महायुती सरकारने सुरू केलेली लाडकी बहीण योजना वारंवार नवनव्या वादात अडकत आहे. कधी निधीमुळे तर कधी लाभार्थींवरुन लाडकी बहीण योजना वादग्रस्त ठरत असल्याचं दिसून येत आहे. आता तर पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलं आहे.
लाडकी बहीण योजनेसाठी सरकारकडून वर्षाला 40 हजार कोटींचा खर्च येत आहे. याचा लाभ पुरुषांनी घेतल्याचंही समोर आलं आहे. गेल्या दहा महिन्यात लाडक्या पुरुषांना 21 कोटी 44 लाख रुपयांचं वाटप झाल्याची माहिती आहे. त्यामुळे आता या लाडक्या पुरुषांवर कारवाई होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
नक्की वाचा - Nitin Gadkari : 'सरकार म्हणजे बेकार काम', नागपुरातील अनुभव सांगत गडकरींनी दिला घरचा आहेर
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी सांगितलं की, महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेत धोका देऊन भाग होणाऱ्या पुरुषांविरोधात कारवाई केली जाईल आणि त्यांच्याकडून ही रक्कम वसूल केली जाईल. या लाडकी बहीण योजनेतील १४ हजार पुरुष लाभार्थी आहेत. या योजनेअंतर्गत महिलांना दरमहिन्याला १५०० रुपये मिळतात. यासाठी वार्षिक उत्पन्न, कुटुंबाची स्थिती याबाबत अनेक निकष लावण्यात आले आहेत. ही योजने गेल्या वर्षी २०२४ च्या ऑगस्टमध्ये सुरू झाली होती. यामुळे २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला फायदा झाला.
याबाबत अजित पवार म्हणाले, सरकारी नोकरी करणाऱ्या काही महिलादेखील लाभार्थी झाल्या होत्या, त्यांची नावं हटविण्यात आली आहे.