Ajit Pawar: विमान कोसळल्यानंतर पुन्हा 4-5 स्फोट झाले, अजित पवारांच्या अपघातात प्रत्यक्षदर्शीने सर्व सांगितलं

Ajit Pawar Death News: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या घटनेचा प्रत्यक्षदर्शीने अत्यंत भयावह अनुभव सांगितला आहे. विमान कसे कोसळले आणि नेमके काय घडले?

जाहिरात
Read Time: 3 mins
"Ajit Pawar Plane Crash eyewitness: विमान अपघाताबाबत प्रत्यक्षदर्शीने दिली मोठी माहिती"

Ajit Pawar Plane Crash News Latest Updates: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या घटनेचा प्रत्यक्षदर्शीने अत्यंत भयावह अनुभव सांगितला आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका साक्षीदाराने सांगितले की,"मी हे सर्व माझ्या डोळ्यांनी पाहिले आहे. हे अत्यंत वेदनादायक आहे. विमान खाली उतरत असताना ते कोसळणारच असे वाटत होते. अचानक ते घिरट्या घेऊ लागले आणि क्षणातच अपघात झाला. त्यानंतर स्फोट झाला. मोठ्या आवाजासह विमानाला आग लागली. आम्ही सर्वजण धावत घटनास्थळी पोहोचलो तेव्हा विमानाने पेट घेतला होता. त्यानंतर विमानात पुन्हा चार-पाच स्फोट झाले. घटनास्थळी आणखी लोक आले आणि विमानातून लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण आग इतकी भीषण होती की कोणालाही मदत करता आली नाही. अजित पवार विमानात होते, ही बाब आमच्यासाठी अत्यंत दुःखद आहे. हे शब्दांत व्यक्त करणे अशक्य आहे."

लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करू शकलो नाही: प्रत्यक्षदर्शी

बारामती येथे झालेल्या या अपघाताच्या फोटोवरून विमान जमिनीवर किती वेगाने आदळले असावे, हे स्पष्ट दिसतंय. विमानाला लागलेल्या आगीत परिसरातील उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. विमानाचे भाग संपूर्ण परिसरात विखुरलेले होते. इंजिन आणि इतर सुटे भाग सर्वत्र पडलेले होते. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की,"विमान जोरदार स्फोटासह जमिनीवर आदळताच विमानाला भीषण आग लागली. आम्ही अनेक जण मदतीसाठी धावलो, पण आगीच्या तीव्र ज्वाळांमुळे विमानात अडकलेल्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्नही करू शकलो नाही". 

विमान अपघाताचे नेमके कारण काय?

विमान अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. विमानाचे इंजिन निकामी झाले की अन्य कोणता तांत्रिक बिघाड झाला होता, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. विमान अपघाताच्या चौकशीची जबाबदारी एएआयबी (AAIB) कडे सोपवण्यात आलीय.

Photo Credit: NDTV Marathi And PTI

(नक्की वाचा: Ajit Pawar Plane Crash CCTV Video: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताचे CCTV फुटेज समोर)

राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच इतर वरिष्ठ मंत्री घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत. अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार आणि मुलगा पार्थ पवार देखील बारामतीकडे निघाले आहेत. महाराष्ट्र सरकारने राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आलाय. 

Advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, बारामती परिसरात हवामान खराब झाले होते आणि पायलटने याबाबत एअर कंट्रोल रूमला माहिती दिली होती. पण विमान कोसळण्याच्या शेवटच्या क्षणी नेमके काय घडले, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

(नक्की वाचा: Ajit Pawar Passes Away: अपघातापूर्वी अजित पवार यांचा शेवटचा फोन या व्यक्तीला, नेमके काय झालं होतं बोलणं? वाचा सविस्तर)

Advertisement

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटाने अलीकडेच शरद पवार यांच्या गटासोबत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढवल्या होत्या. शरद पवार गटाच्या नेत्या आणि त्यांची चुलत बहीण सुप्रिया सुळे यांच्यासोबत त्यांनी पुण्यात निवडणूक प्रचारही केला होता. पण त्यांच्या पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही.