Health News: या एका चुकीमुळे तुमचं आरोग्य बिघडणार! 1 दिवसात किती मीठ खावं? मीठ खाण्याची योग्य पद्धत कोणती?

बहुतांश लोक जेव्हा ब्लड प्रेशर, हृदय किंवा किडनीच्या समस्यांचा शिकार होतात, तेव्हा सर्वप्रथम एकच सल्ला दिला जातो-मीठाचं सेवन कमी करा. या भीतीमुळे अनेक लोक मीठ खाणे खूपच कमी करतात. पण मीठाचं प्रमाण आणि ते सेवन करण्याची योग्य पद्धत माहितीय का? वाचा माहिती.

जाहिरात
Read Time: 3 mins
WHO Salt Intake Recommendation

Daily Salt Intake Limit:  आपल्यापैकी बहुतांश लोक जेव्हा ब्लड प्रेशर, हृदय किंवा किडनीच्या समस्यांचा शिकार होतात, तेव्हा सर्वप्रथम एकच सल्ला दिला जातो-मीठाचं सेवन कमी करा. या भीतीमुळे अनेक लोक मीठ खाणे खूपच कमी करतात किंवा मीठ खाण्याचा अन्य पर्याय शोधतात. पण अनेकांना याबाबत योग्य माहिती नसल्याने त्यांचे निर्णय चुकतात. म्हणजेच इथे मीठाच्या प्रमाणात समस्या नाही, तर मीठ खाण्याच्या चुकीच्या पद्धतीत आहे. शरीराला मीठाची गरज असते,पण योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने मीठाचं सेवन केल्यास ते आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं. मीठाचं सेवन का आवश्यक असतं? एका दिवसात किती मीठ खावे? लोक मीठाबाबत कोणत्या चुका करतात आणि मीठ खाण्याची योग्य पद्धत काय आहे,याबाबत सविस्तर माहिती वाचा.

मीठ म्हणजे सोडियम क्लोराइड,जो शरीरासाठी एक आवश्यक खनिज आहे.हे अनेक महत्त्वाची कामे करते. उदा. शरीरातील पाण्याचे संतुलन राखणे.
स्नायू आणि नसांना योग्य प्रकारे कार्य करण्यास मदत करणे.रक्तदाब नियंत्रणात ठेवणे.जर शरीरात मीठाचं प्रमाण खूप कमी झालं तर थकवा,चक्कर येणे,अशक्तपणा, लो ब्लड प्रेशरसारख्या समस्या उद्भवू शकतात. 

जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) माहितीनुसार, एका प्रौढ व्यक्तीने दिवसाला 5 ग्रॅमपेक्षा कमी मीठ खावे , हे अंदाचे (चहाच्या चमच्यापेक्षा थोडे कमी) असते.सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे प्रमाण वरूव फिरवलेल्या मिठाचं नसून भाजी,डाळ,लोणचे,नमकीन,बिस्किटे,पॅकेटमधील खाद्यपदार्थांचा यात समावेश आहे. 

नक्की वाचा >> Best Chakna: दारु पिताना काय खावं? Whisky सोबत सर्वात चांगला चकणा कोणता? फक्त 1 टक्के लोकांनाच माहितीय

नेमकी चूक कुठे होतेय? 

  • वरून जास्त मीठ घालणे: जेवण तयार झाल्यानंतर वरून मीठ घालण्याची सवय ही सर्वात धोकादायक आहे. त्यामुळे नकळत मीठ जास्त प्रमाणात जाते.
  • पॅकेज्ड आणि प्रोसेस्ड फूड: चिप्स, नमकीन, इंस्टंट नूडल्स, सॉस, बिस्किटे आणि रेडीमेड मसाल्यांमध्ये लपलेले मीठ खूप जास्त असते.
  • सेंधा मीठ आहे तर कितीही चालेल,ही चुकीची कल्पना: सेंधा मिठातही सोडियम असते.जास्त प्रमाणात कोणतेही मीठ नुकसान करू शकते.
  • डॉक्टरांचा सल्ला न घेता मीठ खूप कमी करणे: लो बीपी असलेले, वृद्ध किंवा ज्यांना खूप घाम येतो अशा लोकांमध्ये गरजेपेक्षा कमी मीठही धोकादायक ठरू शकते.

नक्की वाचा >> Winter Trekking Destination: नवीन वर्षात पिकनिकला जायचंय? स्वर्गापेक्षाही सुंदर आहेत 'ही' 3 ठिकाणं!

मीठ खाण्याची योग्य पद्धत काय आहे?

  • जेवण शिजवताना मर्यादित प्रमाणात मीठ मिक्स करा.
  • वरून मीठ घालण्याची सवय सोडा.
  • पॅकेज्ड फूड कमी करा.
  • लोणचे, पापड आणि चटणी मर्यादित प्रमाणात खा.
  • लेबल वाचण्याची सवय लावा (Low Sodium लिहिलेले असेल तर अधिक चांगले).
  • जास्त घाम येत असेल तर पाण्यासोबत इलेक्ट्रोलाइट संतुलनाची काळजी घ्या.

WHO च्या अभ्यासानुसार, जास्त मीठ खाल्ल्याने हाय ब्लड प्रेशर, हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. तर योग्य प्रमाणात मीठ घेतल्यास रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि हृदयाचे आरोग्य सुधारते.

Advertisement

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.