Ajit Pawar Plane Crash : अजित पवारांचे अपघाती निधनाबद्दल 5 मोठे प्रश्न, रोहित पवारांनी मागितली उत्तरं

Rohit Pawar Press Conference : अजित पवारांचे पुतणे आणि आमदार रोहित पवार यांनी आज (मंगळवार, 10 फेब्रुवारी 2026) पत्रकार परिषद घेऊन विमान अपघातावर 5  प्रश्न विचारले आहेत. 

जाहिरात
Read Time: 3 mins
Ajit Pawar Death : अजित पवारांच्या अपघाती मृत्यूबाबत रोहित पवारांनी 5 प्रश्न विचारले आहेत.
मुंबई:

Ajit Pawar Death Mystery: माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून या विमान अपघाताबाबत आता संशयाची सुई फिरू लागली आहे. बारामतीमध्ये झालेल्या या भीषण अपघातावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी प्रश्न विचारले होते. त्यानंतर आज या अपघातावर पवार कुटुंबातून पहिल्यांदाच या अपघातावर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. अजित पवारांचे पुतणे आणि आमदार रोहित पवार यांनी आज (मंगळवार, 10 फेब्रुवारी 2026) पत्रकार परिषद घेऊन या संपूर्ण घटनेवर प्रश्व विचारले आहेत.  त्यांनी या विषयावर 5  प्रश्न विचारले आहेत. 

अजितदादांच्या अपघाताबाबत स्थानिक लोकांच्या प्रतिक्रिया आणि समोर आलेले सीसीटीव्ही फुटेज पाहता, विमान कंपनीचा दावा संशयास्पद वाटत असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे. यांत्रिक बिघाड झाला असावा, असे सांगत त्यांनी या प्रकरणाच्या खोलात जाण्याची मागणी केली आहे.

रोहित पवार यांनी उपस्थित केलेले 5 प्रश्न

रोहित पवार यांनी या पत्रकार परिषदेत अत्यंत तांत्रिक आणि महत्त्वाचे 5 प्रश्न विचारले आहेत, ज्यांची उत्तरे मिळणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी विचारलेला पहिला प्रश्न असा की, विमानात नेमका काय बिघाड झाला होता आणि हे मेकॅनिकल फेल्युअर होते का? दुसरा प्रश्न त्यांनी विचारला की, विमानाने उड्डाण करण्यापूर्वी त्याची रीतसर तपासणी केली होती का आणि ही तपासणी करणारे कर्मचारी नक्की कोण होते? 

तिसरा प्रश्न विमानाचा टेक लॉग आणि एअरवर्थी रिपोर्टबाबत आहे, हा रिपोर्ट सध्या कुठे आहे असा सवाल त्यांनी केला आहे. चौथ्या प्रश्नात त्यांनी विचारले की, विमानाची रुटीन लाईन मेंटेनन्स झाली होती का आणि ती कोणी केली होती, तसेच हॅन्गरचे सीसीटीव्ही फुटेज कुठे आहे? पाचवा आणि शेवटचा प्रश्न विमानाचा हेवी बेस मेंटेनन्स झाला होता का आणि त्याचा अधिकृत रिपोर्ट काय सांगतो? असा विचारला आहे.

Advertisement

( नक्की वाचा : Ajit Pawar Death: अजित पवारांच्या विमानात सुसाईड बॉम्ब? 50 कोटींचा विमा आणि... आजवरचा सर्वात मोठा आरोप )

घड्याळाचा तो भावनिक संदर्भ

अजित पवार आता आपल्यात नाहीत, हे सांगताना रोहित पवार भावूक झाले होते. अजितदादांच्या हातातील घड्याळाचा उल्लेख करत त्यांनी या अपघाताची भीषणता स्पष्ट केली. अजितदादांच्या हातातील ते घड्याळ पाहूनच त्यांचा खरोखर अपघात झाला आहे आणि ते आता आपल्याला सोडून गेले आहेत याची खात्री पटली, असे रोहित पवार यांनी अत्यंत जड अंतःकरणाने सांगितले. हा केवळ अपघात नसून त्यामागे काही तांत्रिक त्रुटी होत्या का, याची पडताळणी होणे आवश्यक असल्याची मागणी त्यांनी केली. 

( नक्की वाचा : Ajit Pawar Death :बॉम्ब,कट, अपघात की घातपात? अजित पवारांच्या मृत्यूभोवतीच्या 7 मोठ्या शंका; उत्तरं कधी मिळणार? )

अजितदादांच्या प्रेमापोटी गोळा केली माहिती

पत्रकार परिषदेत बोलताना रोहित पवार म्हणाले की, काही लोक आम्हाला विचारतील की आम्ही ही सर्व तांत्रिक माहिती कुठून आणि कशी गोळा केली. आम्ही सध्या सरकारमध्ये नाही, तरीही अजितदादांवरील प्रेमापोटी आम्ही ही सर्व माहिती जमा करण्याचा प्रयत्न केला आहे. शरद पवार आणि अजित पवार यांनी नेहमीच प्रयत्न करत राहण्याची शिकवण दिली आहे, त्याच प्रेरणेतून आम्ही ही माहिती लोकांसमोर आणली आहे. लोकांना नक्की काय घडले हे कळले पाहिजे, हीच आमची भावना असल्याचे रोहित पवार यांनी स्पष्ट केले.
 

Advertisement