंया' हा शब्द खूप प्रसिद्ध झाला आणि सध्या तो ट्रेंडमध्ये आहे. शब्दकोशात याचा कोणताही अधिकृत अर्थ सापडणार नाही. हा एका व्हायरल इंटरनेट ऑडिओ आणि मीम कल्चरमधून आलेला शब्द आहे. एखादी अजब, मजेशीर किंवा आश्चर्यकारक घटना घडल्यास लोक त्यावर प्रतिक्रिया म्हणून हा शब्द वापरतात.

संसदेत कोणी वापरला हा शब्द:
काँग्रेस खासदार दीपेंद्र सिंह हुड्डा यांनी सरकारवर निशाणा साधताना या ट्रेंडी शब्दाचा वापर केला.
 


Topics mentioned in this article