Diabetes and Sugar Level : किती असावी शुगर लेव्हल ? वाचा, कोणती टेस्ट आहे सर्वोत्तम

Test For Diabetes: मधुमेह शोधण्यासाठी, रक्तातील ग्लुकोजची पातळी तपासली जाते. अशा परिस्थितीत रक्तातील ग्लुकोजची सामान्य पातळी किती? आणि मधुमेह शोधण्यासाठी कोणती चाचणी सर्वोत्तम आहे असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होत असतो.

जाहिरात
Read Time: 3 mins
Test For Diabetes: डायबिटीज का पता लगाने के लिए ब्लड में ग्लूकोज लेवल की जांच की जाती है.
Mumbai:

Best Test For Diabetes: मधुमेहाच्या रुग्णांची संख्या भारतामध्ये झपाट्याने वाढत आहे. सध्या भारतात 10 कोटींहून अधिक लोक मधुमेहाने ग्रासलेले आहेत. आपल्याला डायबेटीस झालाय की नाही?  रक्तातील साखरेचे प्रमाण किती आहे? हे जाणून घेण्यासाठी रक्तातील ग्लुकोजची पातळी तपासली जाते. सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास जर तुमच्या रक्तातील ग्लुकोजची पातळी,  ठराविक मर्यादेपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला मधुमेह झालेला आहे हे निश्चित होते. मग प्रश्न निर्माण होतो की,  रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण किती असावे? नॉर्मल शुगर लेव्हल ही किती असावी? या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी सर्वोत्तम टेस्ट कोणती आहे असा अनेकांना प्रश्न पडतो. एनडीटीव्हीने याबाबत एशियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या एंडोक्राइनोलॉजी विभागाचे वरिष्ठ सल्लागार डॉ. संदीप खरब यांच्याशी बातचीत केली.

नॉर्मल शुगर लेव्हल किती असते? (what Is The Normal Sugar Level?)

रक्त तपासणीसाठी 12 तास उपाशी असणं गरजेचं असतं, कारण तसे केल्याने चाचणीचे निकाल अचूक येण्यास मदत होते. उपाशी पोटी चाचणी केल्यानंतर तुमची शुगर लेव्हल ही 100 च्या खाली असेल तर ती नॉर्मल रेंज मानली जाते. खाल्ल्यानंतर दोन तासांनी तुम्ही शुगर लेव्हल तपासली आणि ती 140 पेक्षा कमी आली तर त्याचा अर्थ हा होतो की तुम्हाला मधुमेह झालेला नाही. 

Advertisement

डायबिटीजसाठीच्या चाचण्या (Tests For Diabetes)

मधुमेह शोधण्यासाठी अनेक प्रकारच्या चाचण्या करता येतात. रक्तातील साखरेची तपासणी, रिकाम्या पोटी आणि खाल्ल्यानंतर दोन तासांनी केली जाऊ शकते. याशिवाय, HbA1c चाचणीद्वारे गेल्या तीन महिन्यांतील रक्तातील ग्लुकोज पातळीची सरासरी काढता येते. ओरल ग्लुकोज टॉलरन्स (OGT) चाचणीद्वारे देखील तुम्हाला मधुमेह झाला आहे की नाही याचा शोध लावला जाऊ शकतो असे डॉ.संदीप खरब यांनी सांगितले.  

Advertisement

रिकाम्या पोटी केली जाणारी चाचणी:

या टेस्टमध्ये चाचणीसाठी आलेल्या व्यक्तीला तोंडावाटे मोठ्या प्रमाणावर ग्लुकोज दिले जाते. जवळपास 75 ग्रॅम ग्लुकोज दिल्यानंतर दोन तासांनी त्या व्यक्तीच्या रक्ताचे नमुने घेतले जातात. त्या व्यक्तीचे शरीर हे ग्लुकोज कसं पचवते हे या चाचणीतून तपासले जाते. या चाचणीमध्ये 140 पेक्षा कमी पातळी असेल तर त्या व्यक्तीला डायबेटीस झालेला नाही असे मानले जाते. 140-199 ही पातळी प्री डायबेटीक म्हणजेच त्या व्यक्तीला मधुमेह होण्याची दाट शक्यता असल्याचे मानले जाते. 200 हून अधिक पातळी असेल तर त्या व्यक्तीला मधुमेह झाल्याचे निदान करण्यात येते. 

Advertisement

ओरल ग्लुकोज टॉलरंस टेस्ट (ओजीटी)

या टेस्टमध्ये चाचणीसाठी आलेल्या व्यक्तीला तोंडावाटे मोठ्या प्रमाणावर ग्लुकोज दिले जाते. जवळपास 75 ग्रॅम ग्लुकोज दिल्यानंतर दोन तासांनी त्या व्यक्तीच्या रक्ताचे नमुने घेतले जातात. त्या व्यक्तीचे शरीर हे ग्लुकोज कसं पचवते हे या चाचणीतून तपासले जाते. या चाचणीमध्ये 140 पेक्षा कमी पातळी असेल तर त्या व्यक्तीला डायबेटीस झालेला नाही असे मानले जाते. 140-199 ही पातळी प्री डायबेटीक म्हणजेच त्या व्यक्तीला मधुमेह होण्याची दाट शक्यता असल्याचे मानले जाते. 200 हून अधिक पातळी असेल तर त्या व्यक्तीला मधुमेह झाल्याचे निदान करण्यात येते. 

एचबीएवनसी (HbA1c) टेस्ट 

या चाचणीद्वारे गेल्या तीन महिन्यांतील रक्तातील ग्लुकोजची सरासरी पातळी कळते. या चाचणीमध्ये, रक्तातील ग्लुकोजची पातळी 5.7 टक्क्यांपेक्षा कमी असल्यास ती सामान्य मानली जाते. रक्तातील साखरेची पातळी ही 5.7 ते 6.4 दरम्यान असेल तर ती व्यक्ती प्रीडायबेटीक असल्याचे निदान करण्यात येते. मधुमेह झालेल्या व्यक्तीच्या शरीरात ही पातळी 6.5 टक्क्यांपेक्षा जास्त असेत.शुगर लेव्हल 5.7 ते 6.4 टक्क्यांदरम्यान असेल तर त्या व्यक्तीने ही चाचणी पुन्हा करावी असा सल्ला डॉ.संदीप यांनी दिला आहे. 

कोणती चाचणी सर्वोत्तम आहे?

वर नमूद केलेल्या चाचण्यांपैकी कोणती सर्वोत्तम चाचणी आहे असा प्रश्न विचारला असता डॉ. संदीप खरब यांनी म्हटले की वरील तीन चाचण्यांपैकीओरल ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट (OGTT) ही टेस्ट उत्तम आहे. असे असले तरी अचूक निदानासाठी तीनही चाचण्या करून घेणे फायदेशीर ठरते असेही त्यांनी म्हटले आहे.