25 minutes ago

पुढचा उपमुख्यमंत्री कोण असावा? राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व कुणी करावे यासाठी आता पक्षात हालचालींना वेग आला आहे. आगामी अर्थसंकल्प लक्षात घेता राष्ट्रवादीत लवकर निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यासाठी प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यानी तातडीची पत्रकार परिषद बोलावली आहे. शिवाय पुढील रणनिती ठरवण्यासाठी पक्षाचे वरिष्ठ नेत्यांच्या बैठकी ही सुरू झाल्या आहेत. त्यातच पक्षाच्या सर्व आमदारांना मुंबईत येण्यास सांगण्यात आले आहेत. त्यामुळे पुढचे 48 तास राष्ट्रवादीसाठी महत्वाचे ठरणार आहेत. 

Jan 30, 2026 19:19 (IST)

NCP News: सुनिल तटकरे यांच्या निवासस्थानी महत्वाची बैठक सुरू

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या निवासस्थानी तातडीची बैठक होत आहे. या बैठकीसाठी सुनेत्रा पवार या ऑनलाईन हजर आहेत. या बैठकीत प्रफुल्ल पटेल ही उपस्थित आहेत. उद्याच्या शपथविधी बाबत यावेळी चर्चा होणार असल्याचं समजत आहे. 

Jan 30, 2026 19:16 (IST)

सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्री म्हणून उद्याच शपथविधी होण्याची दाट शक्यता आहे. 

उद्याच्या होणाऱ्या शपथविधी करिता तातडीची बैठक सुरू आहे.

राष्ट्रवादीच्या पाच नेत्यांमध्ये ही बैठक सुरू झाली आहे 

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीला सुरुवात. 

या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सुनील तटकरे प्रफुल पटेल करणार चर्चा 

त्यांच्या निर्णयानंतर उद्याचा शपथविधीचा वेळ कळविला जाणार.

 

उद्याच्या होणाऱ्या शपथविधीसाठी तातडीची बैठक सुरू.

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक सुरू. 

सुनील तटकरे, प्रफुल पटेल, सुनेत्रा पवार, यांच्यामध्ये बैठक सुरू,

Jan 30, 2026 19:13 (IST)

NCP News: सुनेत्रा पवारांचा उपमुख्यमंत्रीपदासाठी होकार

सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदासाठी आपला होकार कळवला आहे. त्यांचा हा निरोप नरेश आरोर घेवून मुंबईकडे रवाना झाले आहेत. सुनेत्रा पवार यांनी होकार दिल्यामुळे त्यांचा उपमुख्यमंत्री होण्याचा आता मार्गच मोकळा झाला आहे. उद्याच्या बैठकीत त्याच्यावर शिक्कामोहर्तब होणार हे नक्की झाले आहे. 

Jan 30, 2026 18:51 (IST)

NCP News: राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधीमंडळास पत्र

राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधीमंडळास पत्र 

उद्या आमदार बैठकीस जागा द्यावी अशी विनंती करणारं पत्र  

उद्या सकाळी 11 नंतर आमदरांची बैठक विधानभवन येथे होणार

या बैठकीत विधीमंडळ पक्षाचा नेता ठरण्याची शक्यता 

Advertisement
Jan 30, 2026 18:15 (IST)

NCP News: माणिकराव कोकाटेंची मोठी मागणी

अजित दादा नसल्याने अनेकांच्या मनात कुशंका निर्माण होत आहेत. दादांचे उत्तराधिकारी पवार कुटुंबियातील असतील. बैठक घेण्याचीही गरज नाही, एकमुखाने एकच मागणी म्हणजे सुनेत्रा पवार यांनीच राष्ट्रीय अध्यक्ष पद घ्यावे, जबाबदारी घ्यावी अस माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी स्पष्ट केलं आहे.  आम्ही सर्व आमदारांनी शरद पवारांना सोडले होते तेव्हा फक्त अजित दादांकडे बघितले होते. दादावर प्रेम, विश्वास होता बाकी काहीच शब्द नव्हता असं ही ते म्हणाले. आम्हाला नाशिकसह, अहिल्यानगर आणि अनेक जिल्ह्यातील  आमच्या आमदारांचे हे मत आम्ही एकमुखाने सुनेत्रा पवार यांच्या नावाचा ठराव पास करू.. दादांचे सर्व खाते वहिणींनी घ्यावे असा प्रस्ताव करू  असं कोकाटे म्हणाले. माणिकराव कोकाटे, सरोज आहिरे, हिरामण खोसकर, नितीन पवार या पत्रकार परिषदेत उपस्थितीत होते. सर्व राष्ट्रवादी आमदारांच्या डोळ्यात पाणी आले होते. 

Jan 30, 2026 18:11 (IST)

NCP News: पार्थ पवार राज्यसभेवर जाणार सुत्रांची माहिती

उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचं अध्यक्षपद सुनेत्रा पवारांकडे असणार. तर राज्यसभेची जागा पार्थ पवारांकडे जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.  

सुनेत्रा पवारांबाबत भाजपचं केंद्रीय नेतृत्व सकारात्मक आहे. सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्रीपद देण्याबाबत भाजप नेतृत्व सहमत असल्याचं ही समजत आहे. 

अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार बारामतीच्या राजकारणात सक्रीय. शरद पवारांकडून नीरा नदीची पाहणी. पवारांचा स्थानिक कार्यकर्त्यांशी संवाद

Advertisement
Jan 30, 2026 17:47 (IST)

NCP News: भुजबळ, तटकरे, पटेलांच्या वक्तव्यांचा अर्थ काय?

भुजबळ, तटकरे, पटेलांच्या वक्तव्यांचा अर्थ काय?

..........................

सुनेत्रा पवारांच्या नावावर राष्ट्रवादीची कोअर टीम एक दिसतेय

शरद पवार आणि त्यांचा गटाला सध्या कुठल्याच चर्चेत स्थान नाही

उपमुख्यमंत्रीपदासाठी पवार कुटुंबातून फक्त सुनेत्रा पवारांचं नाव

विलीनीकरणावर सध्या तरी राष्ट्रवादी पक्ष फार उत्सुक नाही

भुजबळ, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, धनंजय मुंडे हेच नेते सक्रिय

उद्याचा दिवस महत्वाचा, पुढच्या 48 तासात महत्वाच्या घडामोडी

उपमुख्यमंत्रीपदासाठी सुनेत्रा पवारांच्याच नावाला अग्रस्थान

Jan 30, 2026 17:17 (IST)

NCP News: दिलीप वळसे पाटील यांना तातडीने मुंबईत बोलवले

दिलीप वळसे पाटील यांना तातडीने मुंबईला बोलावले राज्याच्या राजकारणात वेगाने घडामोडी घडत आहेत. या पार्श्वभूमीवर वळसे पाटील यांना तातडीने बोलावल्याने राजकीय जाणकारांच्या भुवया उंचावल्या आहेत. सध्याच्या स्थितीत मोठा अनुभव असलेलं आणि अजित पवारांची सातत्याने साथ देणारे अशी छबी असल्याने त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी येण्याची शक्यता आहे. 

Advertisement
Jan 30, 2026 17:13 (IST)

NCP News: अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार बारामतीत सक्रीय

NCP News: अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार बारामतीत सक्रीय झाले आहेत. त्यांनी बारामतीच्या नीरा नदीची पाहणी केली आहे. 

Jan 30, 2026 17:12 (IST)

NCP News: राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबत अद्याप निर्णय नाही - भुजबळ

विधीमंडळ पक्षाचा नेता निवडला जाणार आहे. सीएलपी नेमणे महत्वाचे राष्ट्रीय अध्यक्ष यावर आताच काही निर्णय नाही असे ही  भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे. 

Jan 30, 2026 17:11 (IST)

NCP News: छगन भुजबळ नक्की काय म्हणाले?

छगन भुजबळ नक्की काय म्हणाले? 

आम्ही आज मुख्यमंत्री यांना भेटायला गेलो होतो तिथे टेन्टेटीव्ह असे ठरले होते की सीएलपीची मिटिंग बोलवायची आणि उद्या करायचे. पण दुखवटा असतो तर त्यामुळे अजून असे काही पत्र काढण्यात आलेले नाही.

आज आमच्या समोर सीएलपी लिडर यांची नेमणुक करणे म्हणजेच उपमुख्यमंत्री पदाची नेमणूक करणे हे महत्वाचे आहे.

आधी प्राधान्य काय आहे की सीएलपी नेमणे . त्यामुळे त्यादृष्टीने आमचे प्रयत्न चालू आहे. पुढल्या एक दोन तासात निर्णय होईल.

सीएम सोबत चर्चा झाली त्यांनी तुम्ही अंतिम ठरवा त्यानंतर करू असे म्हटले त्यांची हरकत नाही.

Jan 30, 2026 17:09 (IST)

NCP News: सुनेत्रा पवार यांना नेता करण्याचं ठरलं- भुजबळ

सुनेत्रा पवारांना आमचा नेता निवडण्याचं ठरलं असल्याचं ही छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे. 

Jan 30, 2026 17:08 (IST)

NCP News: राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा निर्णय पुढील दोन तासात

NCP News: राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा निर्णय पुढील दोन तासात होणार असल्याचं जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे. विधीमंडळ पक्षाचा नेता निवडणे हे आमच्यासाठी महत्वाचे आहे असं ही त्यांनी स्पष्ट केलं. सुनेत्रा पवार यांनाच विधीमंडळ पक्षाचा नेता निवडला जाणार असल्याचं ही भुजबळांनी स्पष्ट केले आहे.  त्यामुळे येत्या दोन तासात याबाबत निर्णय होईल असं ही त्यांनी सांगितलं.  

Jan 30, 2026 16:54 (IST)

NCP News: ...तर आम्ही स्वागत करू- उदय सामंत

कोणाला उपमुख्यमंत्रीपद द्यायचं हा राष्ट्रवादीचा विषय आहे असं उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले आहेत.  उद्या मुंबईमध्ये राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांसमोर सुनेत्रा पवार यांचे नाव पुढे येणार असेल तर त्याचं आम्ही स्वागत करू असं ही ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांना सर्व राष्ट्रवादीचे पदाधिकारी भेटले आहेत असं ही ते म्हणाले.  

Jan 30, 2026 16:51 (IST)

NCP News: अजित पवार यांचे ज्येष्ठ पुत्र पार्थ पवार यांच्या हस्ते अस्थीचे विसर्जन

अजित पवार यांचे  ज्येष्ठ पुत्र पार्थ पवार यांच्या हस्ते  अस्थीचे विसर्जन करण्यात आलं, यावेळी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार पुत्र पार्थ पवार जय पवार खासदार सुप्रिया सुळे आमदार रोहित पवार, आमदार राणा जगजीत सिंह पाटील, अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार, रणजीत पवार, रोहित पवार यांची वडील राजेंद्र पवार यांसह सर्व पवार कुटुंबीय उपस्थित होते.

Jan 30, 2026 16:50 (IST)

NC{ News: अजित पवारांच्या अस्थीचे पाच कलश

अजित पवार यांच्या अस्थीचे पाच कलश करण्यात आले आहेत, यापैकी एक कलश सोनगाव येथील कऱ्हा आणि निरा नदीच्या पवित्र संगमावरती विसर्जित करण्यात आलाय. तर जी राख असेल ती विद्या प्रतिष्ठान सह बारामती मधील विविध ठिकाणच्या झाडांसह आणि अजित पवारांच्या शेतात देखील विसर्जित केली जाणार असल्याची माहिती आहे. 

Jan 30, 2026 16:49 (IST)

NCP News: शुक्रवारी 30 जानेवारी रोजी सावडण्याचा विधी कार्यक्रम पार पडला

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बुधवारी 28 जानेवारी रोजी बारामती अपघात झाला. या अपघातात अजित पवार यांसह पाच जणांचा मृत्यू झाला.  शाश्रू नयनांनी अजित पवारांना गुरुवारी 29 जानेवारी रोजी मुखाग्नी देण्यात आला. त्यानंतर आज शुक्रवारी 30 जानेवारी रोजी सावडण्याचा विधी कार्यक्रम देखील पार पडलाय. यावेळी शरद पवार सुप्रिया सुळे, एकनाथ खडसे,सदानंद सुळे अजित पवार यांचे दोन्ही पुत्र पार्थ आणि जय पवार, आमदार रोहित पवार,अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांसह अवघा पवार परिवार आणि बारामतीकर उपस्थित होते.

Jan 30, 2026 16:43 (IST)

NCP News: सुनिल तटकरे कार्यालयात येवून अजित दादांच्या प्रतिमेसोर नतमस्तक

प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे हे आज दादांच्या अपघाती निधनानंतर प्रदेश कार्यालयात आले. दादांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक झाले. डोळे पाणावले होते. त्यानंतर दादांच्या केबिनमध्ये जाऊन दादा ज्याठिकाणी बसायचे त्या खुर्चीसमोर नतमस्तक झाले.

Jan 30, 2026 16:39 (IST)

NCP News: सुनिल तटकरे नक्की काय म्हणाले?

सुनील तटकरे नेमकं काय म्हणाले?

.............

आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली

सुनेत्रा पवार आणि कुटुंब धार्मिक विधीत आहे.

धार्मिक विधी झाल्यानंतर कुटुंबाशी चर्चा करु

त्यासंदर्भातली जी काही चर्चा आहे ते आम्ही ठरवू

वहिनींशी बोलणं, त्यांच्या कुटुंबाशी बोलणं गरजेचं आहे

एकत्र बसून चर्चा करु आणि निर्णय घेऊ

आमदारांशी बोलू, जनभावनेचा विचार करु

Jan 30, 2026 16:37 (IST)

NCP News: सुनेत्रा पवार यांचेच नाव उपमुख्यमंत्री म्हणून आघाडीवर

सुनेत्रा पवार यांचे नाव सध्या उपमुख्यमंत्रीपदासाठी आघाडीवर आहे. त्यासाठी पक्षातील अनेक नेते ही आग्रही आहेत. त्याचेच संकेत प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी ही दिले आहेत. शिवाय छगन भुजबळ यांनी तर स्पष्ट सुनेत्रा पवार यांचेच नाव घेतले आहेत. त्या जर उपमुख्यमंत्री होणार असतील तर त्यात चुकीचे असं काहीच नाही असं त्यांनी सांगितलं  आहे. शिवाय एकमत झाल्यास उद्याच शपथविधी होईल असं ही त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता फक्त औपचारीकता राहीली आहे अशी चर्चा सुरू झाली आहे. 

Jan 30, 2026 16:35 (IST)

NCP News: सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड होण्याची शक्यता

सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव विधीमंडळ पक्षाचे नेते म्हणून ठेवला जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुत्रांनी ही माहिती दिली आहे.  त्यामुळे उद्याच यावर एक मत झाल्यानंतर तातडीने सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी होण्याची  दाट शक्यता आहे. शिवाय सर्व आमदारांना उद्या मुंबईत हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. 

Jan 30, 2026 16:32 (IST)

NCP News: राष्ट्रवादीची उद्या महत्वाची बैठक होण्याची शक्यता

विधीमंडळ नेता निवडीसाठीची उद्या बैठक आहे. याबद्दलची माहिती मिळालेली नाही, या बैठकीचा निरोपही अद्याप मिळालेला नाही असे ही अनिल पाटील यांनी स्पष्ट केले आहे. पण शक्यता ही नाकारलेली नाही. 

Jan 30, 2026 16:30 (IST)

NCP News: सुनेत्रा पवारांसाठी राष्ट्रवादीचे नेते आग्रही

सुनेत्रा पवारांनी ही जबाबदारी स्वीकारावी, कार्यकर्ते म्हणून आमची जबाबदारी असेल की त्यांच्या पाठीशी उभे राहावे. - अनिल पाटील, नेते, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)

Jan 30, 2026 16:28 (IST)

NCP News: राष्ट्रवादीच्या विधीमंडळ पक्षाची उद्या बैठक होणार

NCP News: राष्ट्रवादीच्या विधीमंडळ पक्षाची उद्या बैठक होणार आहे. याबाबत राष्ट्रवादीचे नेते अनिल पाटील यांनी याबाबत अजून निर्णय झाला नाही. पण शक्यता असल्याचं एनडीटीव्ही सोबत बोलताना सांगितलं आहे. दरम्यान पक्षातील महत्वाचे पद हे सुनेत्रा पवार यांनाच द्यावे अशी मागणी पक्षातील नेत्यांनी केलं आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार याच उपमुख्यमंत्री होतील याची औपचारीकता राहीली असल्याचं ही बोललं जात आहे. 

Jan 30, 2026 16:24 (IST)

NCP News: उद्याच सुनेत्रा पवारांचा शपथविधी होण्याची शक्यता

उद्या जर एकमत झाले तर शपथविधीही उद्याच्या उद्या होऊ शकतो असं छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं आहे. सुनेत्रा पवारांबाबत छगन भुजबळ यांनी मोठे वक्तव्य केले आहे. 

Jan 30, 2026 16:23 (IST)

NCP News: एकमत झाल्यास सुनेत्रा पवारांचा उद्याच शपथविधी

उपमुख्यमंत्रीपदाची जागा खाली आहे, ती सुनेत्रा वहिनींच्या द्वारे ताबडतोब कशी भरता येईल याकडे आमचे लक्ष आहे असं ही छगन भुजबळ यावेळी म्हणाले. 

Jan 30, 2026 16:22 (IST)

NCP News: भुजबळांचे उपमुख्यमंत्रीपदाबाबत मोठं वक्तव्य

दादा ज्या पद्धतीने गेले मी तिथे प्रत्यक्ष जाऊन पाहिलं असं छगन भुजबळ म्हणाले आहेत. आपली ते पाहून झोप उडाली. शो मस्ट गो ऑन. कोणाकडे तरी ही जबाबदारी देून हे चालवलं पाहीजे. पक्ष असेल अथवा सरकार. उद्या विधीमंडळाचे सगळे सदस्य आहेत त्यांची बैठक बोलावली आहे. त्यामध्ये विधीमंडळाचे प्रमुख ठरवण्यासंदर्भात निर्णय होईल. सुनेत्रा पवारांकडे हे पद द्यावे असे अनेकांचे मत आहे, ते चूक आहे असे मला वाटत नाही. मात्र हा निर्णय सीएलपीमध्ये होईल असं भुजबळ म्हणाले. 

Jan 30, 2026 16:20 (IST)

NCP News: मुख्यमंत्र्यांची भेट झाली, निर्णय काही दिवसात होईल -तटकरे

मुख्यमंत्र्यासोबत भेट झाली आहे. सध्या पवार कुटुंबी सध्या धार्मिक विधीत आहेत. त्यानंतर आम्ही त्यांना भेटणार आहोत. जनतेच्या मनात, आमच्या मनात काय आहे हे आम्ही ठरवणार आहे. दोन दिवस सर्व जण शोकाकूल वातावरणात आहोत. बाकी कोणत्याही विषयावर चर्चा झाली नाही. मुख्यमंत्र्यां सोबत भेट झाली. पण दुसरी कोणतीही चर्चा झालेली नाही. 

Jan 30, 2026 16:18 (IST)

NCP NEWs: पत्रकार परिषद नव्हती असं तटकरेंनी केलं स्पष्ट

अजित पवारांच्या अनुपस्थित मला कार्यालयात यावं लागतं हे माझ्यासाठी क्लेशकारक. मी त्यांना नतमस्तक होण्यासाठी या कार्यालयात आलो. अजित पवारांनी हे कार्यालय उभं केलं आहे. त्यामुळे इथं आलो होतो असं सुनिल तटकरे म्हणाले. 

Jan 30, 2026 16:17 (IST)

NCP News: उपमुख्यमंत्रीपदाबाबत निर्णय घेणार - तटकरे

उपमुख्यमंत्री कोण होणार या बाबत पक्षात चर्चा केली जाणार आहे. त्याबाबत सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा केली जाईल असं ही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले आहे. पक्षात सध्या दुखाचं वातावरण आहे. त्यामुळे तातडीने कोणतीही चर्चा नाही. ती चर्चा वेळ आल्यावर नक्की केली जाईल. 

Jan 30, 2026 16:15 (IST)

NCP News: अजित पवारांच्या जाण्याने आम्हाला मोठा धक्का

अजित पवारांच्या जाण्याने राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. आम्ही दुखात आहोत असं सुनिल तटकरे यांनी सांगितले. दुसरी कोणती ही चर्चा पक्षात नाही. मुख्यमंत्र्यां सोबत बैठक झाली आहे. दुसरी तिसरी कोणती ही चर्चा झालेली नाही. 

Jan 30, 2026 16:14 (IST)

NCPLive Update: सुनिल तटकरेंच्या पत्रकार परिषदेला सुरूवात

NCPLive Update: सुनिल तटकरेंच्या पत्रकार परिषदेला सुरूवात झाली आहे. 

Jan 30, 2026 16:11 (IST)

NCPLive Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या महत्वाच्या नेत्यांची मुंबईत बैठक

NCPLive Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या महत्वाच्या नेत्यांची मुंबईत बैठक होत आहे. यासाठी प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे हे दाखल झाले आहेत. थोड्या वेळात ते पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यात मोठी घोषणा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.