VIDEO: रस्त्यात लोळली, सुसाट कारने बॅरिकेड्स तोडले अन्... पालखी सोहळ्यासाठी रस्ता अडवल्याने महिलेचा धिंगाणा!

अनेक ठिकाणी रस्ते बंद असल्याने नागरिकांना पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागत आहे. अशातच आळंदीमध्ये पालखी सोहळ्यानिमित्त रस्ते अडवल्याने एक महिला संतापल्याचे पाहायला मिळाले. 

जाहिरात
Read Time: 2 mins

सुरज कसबे, पिंपरी- चिंचवड 

Alandi Women Drama VIRAL VIDEO: आषाढी वारी दिंडी सोहळ्याला सुरुवात झाली असून दोन्ही मानांच्या पालखींचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले आहे. संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यानिमित्त ठिकठिकाणी वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी रस्ते बंद असल्याने नागरिकांना पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागत आहे. अशातच आळंदीमध्ये पालखी सोहळ्यानिमित्त रस्ते अडवल्याने एक महिला संतापल्याचे पाहायला मिळाले. 

Pune Palkhi Sohla: संत तुकोबाराया, माऊलींच्या पालखींचे आज पुण्यनगरीत आगमन! कुठे घ्याल दर्शन? कोणते रस्ते बंद?

नेमकं काय घडलं? 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा पुण्याकडे मार्गस्थ होत असताना वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने वाहतुकीत मोठे बदल करून अनेक रस्ते बंद केले होते. मात्र, यामुळे आळंदी नगरातील पीसीएस चौकात वाहतूक कोंडीत अडकलेल्या नागरिकांचा संताप अनावर झाल्याचे पाहायला मिळाले.

Advertisement

येथील एका संतप्त महिलेने तिला कामाच्या ठिकाणी तातडीने जाऊ देण्यासाठी वाहतूक पोलिसांकडे वारंवार विनंती केली; मात्र पोलिसांनी नकार देताच तिने थेट पोलिसांशी हुज्जत घालत रस्त्यावरील बॅरिकेड्सला जोरदार धडक दिली. यानंतर समोरून येणाऱ्या वारकऱ्यांच्या सुरक्षेची कसलीही पर्वा न करता, तिने अतिशय धोकादायक आणि वेगाने आपली कार थेट प्रतिबंधित मार्गावर दामटली.

दरम्यान, या धक्कादायक प्रकारामुळे चौकात काही काळ प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता. लाखो वारकऱ्यांच्या जिवाला धोका निर्माण करणाऱ्या या बेजबाबदार महिला चालकावर पोलीस आता काय कडक कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Marathwada News: जमिनीतून मोठा गूढ आवाज अन् हादरे; नागरिकांची मध्यरात्री पळापळ, 3 जिल्ह्यांमध्ये खळबळ