रामराजे शिंदे, दिल्ली:
Mumbai Local Train Blast Update: 2006 रोजी मुंबई लोकल ट्रेनमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांच्या प्रकरणात एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने सर्व 12 आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती. या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. महाराष्ट्र सरकारने उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती, त्यानंतर आता सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे.
11 जुलै 2006 रोजी मुंबई लोकल ट्रेनमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांच्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला होता. 21 जुलै रोजी झालेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने सर्व 12 आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती. या प्रकरणात 2015 मध्ये ट्रायल कोर्टाने 5 जणांना फाशीची शिक्षा तर 7 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. कोर्टाने हा निकाल बदलल्यानंतर आश्चर्य व्यक्त केले होते.
या निर्णयाविरोधात राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. ज्याची आज सुनावणी पार पडली. या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाकडून या आरोपींच्या निर्दोष सुटकेला स्थगिती देण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारच्या याचिकेची चौकशी करण्यास सर्वोच्च न्यायालय तयार असून यासंबंधी सर्वोच्च न्यायालयाने आरोपींना नोटीसही बजावली आहे. मात्र आरोपी बाहेरच राहणार असल्याचेही कोर्टाने स्पष्ट केले आहे.
209 निष्पापांचा बळी, तरी सर्व आरोपी निर्दोष कसे? कोर्टाचा निकाल 5 मुद्द्यात समजून घ्या