आशिया खंडातील 'या' देशात मिळतात Rental Wife! कसा असतो करार? काय असतात अटी?

Rental Wife : या भागात लोकं भाड्यानं पत्नी घेऊ शकतात. त्याला वाईफ ऑन हायर आणि ब्लॅक पर्ल (black pearl) असंही म्हंटलं जातं.

जाहिरात
Read Time: 3 mins
प्रतिकात्मक फोटो
मुंबई:

Rental Wife : आग्नेय आशियातील थायलंड  (Thailand ) हा देश जगभरातील पर्यटकांना नेहमी खुणावत अलतो. थायलंडमधील समुद्र किनाऱ्यांवर नेहमीच पर्यटकांची गर्दी असते. पर्यटन हा या देशातील मुख्य व्यवसाय आहे. स्थानिकांचं आयुष्य मोठ्या प्रमाणात या व्यवसायाशी निगडीत आहे. अर्थात थायलंडची चर्चा काही वेगळ्या कारणांमुळेही होत असते. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका पुस्तकात थायलंडमध्ये भाड्यानं पत्नी मिळण्याच्या (Rental Wives) पद्धतीची माहिती देण्यात आली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

थायलंडमधील पटाया भागात ही परंपरा आहे. या भागात लोकं भाड्यानं पत्नी घेऊ शकतात. त्याला वाईफ ऑन हायर आणि ब्लॅक पर्ल (black pearl) असंही म्हंटलं जातं. हे लग्न तात्पुरत्या स्वरुपाचे असते. त्यामध्ये तरुणींना पैसे देऊन काही काळासाठी पत्नी बनवता येतं. त्या कालावधीमध्ये तरुणी पत्नीचे सर्व कर्तव्य पार पाडते. थायलंडधील काही भागात असलेली ही प्रथा आता व्यवसाय बनली आहे. वेगानं वाढत असलेला हा रेंटल वाईफचा प्रकार काय आहे? तो किती कालावधीसाठी असतो? कोणत्या तरुणी रेंटल वाईफ बनतात? या सर्वांची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. 

Advertisement

कसा झाला खुलासा?

लावर्ट ए इम्युनेल यांच्या 'थाय टॅबू-द -राईज ऑफ वाईफ रेंटल इन मॉर्डन सोसायटी, एक्सप्लोरिंग लव्ह, कॉमर्स अँड कॉन्ट्रव्हर्सी' या पुस्तकातून या प्रकाराची माहिकी संपूर्ण जगाला समजली. थायलंडमध्ये भाड्यानं पत्नी देण्याची वादग्रस्त प्रथा वेगानं वाढत आहे. ही प्रथा आता उत्पन्नाचा प्रमुख स्रोत बनलीय, अशी माहिती या पुस्तकात देण्यात आली आहे. 

Advertisement

( नक्की वाचा : AR रहमानच्या घटस्फोटानंतर Grey Divorce का आहे चर्चेत? त्याचं प्रमाण का वाढतंय? )
 

पर्यटकांना आकर्षण

थायलंडमध्ये विदेशी पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात. देशातील दूर्गम आणि ग्रामीण भागातील मुली पैशांसाठी त्यांच्या रेंटल वाईफ बनतात. थायलंडमधील पटाया रेड लाईट भागात बार आणि नाईट क्लबचं जाळं आहे. त्याच भागात हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढत आहे. 

Advertisement

गरीब घरातील महिला पैशांसाठी विदेशी पर्यटकांच्या पत्नी म्हणून वावरतात. हा औपचारिक विवाह नसतो. त्यामध्ये तात्पुरता करार केला जातो. या कराराचा कालावधी काही दिवस ते काही महिने असतो. महिला पैसे कमावण्यासाठी तसंच त्यांच्या कुटुंबाचं पोषण करण्यासाठी ही कामं करतात. या महिला प्रामुख्यानं नाईट क्लबमध्ये काम करणाऱ्या असतात. त्यांना चांगला ग्राहक मिळाला तर त्या रेंटल वाईफ होण्यास तयार असतात. त्यांच्या किरायची रक्कम महिलेचं वय, सौंदर्य, शिक्षण आणि कालावधी यानुसार निश्चित होते. 1600 डॉलर ते 116000 डॉलरपर्यंत ही रक्कम असू शकते. या प्रथेसाठी थायलंडमध्ये कोणताही कायदा नाही. 

( नक्की वाचा : तरुणांमध्ये वाढत असलेला Boysober रिलेशनशिप ट्रेंड काय आहे? यामध्ये मुलं-मुली काय करतात? )
 

कोरिया आणि जपानपासून प्रेरणा

थायलंडमध्ये ही प्रथा वेगानं वाढत असली तरी त्याचं मुळ जपान आणि कोरियामध्ये आहे. या देशात ही प्रथा यापूर्वीपासून अत्सित्वात आहे. थायलंडमध्ये ही प्रथा वाढण्याचे अनेक काराणं आहेत. शहरीकरण आणि व्यस्त आयुष्यामुळे लोकांचं एकटेपणा वाढतोय. त्यामुळे काही जण स्थायी नात्यांच्या ऐवजी तात्पुरते नातेसंबंध प्रस्थापित करण्यास भर देतात.

थायलंडमध्ये नातेसंबंधांमध्ये स्वातंत्र्य आणि लवचिकता आहे. त्यामुळे या प्रथेचा वेगानं प्रसार होत आहे. ही प्रथा देशात अस्तित्वात असून पर्यटकांमुळे त्याला व्यवसायाचं रुप आलंय, अशी कबुली सरकारनं दिलीय. ही प्रथा नियंत्रित करण्यासाठी कायद्याची गरज असल्याचं सरकारचं मत आहे. 

स्पष्टीकरण : ही माहिती सामान्य ज्ञानासाठी आहे. NDTV नेटवर्क या माहितीची कोणतीही खात्री किंवा समर्थन करत नाही. अधिक माहितीसाठी तुमच्या तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. 
 

Topics mentioned in this article