Delhi Earthquake : भूकंप आला तर घाबरु नका, ही 5 काम करा ! मुलांनाही समजावून सांगा

Earthquake Guidelines: भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर घाबरु नका. तुम्ही सुरक्षित राहू शकता. घरातील लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना या गोष्टी माहिती असणे आवश्यक आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins
What To Do During An Earthquake: भूकंप आल्यानंतर काय करावं? काय करु नये?
मुंबई:

Earthquake In Delhi NCR: दिल्ली एनसीआरमध्ये राहणाऱ्या नागरिकांना सोमवारी सकाळी भूकंपाच्या धक्क्यानं जाग आली. या भूकंपाची तीव्रता 4 होती. हे धक्के इतके तीव्र होते की त्यामुळे लोकं घराच्या बाहेर पळत आले. भूकंपाचे धक्के जाणावले तर काय केलं पाहिजे हे माहिती असणं आवश्यक आहे. भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर घाबरु नका. तुम्ही सुरक्षित राहू शकता. घरातील लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना या गोष्टी माहिती असणे आवश्यक आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

भूकंप आल्यानंतर काय करावं ? (What to During Earthquake)

  1. कोणत्याही परिस्थितीमध्ये संयम सोडू नका. तुम्ही उंच इमारतीमधील पहिल्या किंवा दुसऱ्या मजल्यावर राहात असाल तर तातडीने बाहेर पडून उघड्या जागेवर येण्याचा प्रयत्न करा. तुमचं घर तिसऱ्या  किंवा त्यापेक्षा उंच मजल्यावर असेल तर आतमध्येच थांबा. कारण, भूकंपाच्या दरम्यान पाऱ्यांवर किंवा लिफ्टमध्ये अडकण्याचा धोका असतो.   
  2. तुम्ही बंद दरवाज्याच्या आड एखाद्या खोलीत असाल तर खोलीच्या मध्यभागी भितींच्या आधारे उभे राहा, किंवा टेबल अथवा डेस्कच्या खाली बसा.  बाहेर उघडणाऱ्या खिडक्या किंवा दरवाज्यापासून तुम्ही दूर असाल याची खबरदारी घ्या. 
  3. फ्रिज, कपाटं या सारख्या मोठ्या वस्तूंपासून दूर राहा. या गोष्टी भूकंपाच्या धक्क्यानं वेगानं खाली पडू शकतात. तुम्ही भूकंपानंतर इमारतीमधून बाहेर पडत असाल तर या खाली पडलेल्या, फुटलेल्या गोष्टी नीट पाहा. तुटलेल्या काचा, किंवा वीजेच्या तारेपासून दूर राहा. 
  4. तुमच्या जवळपास सिलिंग किंवा एखाद्या इमारतीचा भाग पडत असेल तर तुमचे तोंड आणि नाक एखादा कपडा, स्कर्फ किंवा रुमालनं झाका. त्यामुळे तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होणार नाही. 
  5. तुम्ही भूकंपाच्या दरम्यान एखाद्या रस्त्यावर किंवा मोकळ्या जागी असाल तर इमारत, पूल किंवा विजेच्या खांबापासून दूर राहा. तुम्ही एखाद्या चालत्या वाहनामध्ये असाल तर त्याचा स्पीड कमी करा. ते वाहान रस्त्याच्या बाजूला सुरक्षित ठिकाणी उभं करा. कारच्या आतमध्ये थांबूनच रेडिओवर भूकंपाचे अपडेट समजून घ्या. 

( नक्की वाचा : Explainer: दिल्लीला वारंवार भूकंपाचा धोका का आहे? काय आहे कारण? )
 

भूकंप झाल्यानंतर काय करावं?

तुम्ही भूकंपानंतर झोपेतून उठले असाल तर वीजेचे उपकरण लगेच वापरु नका. लायटर किंवा काडेपेटी पेटवू नका. कारण, भूकंपानंतर गॅस पाईप डॅमेज झाल्याचा धोका असतो. उजेडासाठी फ्लॅश लाईटचा वापर करा. 
तुम्हाला दुखापत झाला तर बँडेज लावून सतत वाहणारे खून थांबवा
तुम्ही ढिगाऱ्याच्या खाली अडकला असाल तर स्वत:ला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. स्वत:ची ऊर्जा वाचवण्याचा प्रयत्न करा.

स्पष्टीकरण : ही माहिती फक्त सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही एखाद्या एक्स्पर्ट किंवा डॉक्टरांशी चर्चा करा. एनडीटीव्ही नेटवर्क या माहितीची जबाबदारी घेत नाही.