रिलेशनशिपमध्ये आहात? ‘या’ 5 चुका कधीही करु नका, आयुष्यभर होईल पश्चाताप

रिलेशनशिपमध्ये असताना अनेक जण कळत-नकळत चुका करतात. यामधील काही चुकांना माफी मिळते. पण 5 चुकांना ती संधी नाही. या चुका कोणत्या आहेत? हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

प्रेमात पडणे ही कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यातील रोमँटिक गोष्ट आहे. पुस्तकात वाचलं सिनेमात पाहिलं तरी प्रेमात पडल्यानंतर येणारा प्रत्येक व्यक्तीचा अनुभव हा खास असतो. ‘दिवस तुझे हे फुलायचे... झोपाळ्यावाचून झुलायचे' या हळव्या गाण्यातील ओळी अनुभवण्याचा काळ म्हणजे प्रेम. प्रेम आणि त्यानंतर जोडीदारासोबत निर्माण होणारं नातं (Realitionship) हा आयुष्यातील रोमँटिक काळ असतो.

आयुष्यातील हा खास काळ घट्ट पकडून ठेवण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. अन्यथा हा सुंदर काळ सर्वात त्रासदायक आठवणींचा डोंगर बनायला वेळ लागत नाही.  रिलेशनशिपमध्ये असताना अनेक जण कळत-नकळत चुका करतात. यामधील काही चुकांना माफी मिळते. पण 5 चुकांना ती संधी नाही. या चुका कोणत्या आहेत? हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

5 गोष्टींमुळे होऊ शकतो ब्रेक अप (Causes of Break-up)

कम्युनिकेशन गॅप : कपल्समधील कम्युनिकेशन गॅप (communication gap) हे नात्यांमधील दुरावा निर्माण करणारे प्रमुख कारण आहे. एखादा पार्टनर आपल्या मनातील गोष्ट सांगायचा प्रयत्न करत असेल आणि दुसरा त्याला प्रतिसाद देत नसेल तर त्यांचं नातं खराब होऊ शकतं.

विश्वासाची कमतरता :  कोणतंही नातं हे विश्वासाच्या (Trust) भक्कम पायावर उभं असतं. नात्यामध्ये विश्वासाचा अभाव असेल तर दुभंगण्यास वेळ लागत नाही. त्यामुळे जोडीदारावर विश्वास ठेवणे आणि जोडीदाराचा विश्वास कमावणे या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत.

Advertisement

सतत नावं ठेवणं : आपल्या पार्टरनरला सतत नावं ठेवण्याची अनेकांना सवय असते. या पद्धतीनं आपण त्याला सत्याचा आरसा दाखवतोय, अशी त्यांची समजूत असते. तुम्हालाही ही सवय असेल तर त्यानं तुमचा घात होऊ शकतो. आपल्या जोडीदाराकडून सतत टोमणे ऐकल्यानं पार्टनर व्यथित होऊ शकतो. पार्टनकडून मिळणारा अपुरा पाठिंबा आणि हेटाळणी हे देखील ब्रेक अप (Break – up) चे महत्त्वाचे कारण आहे. 

आदर नसणे : नात्यामध्ये आदराची भावना नसेल तर पार्टनर वेगळा होण्याचा निर्णय घेऊ शकतो. आत्मसन्मान जपण्यासाठी अनेकदा नातं तोडण्याचा निर्णय त्याला घ्यावा लागतो. कोणतेही सकस नातं हे हेल्दी रिलेशनशिपमधूनच निर्माण होतं. हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे.

Advertisement

लपवा-छपवी :  एखादी छोटी गोष्ट देखील नंतर मोठी झाल्याची अनेक उदाहरणं आहेत. कोणत्याही नात्यामध्ये विशेषत:  एकमेकांच्या प्रेमात असलेल्या व्यक्तींनी ही चूक कधीही करु नये. प्रत्येक गोष्ट लपवण्याची सवय असले तर जोडीदाराचा तुमच्यावरील विश्वास कमी होऊ शकतो. त्याचा अंतिम परिणाम तुमच्या नात्यावर होतो. 

Topics mentioned in this article