Healthiest Fruit: कोणतं फळ रोज खाल्लं पाहिजे? आहारतज्ज्ञांचा सल्ला काय?

आहारतज्ञ श्रेया गोयल यांनी या संदर्भात एक व्हिडिओ त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

पौष्टिक आहार म्हणजे ज्यात भाज्या, धान्य आणि फळे यांचा समावेश होतो. रोज फळे खाल्ल्याने आरोग्याला एक नव्हे, तर अनेक फायदे मिळतात. अनेकदा असे म्हटले जाते की "एक अनार, सौ बीमार" किंवा "An apple a day keeps the doctor away" म्हणजेच रोज एक सफरचंद खाल्ल्याने डॉक्टर दूर राहतो. पण, येथे ज्या फळाबद्दल रोज खाण्याची गोष्ट केली जात आहे, ते सफरचंद (Apple) किंवा डाळिंब (Pomegranate) नसून दुसरेच एक फळ आहे. जे खाण्याचा सल्ला आहारतज्ञ (Dietician) देत आहेत. हे कोणते फळ आहे जे दररोज खाणे आरोग्यासाठी अत्यंत चांगले आहे, ते जाणून घेवूयात.

कोणते फळ रोज खायला पाहिजे?
आहारतज्ञ श्रेया गोयल यांनी या संदर्भात एक व्हिडिओ त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. श्रेया यांनी सांगितले की, केळं (Banana) हे असे फळ आहे जे रोज खायलाच पाहिजे. विशेषतः मुलांनी दररोज केळं खायला हवं असा सल्ला ही आहार तज्ज्ञ देतात. 

नक्की वाचा - : दररोज एक डाळिंब खाल्ल्याने काय होईल? महागड्या क्रीमही करू शकणार नाही अशी जादू

केळं खाण्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत:

  • हाडांसाठी फायदेशीर: केळं शरीरातील कॅल्शियमचे शोषण वाढवते, ज्यामुळे हाडे मजबूत होतात.
  • हार्मोनल संतुलन: यात Vitamin B6 असते. जे हार्मोन्सचे संतुलन सुधारते आणि हार्मोनल आरोग्य चांगले ठेवते.
  • पोटाचे आरोग्य: पोटाच्या आरोग्यासाठीही केळं अत्यंत चांगले आहे. यात प्रीबायोटिक्स (Prebiotics) असतात, ज्यामुळे पोटाचे आरोग्य चांगले राहते.
  • नैसर्गिक ऊर्जा: शरीराला ऊर्जा देण्यासाठी केळ्याला नैसर्गिक ऊर्जा स्नॅक म्हणून खाल्ले जाऊ शकते.
  • मनःस्थिती सुधारते: केळं शरीरात 'हॅपी हार्मोन' सेरोटोनिनचे (Serotonin) उत्पादन वाढवते. यामुळे केळं खाल्ल्याने मनःस्थिती चांगली राहते.
  • उंची वाढण्यास मदत: मुलांना रोज एक केळं दिल्यास त्यांची उंची (Height) वाढण्यासही मदत मिळते.
  • हृदयाचे आरोग्य: केळ्यात असलेले पोटॅशियम (Potassium) हृदयाचे आरोग्य चांगले ठेवते. यामुळे हृदय, नसा (nerves) आणि स्नायूंचे (muscles) कार्य सुधारते.
  • दात आणि हिरड्यांसाठी: केळ्यात व्हिटॅमिन सी (Vitamin C) असते, ज्यामुळे दात, हिरड्या आणि स्नायूंच्या कार्याला फायदा होतो.
  • रक्तदाब आणि रक्तातील साखर: मॅग्नेशियम (Magnesium) असल्यामुळे केळं रक्तदाब (Blood Pressure) आणि रक्तातील साखर (Blood Sugar) नियंत्रित करण्यास मदत करते. मॅग्नेशियम हाडे मजबूत ठेवण्यासाठी देखील फायदेशीर आहे.
  • बद्धकोष्ठतेपासून आराम: फायबरने (Fiber) भरपूर असल्यामुळे केळं खाल्ल्याने बद्धकोष्ठतेची (Constipation) समस्या दूर होते आणि पोट साफ राहते.
  • त्वचेसाठी फायदेशीर: केळ्यामुळे त्वचेलाही फायदा होतो. केळ्यात मॅंगनीज (Manganese) असते, ज्यामुळे त्वचेतील कोलेजन (Collagen) वाढते आणि त्वचा निरोगी राहते.