Ajit pawar: अजित पवारांचा मृत्यू झालाय हे त्यांच्या आईंना माहितचं नव्हते, जवळच्या लोकांनी सांगितले की...

आपण दवाखान्यात जावू आणि दादाची तब्बेत पाहून येवू असं त्यांनी विठ्ठल पवार यांना सांगितले.

जाहिरात
Read Time: 2 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • अजित पवारांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याची बातमी वाऱ्या सारखी महाराष्ट्रात पसरली
  • अजित पवारांच्या आई आशाताई पवारांना अपघाताची बातमी पाहून काळजी वाटली
  • विठ्ठल बापूराव पवार यांनी आशाताईंना बारामतीला न जाण्याचा सल्ला दिला मात्र शेवटी त्यांना घेवून गेले
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
बारामती:

अजित पवारांचा विमान अपघातात मृत्यू झाला. विमान कोसळले तेव्हा सुरूवातीला अपघात झाला आहे. अजित पवार जखमी आहेत अशी बातमी देण्यात येत होती. त्याच वेळी बारामतीच्या काटेवाडीत शेतातल्या घरी अजित पवारांच्या आई आशाताई पवार होत्या. त्या वेळी नेहमी प्रमाणे त्या बातमीच पाहात होत्या. त्यांनी अजित पवारांचे विमान कोसळल्याची बातमी पाहीली. पण त्याच वेळी त्यांची काळजी घेण्यासाठी तिथे असलेल्या विठ्ठल बापूराव पवार यांनी काही झालं नाही असं आशाताईंना सागितलं. 

आशाताई पवार घरी एकट्याच होत्या. बातम्या टीव्हीवर सुरू होत्या. त्यामुळे विठ्ठल पवार यानी टीव्हीची वायरच कापली. बातम्या दिसणे बंद झाले. काही तरी झालं आहे याची कल्पना आशाताईंना आली. त्यावेळी काळजी घेणाऱ्या विठ्ठल पवार यांनी काही झालं नाही. अजितदादा ठिक आहेत. थोडं खरचटलं असेल. दादांना काही होणार नाही अशी समजूत आशाताईंची काढली. पण शेवटी ते आईचेच मन. त्या वेळी आशाताई म्हणाल्या ते सर्व ठिक आहे. तरी ही आपण बारामतीला जावू असं सांगितलं. 

नक्की वाचा - Ajit pawar Death: डोळ्यात अश्रू, तोंडातून शब्द ही फुटेना, शरद पवारांच्या पहिल्या प्रतिक्रियेने सर्वांनाच रडवले

आपण दवाखान्यात जावू आणि दादाची तब्बेत पाहून येवू असं त्यांनी विठ्ठल पवार यांना सांगितले. त्यांनी गाडी काढायला सांगितली. पण गाडीत बिघाड आहे असं सांगून त्यांनी काही वेळ आशाताईंना बारामतीला जाण्यापासून रोखून धरलं. पण त्या ऐकण्याच्या स्थितीत नव्हत्या असं विठ्ठल पवार यांनी सांगितलं.शेवटी त्यांना घेवून बारामतीला नेण्यात आलं. त्यावेळी त्यांना अजित पवारांचे निधन झाले आहे हे समजले. त्यावेळी आशाताईंवर मोठं आभाळ कोसळलं. डोळ्या देखत त्यांनी आपल्या मुलाचा मृत्यू पाहीला. 

नक्की वाचा - Ajit Pawar: अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पुढे काय होणार?, 'या' आहेत 5 शक्यता

अजित पवार हे आपल्या आईची भरपूर काळजी घ्यायचे असं विठ्ठल पवार यांनी सांगितले. बारामतीत आल्यानंतर ते  न विसरता आईला भेटायला येत होते. आईची रोज विचारपूस करायचे. काटेवाडीच्या शेतातल्या घरातही ते राहण्यासाठी येत होते. तिथं असल्यावर सकाळी शेतात फेरफटका होत असे. त्यांना शेतीची आवड होती असं ही यावेळी विठ्ठल यांनी सांगितलं. आता आमचा मालक गेला. त्यामुळे आम्ही पोरके झालो अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. आता सर्व संपले असं ही ते म्हणाले. 

Advertisement