Tulsi leaves: तुम्ही रोज तुळशीची पानं खाता का? मग ही बातमी नक्की वाचा, जाणून घ्या साईड इफेक्ट

जशी तुळस फायदेशीर समजली जाते तसेच तिचे काही साईड इफेक्ट ही आहेत.

जाहिरात
Read Time: 1 min

तुळशीचा वापर आयुर्वेदात औषध म्हणून केला जातो. यामध्ये असलेले गुणधर्म आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का, की गुणधर्मांनी परिपूर्ण असलेली तुळस काही लोकांसाठी हानिकारक देखील ठरू शकते. तुळशीच्या पानांचे दुष्परिणाम काय आहेत आणि कोणी त्याचे सेवन करू नये, हे आपण जाणून घेवूयात. जशी तुळस फायदेशीर समजली जाते तसेच तिचे काही साईड इफेक्ट ही आहेत.   

तुळशीच्या पानांचे दुष्परिणाम काय आहेत?

ब्लड शुगर: तुळस रक्तातील साखरेची पातळी कमी करण्याचे काम करते. त्यामुळे जास्त प्रमाणात सेवन केल्यास साखरेची पातळी खूप कमी होऊ शकते, जे मधुमेहाच्या रुग्णांसाठी धोकादायक ठरू शकते.

प्रेग्नेंसी: तुळशीमध्ये 'युजेनॉल' नावाचा एक घटक आढळतो. ज्यामुळे मासिक पाळी सुरू होऊ शकते. त्यामुळे गर्भवती महिलांनी तुळशीचे सेवन करणे टाळावे.

नक्की वाचा - Curry Leaf: रिकाम्या पोटी प्या गरम पाण्यातच कढीपत्त्याचा रस, 'हे' आजार होतील एका क्षणात दूर

दात: तुळशीच्या पानांमध्ये असलेले काही सौम्य आम्लयुक्त (acidic) घटक जास्त प्रमाणात सेवन केल्यास दातांवरील 'इनॅमल' (enamel) कमकुवत होऊ शकते. ज्यामुळे दातांना नुकसान पोहोचू शकते.

जळजळ: तुळस ही उष्ण असते. त्यामुळे, तुळशीचा चहा किंवा काढा जास्त प्रमाणात पिल्याने पोटात जळजळ होऊ शकते. त्यामुळे तसं करणं शक्यतो टाळावे. 

Advertisement