नऊ एकरावरील उभ्या पीकावर शेतकऱ्यानं फिरवला रोटाव्हेटर, म्हणाला मी तर...

आणखी किती दिवस वाट पाहायची असा प्रश्न त्यांना पडला होता. रब्बी हंगामासाठी जमिन तयार करण्याची गरज होती. कृषी कार्यालयाचे खेटे मारूनही काही झालं नाही.

Advertisement
Read Time: 2 mins
अमरावती:

विदर्भात अनेक ठिकाणी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. असं असतानाही काही शेतकऱ्यांनी आपलं पीक जगवण्याचा प्रयत्न केला. पीक कष्टाने जगवले. अशात पावसाने पुन्हा एका हजेरी लावली. अशा स्थितीत आलेलं पीकही खराब झालं. त्यातून आपल्याला पीक विम्याची तरी रक्कम मिळाली अशी अपेक्षा अंजनगाल सुर्जीचे शेतकरी मोहम्मद साबीर आणि त्यांच्या भावांना होती. पण वाट पाहून ही त्यांच्या पदरात काहीच पडले नाही. त्यामुळे शेवटी नाईलाजाने त्यांना आपल्या उभ्या पीकावर रोटाव्हेटर फिरवावा  लागला. शिवाय  सरकार दरबारीही कसा वेळ काढू पण झाला याचाही पाढा त्यांनी या निमित्ताने वाचला. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मोहम्मद साबीर हे अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जीचे शेतकरी आहे. त्यांची आणि त्यांच्या भावाची मिळून नऊ एकर शेती आहे. या शेतीत त्यांनी कापसाची लागवड केली होती. अंतरपीक म्हणून तूर लावली होती. पण अचानक पाऊस झाल्यानं आलेलं पीक खराब झालं. पण त्यातूनही त्यांनी कष्ट घेत पीक जगवलं. शेतमजूरही ठेवले. त्यांची मजूरी शेताच्या राखणीचा खर्च, लागवडीचा खर्च केला. पीक चांगलं आलं तर हाताला चार पैसे मिळतील अशी त्याला अपेक्षा होता. 

ट्रेंडिंग बातमी - दसरा मेळाव्याला शिवाजी पार्क मिळावे! अर्ज कोणी केला? ठाकरे की शिंदे गटाने?

पण शेतात मोठ्या प्रमाणात गवत आलं. पीकही पुन्हा आलेल्या पावसाने खराब झाले. त्यातून एकही रूपया मिळणार नव्हता. सर्व काही खराब झालं होतं. त्यामुळे त्यांनी कृषी कार्यालय गाठले. झालेली हकीगत सांगितली. पण त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यांना ऑनलाईन तक्रार द्यायला सांगितली. ती तक्रारही त्यांनी दिली. त्यांना सांगण्यात आलं की सर्वे करण्यासाठी काही लोक येतील. त्यानंतर तुम्हाला मदत दिली जाईल असेही सांगितले. 

ट्रेंडिंग बातमी - कांदा उत्पादक शेतकऱ्यांना खूशखबर! केंद्र सरकारचा निर्यात शुल्काबाबत मोठा निर्णय

तातडीने कारवाई होईल अशी त्यांना अपेक्षा होती. पण सर्वे करण्यासाठी कोणी आले नाही. मोहम्मद साबीर वाट पाहात राहीले पण पुढे काही झालं नाही. आणखी किती दिवस वाट पाहायची असा प्रश्न त्यांना पडला होता. रब्बी हंगामासाठी जमिन तयार करण्याची गरज होती. कृषी कार्यालयाचे खेटे मारूनही काही झालं नाही. शेवटी त्यांनी शेतात उभ्या असलेल्या कापसाच्या पीकावर  रोटाव्हेटर फिरवत संपूर्ण पीक नष्ट केलं. कापूस लावण्यासाठी जो खर्च केला त्यातला एकही रूपया हाती लागला नाही. हाती लागले ते फक्त अपयश. त्यामुळे शेतकरी मोहम्मद साबीर हतबल झाले आहेत. आता करायचं काय असा प्रश्न त्यांच्या पुढे पडला आहे.