देवा राखुंडे
पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यामध्ये सध्या दुष्काळी परिस्थिती आहे. मात्र या दुष्काळी परिस्थितीवर मात करून वीर येथील एका शेतकऱ्याने टोमॅटोचे उत्पन्न घेण्याचे धाडस केले. दुष्काळ असताना उन्हाळी टोमॅटो लावण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा धाडसी निर्णय आता त्याच्या पथ्यावर पडला आहे. या शेतकऱ्याला या टोमॅटोमधून मिळालेले उत्पन्न ऐकाल तर तुम्हीही थक्क व्हाल. त्यामुळे त्याने केलेल्या धाडसाचेही सर्वत्र कौतूक होत आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
वीर येथील शेतकरी प्रताप धुमाळ यांनी प्रथमचं उन्हाळी हंगामात आपल्या शेतात टोमॅटो लागवडीचा निर्णय घेतला. त्यासाठी जमिन तयार करुन फेब्रुवारी महिन्यात टोमॅटोची लागवड केली. यासाठी त्यांना चार लाख रुपये खर्च आला होता. बाजारात सध्या टोमॅटोची मागणी जास्त आहे. त्यातुलनेत उत्पादन कमी आहे. त्यामुळे टोमॅटोच्या एका कॅरेटला 400 ते 500 रुपये बाजार मिळतोय. त्यामुळे उन्हाळी परिस्थितीवर मात करून टोमॅटोचे उत्पादन घेणाऱ्या या शेतकऱ्याला चांगलाच फायदा झालाय.
ट्रेंडिंग बातमी - 'राम भाजपमुक्त झाला' नरेटिव्हवरून ठाकरेंची जोरदार फटकेबाजी
त्याने घेतलेल्या टॉमेटोला चांगला भाव मिळाला आहे. आतापर्यंत या शेतकऱ्याने जवळपास आठ लाख रुपये मिळवले आहेत. तर आणखी आठ लाख रुपये उत्पादन मिळेल असा त्याचा अंदाज आहे. त्यामुळे एका डेअरिंगने शेतकऱ्याला लखपती बनवले आहे. दुष्काळ असल्याने शेतकरी एकीकडे हवालदिल झाला आहेत. तर दुसरीकडे एका शेतकऱ्याने दुष्काळाची पर्वा न करता योग्य नियोजनाच्या आधारे टोमॅटोची शेतीकरत एक नवा आदर्श निर्माण केला आहे. त्यामुळेच या शेतकऱ्याचे सर्वत्र कौतूक होत आहे. कष्टाला मेहनतीची आणि योग्य नियोजनाची साथ मिळाली तर काही होते हेच त्याने दाखवून दिले आहे.