Tele Phobia : फोनवर बोलताना भीती वाटतीय, तुम्हाला असू शकतो टेली फोबिया! तो कसा ओळखणार?

What Is Tele Phobia? : फोनची रिंग वाजल्यानंतर तुम्हाला टेन्शन येत असेल, अथवा भीती वाटत असेल तर ही बातमी लक्षपूर्वक वाचा.

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

Do You Feel Nervous While Talking On Phone: मोबाईल फोन हा आता जवळपास प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याचा भाग बनला आहे. फोन आता फक्त बोलण्याचं माध्यम नाही. तर, रोजच्या जगण्यातील अनेक गोष्टींसाठी मोबाईल फोनवर आपण अवलंबून असतो. फिटनेसचा (Fitness) रेकॉर्ड ठेवण्यापासून ते महत्त्वाचे शॉपिंगपर्यंतच्या अनेक गोष्टी आपण मोबाईलच्या माध्यमातून करतो. पण, हाच फोन तुमचा त्रास वाढवत आहे. फोनची रिंग वाजल्यानंतर तुम्हाला टेन्शन येत असेल, अथवा भीती वाटत असेल तर ही बातमी लक्षपूर्वक वाचा.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

तरुणांना फोनची भीती

ब्रिटनमधील मोबाईल फोन युझर्सना सध्या एक नवा आजाराची लागण होत आहे. टेली फोबिया किंवा कॉल एंग्जायटी असं या आजारचं नाव आहे. याबाबतच्या आकडेवारीनुसार ब्रिटनमधील 25 लाखांपेक्षा जास्त तरुणांना या आजाराची लागण झाली आहे.

झपाट्यानं प्रसार होत असलेला टेली फोबिया हा सध्या काळजीचा आणि आश्चर्याचा विषय बनला आहे. कारण, जो फोन तुमच्या दिवसरात्र सोबत असतो त्याच फोनची रिंग वाजल्यानंतर भीती का वाटते? हा प्रश्न अनेकांना पडला आहे. 

( नक्की वाचा : जोडप्यांमध्ये वेगानं लोकप्रिय होत असलेला Sleep Divorce काय आहे? त्याचा रिलेशनशिपवर काय परिणाम होतो? )
 

काय आहे टेली फोबिया? (What Is Tele Phobia?)

टेली फोबिया हे एका मानसिक अवस्थेचं नाव आहे. या व्यक्तींना फोनवर कॉल आला की भीती वाटायला लागते. फोन उचलताना त्यांना भीती वाटते. तसंच फोनवर बोलण्याच्या कल्पनेनं ते नर्व्हस होतात. 

Advertisement

का होतो टेली फोबिया? (Causes Of Tele Phobia)

या आजाराच्या कारणांचा नेमका अंदाज लावता येत नाही. तणाव हे याचं एक कारण मानलं जातं. एखादा तणावग्रस्त व्यक्तीला इतर माणसांशी बोलताना भीती वाटू शकते. अथवा ते इतरांशी बोलणे टाळतात. हळूहळू त्या व्यक्तींमध्ये एकाकीपणा वाढू लागतो. ते बहुतेक काळ शांत असतात. त्यामध्ये त्यांना एखादा फोन आला तर ते घाबरतात किंवा चिडतात. काही जण फोन बोलताना नर्व्हस होतात. 

तरुणांमध्ये का वाढतोय टेली फोबिया? (Why Only Youth Is Facing This Problem)

टेली फोबिया होण्याचं एक कारण तुमचा स्वत:चा मोबाईल फोन देखील आहे. या आजाराची लागण तरुणांना मोठ्या प्रमाणात होत आहे. चॅटींगची सवय हे याचं महत्त्वाचं कारण आहे. अनेक तरुण मुलं  मोबाईलच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात चॅट करत असतात. त्यासाठी ते वेगवेगळे अ‍ॅप्स वापरतात. कधी-कधी फक्त फोटोच्या माध्यमातून संभाषण करतात. अगदीच गरज पडली तरच त्यावर काही मजकूर लिहितात. अथवा बोलण्याच्या मूडनुसार इमोजी शेअर करतात. 

Advertisement

जास्त काळ चॅट केल्यानं फोन कॉलपासून दूर राहण्याचीसवय पडते. त्या परिस्थितीमध्ये फोनवर बोलणे हे नाईलाज असतो. फोन आला तर त्याला उत्तर देताना भीती वाटते. एका सर्वेक्षणानुसार 18 ते 34  वयोगटातील 10 पैकी 7 तरुणांना फोन रिसिव्ह करायला आवडत नाही. 


स्पष्टीकरण : ही माहिती फक्त सामान्यज्ञानावर आधारित आहे. हा कोणत्याही प्रकारच्या योग्य उपचाराचा पर्याय नाही. अधिक माहितीसाठी नेहमीच या विषयातील तज्ज्ञ किंवा तुमच्या डॉक्टरचा सल्ला घ्यावा. NDTV नेटवर्क यामधील मजकुराला जबाबदार नाही. 

Advertisement
Topics mentioned in this article