Mumbai Jogeshwari Fire: मुंबईमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईतील जोगेश्वरी (पश्चिम) परिसरात आज, गुरुवार, २३ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास एका उंच इमारतीत (High-rise Building) मोठी आग लागल्याची घटना घडली आहे. एस व्ही रोड, बेहरामपाडा, गांधी शाळेजवळ असलेल्या 'जेएनस बिझनेस सेंटर' (JNS Business Center) या इमारतीमध्ये ही आग लागल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) अग्निशमन दलाने (MFB) दिली आहे.
'जोगेश्वरीत भीषण अग्नितांडव'
सकाळी १० वाजून ५१ मिनिटांनी या आगीची माहिती मिळाली. याबाबतची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाने (MFB) या आगीला 'लेव्हल-२' (Level-II) प्रकारची आग म्हणून घोषित केले आहे. अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून, आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलासोबतच पोलीस (Police), १०८ रुग्णवाहिका (Ambulance), सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD), बीएमसीचे प्रभाग कर्मचारी (Ward Staff) आणि संबंधित वीज वितरण कंपनीचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, या घटनेमध्ये अद्याप कोणतीही जखमी किंवा जीवितहानी (Injury) झाल्याची नोंद नाही. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू असून, आगीच्या नुकसानीची आणि कारणांची अधिक माहिती लवकरच दिली जाईल.
Maharashtra Rain : चार दिवस पावसाचे! हवामान विभागाकडून अलर्ट जारी