Ahmedabad Air India Plane Crash Live Updates: गुजरातमधील अहमदाबाद येथे झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातामुळे संपूर्ण देश हादरला आहे. विमानातील कोणत्याही प्रवाशांनी स्वप्नातही कल्पना केली नसेल की पुढच्या क्षणी त्यांचे काय होणार आहे विमानाने उड्डाण केल्यानंतर अवघ्या 30 सेकंदात 265 जणांचे जीव गेला. अहमदाबादहून निघालेले हे विमान बोईंग 787-8 विमान होते ज्यामध्ये 242 प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते. यापैकी 169 भारतीय नागरिक, 53 ब्रिटिश नागरिक, 1 कॅनेडियन नागरिक आणि 7 पोर्तुगीज नागरिक होते. या दुर्घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादमध्ये येणार आहेत.
Plane crash News: विमान अपघातातील मृतदेश शितगृहात ठेवण्याचा निर्णय
विमान अपघातातील मृतदेहांचे डीएनए नमुने घेण्यात आले आहे. तसेच नातेवाईकांचे देखील डीएनए नमुने घेण्यात आले आहे. मात्र डीएनए रिपोर्ट येण्यासाठी 72 तासाचा कालावधी लागू शकतो. याचमुळे शवविच्छेदन गृहात असलेले मृतदेह कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवण्यात येत आहेत.
Ahmedabad Plane Crash LIVE Updates: भारतातल्या सर्व बोईंग विमानांची तपासणी होणार
भारतातल्या सर्व बोईंग विमानांची तपासणी होणार आहे. तसे आदेश डीजीसीएने दिले आहेत. अहमदाबाद इथं झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
Ahmedabad Plane Crash LIVE Updates: विमान कोसळलेल्या हॉस्टेलच्यावरील बाजूस ब्लॅक बॉक्स मिळाला
अहमदाबाद विमान अपघातात, ज्या ठिकाणी विमान कोसळले त्या हॉस्टेलच्यावरील बाजूस ब्लॅक बॉक्स मिळाला आहे. अशी सुत्रांची माहिती आहे. या ब्लॅक बॉक्समुळे अपघात नक्की कशामुळे झाला हे समजण्यास मदत होणार आहे.
Ahmedabad Plane Crash Live Updates: होस्टेलच्या विद्यार्थ्यांना स्थलांतरीत केलं जाणार
विमान अपघातामध्ये पुण पणे जळालेल्या होस्टेलमधील विद्यार्थ्यांना स्थलांतरित केलं जाणार आहे. विजय हॉस्पिटल कॅम्पसमध्ये असणाऱ्या पीजी हॉस्टेलमध्ये या विद्यार्थ्यांना स्थलांतरित केला जाईल. या विद्यार्थ्यांना आपलं सामान घेण्यासाठी जळालेल्या होस्टेलच्या इमारतीमध्ये सोडण्यात आलं आहे.
Plane Crash LIVE Updates: तर मृतांचा आकडा आणखी वाढला असता
अहमदाबाद अपघातानंतर अनेक तर्क लावले जात आहेत. बीजे मेडिकल कॉलेज हॉस्टेल परिसर हा तुलनेने मोकळा आहे. विमान नियंत्रणाबाहेर गेल्यानंतर कमीत कमी नुकसान व्हावं यासाठी पायलटने हे विमान या परिसरात खाली आणले असावे असे देखील स्थानिक सांगतात. जर हे विमान घटना स्थळापासून काही मीटर अंतरावर असणाऱ्या लोकवस्तीवर कोसळल असतं तर मृतांचा आकडा मोठ्या संख्येने वाढला असता असं स्थानिकाचे म्हणणं आहे.
Plane Crash LIVE Updates: विमान अपघाताची चौकशी करा - रामदास आठवले
अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघाताची सखोल चौकशी करण्याची मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलीय. आता विमानात बसतानाही आपल्या मनात धाकधूक होतेय असंही आठवलेंनी म्हटलंय आहे.
Ahmedabad Plane Crash LIVE Updates: भगवद् गीता सुरक्षित राहिली, विमान अपघातानंतर सर्वच जण हैराण
अहमदाबाद विमान अपघातात सर्व काही उद्धवस्त झालं. 240 पेक्षा जास्त जणांनी आपले जीव गमावले. एका प्रवाशाचा मात्र जीव वाचला. सर्व विमान कोळसा झालं होतं. त्यात ही भगवद् गीतेची कॉपी मात्र सुरक्षित राहिली. त्यामुळे सर्वच जण जण हैराण झाले आहेत.
LIVE Updates: शनि शिंगणापूर देवस्थानचा मोठा निर्णय, 167 कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले
शनिशिंगणापूर देवस्थानचा मोठा निर्णय,शनि देवस्थान येथे कार्यरत असलेले 167 कर्मचाऱ्यांना कामावरून काढले
अहिल्यानगर
शनिशिंगणापूर देवस्थानचा मोठा निर्णय
शनि देवस्थान येथे कार्यरत असलेले 167 कर्मचाऱ्यांना कामावरून काढले
तर या कर्मचाऱ्यांमध्ये 114 मुस्लिम कर्मचाऱ्यांचा समावेश
शनी शिंगणापूर देवस्थान मध्ये 114 मुस्लिम कर्मचारी सध्या कार्यरत
अनियमितता आणि शिस्तच पालन न केल्याच्या कारणावरून काढण्यात आल्याचे संस्थाचे स्पष्टीकरण
तर गेल्या काही दिवसांपासून मुस्लिम कर्मचाऱ्यांना काढण्याबाबत हिंदू संघटना होता दबाव
शनि देवाच्या चौथ्यावर मुस्लिम लोकांच्या हाताने काम करून घेतल्यामुळे सकल हिंदू समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते
Emergency Landing: हवाई दलाच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग
अहमदाबादमध्ये घडलेल्या भीषण दुर्घटनेनंतर देशभरात शोक व्यक्त केला जात आहे. अशातच पठाणकोटमध्ये अपाचे या हवाई दलातील हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं आहे.
LIVE Updates: मृत व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली.. अहमदाबाद दुर्घटनेवर अण्णा हजारे हळहळले
जरातमधील अहमदाबाद येथे उड्डाण केलेल्या एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात घडला. या अपघातात 260 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला. विमान दुर्घटनेनंतर देशभरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे. विमान दुर्घटनेवर आज ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी आपला शोकसंदेश दिला असून या दुर्घटनेतील मृत व्यक्तींना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या प्रती संवेदना व्यक्त करतो असे अण्णा हजारे म्हणाले आहेत. याच वेळी त्यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात काही वर्षांपूर्वी गुजरात मध्ये झालेल्या भूकंपाचा देखील उल्लेख करत त्यावेळी नियोजन आयोगावर काम करण्याची संधी अण्णा हजारे यांना मिळाल्याचे सांगितले. या दुर्घटनेत माजी मुख्यमंत्री विजय रूपानी यांचे देखील निधन झाले. त्यांना देखील अण्णा हजारे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच अण्णांनी या घटनेनंतर त्यांचे सर्व संयुक्त कार्यक्रम काही काळासाठी स्थगित करत असल्याचे देखील जाहीर करण्यात आले आहे.
LIVE Updates: थायलंडमध्ये एयर इंडियाच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिग
थायलंडमध्ये एयर इंडियाच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिग करण्यात आले आहे. थायलंडहून दिल्लीला निघालेल्या या विमानामध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली. त्यानंतर तात्काळ विमानाचे एमर्जन्सी लँडिग करण्यात आले.
Ahmedabad Plane Crash Live Updates: पुणे अहमदाबाद विमानांना उशीर
पुणे अहमदाबाद विमानांना उशीर
अहमदाबाद लंडन विमान अपघातामुळे अहमदाबाद विमानतळ काही वेळ बंद ठेवण्यात आले होते.त्यामुळे पुण्यातून अहमदाबादला जाणाऱ्या दोन विमानांना फटका बसला.
एका विमानाच्या उड्डाणाला पाच तास उशीर झाला.तर, दुसऱ्या विमानाला एक तास उशीर झाला.
इंडिगो कंपनीचे विमान दुपारी तीन वाजून ५० मिनिटांनी अहमदाबादसाठी उड्डाण करणार होते.मात्र, अपघाताच्या घटनेमुळे या विमानाला उशीर झाला. हे विमान रात्री नऊ वाजता पाच तास उशिराने उड्डाण केले.
तर,अक्सा एअर कंपनीचे विमान पुण्यातून सायंकाळी पाच वाजून ५५ मिनिटांनी अहमदाबादसाठी उड्डाण करणार होते. मात्र, ते विमान रात्री पावणे सात वाजता सुटले. त्यामध्ये अहमदाबादला जाणाऱ्या प्रवाशांना फटका बसला.
Ahmedabad Plane Crash Live Updates: अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर बोईंग CEO यांचा पॅरिस एअर शो दौरा रद्द
अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर बोईंग CEO यांचा पॅरिस एअर शो दौरा रद्द
•एअर इंडिया 787 च्या भीषण अपघातानंतर Boeing आणि GE Aerospace यांनी सार्वजनिक कार्यक्रमांत सहभागी होणार नाही
•Boeing चे CEO पॅरिस एअर शोमध्ये जाणार नाहीत, अपघाताच्या तपासावर लक्ष
•GE Aerospace नेही नियोजित कार्यक्रम पुढे ढकलला
•अहमदाबादहून लंडनकडे जाणाऱ्या एअर इंडिया 787 विमानाचा अपघात, 240 हून अधिक प्रवाशांचा मृत्यू
•गेल्या दहा वर्षांतील सर्वात भीषण विमान अपघात आहे.
•बोईंग आणि GE सध्या चौकशीत सहकार्य करत आहेत
Ahmedabad Plane Crash Live Updates: विमान दुर्घटनेत यशा कामदार–मोढा यांचा मृत्यू
अहमदाबादमध्ये झालेल्या विमान दुर्घटनेत मूळ नागपूरच्या असलेल्या यशा कामदार–मोढा यांचा मृत्यू झाल्याने नागपूरच्या क्वेटा कॉलनी परिसरात शोककळा पसरली आहे.
यशा कामदार–मोढा यांच्यासोबत त्यांचा दीड वर्षांचा मुलगा रुद्र आणि सासू रक्षा मोढा यांचाही या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या दुहेरी आणि भावनिक धक्क्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
यशा कामदार–मोढा या आपल्या सासूसोबत आणि मुलासह लंडनला जात होत्या. चार वर्षांपूर्वी त्यांचे लग्न झाले होते आणि त्यानंतर त्या अहमदाबादमध्ये स्थायिक झाल्या होत्या.
नागपूरच्या क्वेटा कॉलनीतील त्यांच्या आई-वडिलांचे घर आहे. अपघाताची बातमी समजताच संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
Ahmedabad Plane Crash Live Updates: एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांना तातडीने बोलावलं
DGCA सूत्रांची माहिती :
- एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांना तातडीने बोलावलं
•अपघाताच्या तपासात पुढील कार्यवाहीसाठी बोलावण्यात आलं
•DGCA कडून चौकशी प्रक्रिया वेगात सुरू
•प्राथमिक माहिती आणि जबाब नोंदवण्यासाठी बोलावलं
Ahmedabad Plane Crash Live Updates: पंतप्रधान मोदींकडून दुर्घटनास्थळाची पाहणी
पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादमधील विमान अपघातस्थळी पोहोचले आहेत. ते येथे सुमारे 10 मिनिटे थांबले. घटनास्थळी पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदी परिस्थितीचा आढावा घेत आहेत. त्यानंतर पंतप्रधान मोदी रुग्णालयात जाऊन जखमींना भेटतील आणि त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतील. पंतप्रधान मोदी अपघाताबाबत आढावा बैठकही घेतील. या दरम्यान ते आतापर्यंत झालेल्या अपघाताची प्रत्येक अपडेट घेतील.
Ahmedabad Plane Crash Live Updates: PM मोदी विजय रुपाणींच्या कुटुंबियांची भेट घेणार
अदमदाबादमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी विमान दुर्घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर आता पीएम मोदी या विमान दुर्घटनेत मृत्यू झालेले माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत.
Ahmedabad Plane Crash Live Updates:
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातमध्ये दाखल झाले आहेत. अहमदाबादमधील विमान दुर्घटनास्थळी ते भेट देणार आहेत तसेच जखमींचीही विचारपूस करणार आहेत.
Ahmedabad Plane Crash Live Updates: एयर इंडियाकडून विमान दुर्घटनेतील प्रवाशांची माहिती
12 जून 2025 रोजी अहमदाबादहून लंडन गॅटविकला जाणारे विमान AI171 अपघातात सापडल्याची पुष्टी एअर इंडियाने केली आहे.12 वर्षे जुने बोईंग 787-8 विमान अहमदाबादहून दुपारी 1.38 वाजता निघाले होते, त्यात 230 प्रवासी आणि 12 कर्मचारी होते. उड्डाणानंतर लगेचच विमान कोसळले. आम्हाला कळवण्यास खेद आहे की, 242 प्रवाशांपैकी 241 जणांचा मृत्यू झाला आहे. एकमेव वाचलेल्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.प्रवाशांमध्ये 169 भारतीय नागरिक, 53 ब्रिटिश नागरिक, 7 पोर्तुगीज नागरिक आणि 1कॅनेडियन नागरिक यांचा समावेश आहे. वाचलेला व्यक्ती भारतीय वंशाचा ब्रिटिश नागरिक आहे.
LIVE Updates: एअर इंडियाचे CEO कॅम्पबेल विल्सन मेघानी नगरला घटनास्थळी दाखल
अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर एअर इंडियाचे CEO कॅम्पबेल विल्सन मेघानी नगरला घटनास्थळी दाखल झाले आहेत. मात्र त्यांनी माध्यमांशी बोलण्यास नकार दिला आहे.
Ahmedabad Plane Crash Live Updates: अहमदाबाद विमान दुर्घटनेत नागपुरच्या यशा कामदार यांचा मृत्यू
अहमदाबाद मध्ये झालेल्या विमान दुर्घटनेत मूळच्या नागपूरच्या असलेल्या यशा कामदार यांचा मृत्यू झाला आहे. यशा कामदार या आपले पती आणि सासू आणि आपल्या चार वर्षे मुलासोबत लंडनला जात होत्या. मूळच्या नागपूरच्या असलेल्या यशा कामदार यांचं काही वर्षांपूर्वी लग्न झाले होते . लग्नानंतर त्या अहमदाबाद मध्ये स्थायिक झाल्या होत्या . नागपूरच्या क्वेटा कॉलनी परिसरात कामदार यांच्या आई वडिलांचे घर आहे. या परिसरात या घटनेमुळे शोक काळा पसरली आहे.