Safety Tips: छत्री घेऊन रेल्वे ट्रॅकवर चालणं ठरेल जीवघेणं! 'ही' चूक तुम्ही करु नका; काय काळजी घ्याल?

Using Umbrella on Railway Tracks is dangerous Read Safety Tips: सततच्या पावसामुळे प्रत्येकजण छत्री घेतल्याशिवाय घराबाहेर पडत नाही. तुम्हीही जर छत्री घेऊन ऑफिसला जात असाल, ट्रेनने प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

 Why Using Umbrella On Railway Track is Dangerous:  सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. मुंबई पुण्यासह राज्यभरात पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळे चाकरमान्यांची चांगलीच दमछाक होत आहे. सततच्या पावसामुळे प्रत्येकजण छत्री घेतल्याशिवाय घराबाहेर पडत नाही. तुम्हीही जर छत्री घेऊन ऑफिसला जात असाल, ट्रेनने प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.

रेल्वेच्या रुळांजवळून छत्री घेऊन जाणे (Railway Tracks)  जीवघेणे (Fatal) ठरू शकते. अनेक लोकांना या धोक्याची कल्पना नसल्यामुळे, रेल्वे मार्गाजवळ छत्री वापरणे किंवा घेऊन उभे राहणे हे विजेचा धक्का (Electric Shock) लागण्याचे मोठे कारण बनू शकते. नेमकं काय आहे याचे कारण? जाणून घ्या..

२५ हजार व्होल्ट्सची वीज:
इलेक्ट्रिफाईड (Electrified) रेल्वे सिस्टीममध्ये ट्रेनला ओव्हरहेड (Overhead) तारांमधून तब्बल २५,००० व्होल्ट्स (25 kV) इतकी प्रचंड वीज पुरवली जाते. ही वीज ट्रेनच्या इंजिनपर्यंत पोहोचते आणि त्यानंतर एका विशिष्ट प्रणालीद्वारे जमिनीवर परत येते, ज्यामुळे प्रवाशांसाठी प्रवास सुरक्षित राहतो. मात्र, अनेकवेळा ही वीज जमिनीवर परतत असताना रुळाजवळ उभे असलेल्या व्यक्तींना किंवा त्यांच्याकडील वस्तूंना आकर्षित करू शकते. जर व्यक्तीकडे धातूची वस्तू (Metal Object) किंवा वीजवाहक (Conductor) पदार्थ असेल, तर धोका अनेक पटींनी वाढतो. मेटल फ्रेमची छत्री अशा वेळी विजेसाठी उत्कृष्ट वाहकाचे (Conductor) काम करते.

Railway Recruitment 2025: रेल्वेत नोकरीची संधी! तब्बल 1149 जागांवर भरती, कसा अन् कधी कराल अर्ज? जाणून घ्या

आर्किंगचा धोका:
जरी छत्रीने थेट ओव्हरहेडच्या तारांना स्पर्श केला नाही, तरीही उच्च व्होल्टेजमुळे वीज हवेतून उडी मारून छत्रीच्या मेटल भागापर्यंत पोहोचू शकते. या प्रक्रियेला 'आर्किंग' (Arcing) असे म्हणतात. यामुळे एक जोरदार आणि जीवघेणा विजेचा झटका लागू शकतो, जो काही प्रकरणांमध्ये तत्काळ मृत्यूचे (Instant Death) कारण ठरू शकतो. २५,००० व्होल्ट्सच्या विजेमध्ये, हा छोटासा आर्क (Arc) देखील इतका शक्तिशाली असतो की, त्यामुळे हृदयाची गती (Heart Rate) जागीच थांबते.

Advertisement

रेल्वेचे वारंवार आवाहन
भारतीय रेल्वेने वारंवार ओव्हरहेड लाईन्सजवळ (Overhead Lines) धातूच्या वस्तू घेऊन जाण्याबाबत किंवा उंचावण्याबाबत चेतावणी (Warning) दिली आहे. फक्त छत्रीच नव्हे, तर धातूच्या रॉड्स, तारांचे फुगे (Metal Wire Balloons), बांबूचे दांडे (Bamboo Poles) किंवा इतर कोणतीही धातूची वस्तू रेल्वे रुळांपासून दूर ठेवण्याचा सल्ला दिला जातो. प्लॅटफॉर्मवर (Platform) उभे असतानाही, ओव्हरहेड तारांपासून जास्त अंतर राखणे आणि छत्री खूप उंच न करणे सुरक्षिततेसाठी आवश्यक आहे.