पालकांकडे राहणार लहान मुलांच्या WhatsApp चं कंट्रोल? 'या' नवीन फिचरमुळे सर्वकाही बदलू शकतं!

WhatsApp आता पॅरेंटल कंट्रोल फीचरवर काम करत आहे, ज्यामुळे पालक आपल्या मुलांच्या अकाउंटवर काही प्रमाणात नजर ठेवू शकतील. हे फिचर कसं काम करेल? वाचा सविस्तर माहिती..

जाहिरात
Read Time: 2 mins
WhatsApp New Feature

WhatsApp New Feature : इंटरनेटच्या युगातील सर्वात प्रभावी आणि प्रसिद्ध माध्यम म्हणजे व्हाट्सअॅप..परंतु, या व्हाट्सअॅप मेसेंजरचा चुकीचा वापर केल्यास त्याचे परिणामही तितकेच गंभीर असता. विशेषत:लहान मुलं आणि तरुणांना या माध्यमांचं व्यसनच लागल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे WhatsApp मुलं आणि तरुणांच्या ऑनलाइन सुरक्षिततेबाबत एक भन्नाट फिचर आणलं आहे. लहान मुलांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या वापराबाबत जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे. यासंदर्भात अनेक देशांमध्ये कठोर नियमावली करण्यात आली आहे. तर काही ठिकाणी व्हाट्सअॅपवर बंदीही घालण्यात आली आहे. 

WhatsApp आता पॅरेंटल कंट्रोल फीचरवर काम करत आहे, ज्यामुळे पालक आपल्या मुलांच्या अकाउंटवर काही प्रमाणात नजर ठेवू शकतील.यामध्ये कोणत्याही प्रकारच्या प्रायव्हसीला धोका निर्माण होणार नाहीय.या फिचर्सची माहिती सर्वप्रथम WABetaInfo यांनी शेअर केली आहे.रिपोर्टनुसार, WhatsApp असा एक सिस्टम टेस्ट करत आहे ज्यात मुलाचं अकाउंट पालक किंवा गार्डियनच्या अकाउंटशी लिंक असेल. विशेष म्हणजे मेसेज किंवा कॉलचा कंटेंट पालकांना दिसणार नाही.म्हणजेच एंड-टू-एंड एन्क्रिप्शन पूर्णपणे कायम राहील.

नक्की वाचा >> Viral Puzzle: घरात आहेत 4 लोक, 1 बहिरा, 1 मुका, 1 आंधळा, 1 लंगडा, लाईट गेल्यावर सर्वात आधी मेणबत्ती कोण लावेल?

पॅरेंट अकाउंट हे सेकंडरी अकाउंटशी लिंक असेल आणि..

रिपोर्टमध्ये सांगितले आहे की, WhatsApp सेकंडरी अकाउंटची संकल्पना आणू शकतं. हे अकाउंट विशेषत: कमी वयाच्या यूजर्ससाठी असेल आणि त्यामध्ये काही फीचर्स मर्यादित असतील.पॅरेंट अकाउंट हे सेकंडरी अकाउंटशी लिंक असेल आणि काही प्रायव्हसी सेटिंग्ज पालक नियंत्रित करू शकतील.मात्र,चॅट्स आणि कॉल्सची माहिती पूर्णपणे खाजगी राहील.

 पालक हे ठरवू शकतील की मुलाला कोण मेसेज किंवा कॉल करू शकते.डिफॉल्ट सेटिंग अशी असेल की हे अकाउंट फक्त सेव्ह केलेल्या कॉन्टॅक्ट्सशीच संवाद साधू शकेल, ज्यामुळे अनोळखी लोकांशी संपर्काचा धोका कमी होईल. सध्या WhatsApp मध्ये असा पर्याय नाही की यूजर फक्त कॉन्टॅक्ट्सकडूनच मेसेज किंवा कॉल स्वीकारू शकेल. पण या नवीन फीचरमुळे हा गॅप भरला जाऊ शकतो.

नक्की वाचा >>> महिलेला 10 वर्षानंतर मुंबई लोकलमध्ये भेटली शाळेतील कडक शिक्षिका, व्हिडीओ पाहून विद्यार्थी म्हणाले, या बाईंनी..

WhatsApp ने आधीच स्पष्ट केले आहे की..

याशिवाय, पालक अकाउंटला काही सामान्य अ‍ॅक्टिव्हिटी अपडेट्सही मिळू शकतात, जसे सेटिंग्जमध्ये बदल किंवा अकाउंटशी संबंधित इतर माहिती. मात्र, WhatsApp ने आधीच स्पष्ट केले आहे की, मेसेजचे कंटेंट यात समाविष्ट केले जाणार नाही.सध्या हे फीचर डेव्हलपमेंट स्टेजमध्ये आहे आणि ते सर्व यूजर्ससाठी कधी रोलआउट केले जाईल,हे अजून स्पष्ट नाही.परंतु,जगभरात मुलांच्या ऑनलाइन सुरक्षिततेबाबतचा दबाव वाढत असल्याने असे मानले जात आहे की WhatsApp हे फीचर लवकरच स्टेबल व्हर्जनमध्ये आणू शकते.

Advertisement