नवरात्र उत्सवासाठी आंबेजोगाईचं योगेश्वरी मंदिर सज्ज, वाचा यंदा काय आहे खास?

Advertisement
Read Time: 2 mins
बीड:

स्वानंद पाटील, प्रतिनिधी

बीडच्या आंबेजोगाई येथील श्री योगेश्वरी देवीचा शारदीय नवरात्र उत्सवाला गुरुवारपासून (3 ऑक्टोबर) सुरुवात होत आहे.नवरात्रीनिमित्त मंदिराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.बीडचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सकाळी 8 वाजता घटस्थापना करण्यात येणार आहे.नवरात्र पर्वकाळात पाच लाखापेक्षा जास्त भाविक आंबेजोगाई येथे दाखल होणार असल्याने याची जय्यत  करण्यात आली आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

नवरात्र उत्सवाच्या दरम्यान मंदिर पहाटे 4 ते रात्री 11 वाजेपर्यंत भाविकांसाठी खुले असणार आहे.नवरात्र पर्वकाळात नऊ दिवस वेगवेगळ्या रंगांच्या पैठणीने तसेच अलंकाराने देवीची पूजा करण्यात येणार आहे.पहाटे मंदिर उघडल्यावर काकडारती करण्यात येते त्यानंतर दुपारच्या पूजेची आरतीआधी देवीला पुरणाचा नैवेद्य दाखवला जातो रात्री शेजारतीच्या वेळेला आरती करून मंदिर पुन्हा बंद केले जाते.

मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांसाठी महिला आणि पुरुषाच्या स्वतंत्र रांगा तसेच पासची एक वेगळी रांग असणार आहे. या पासाचे शुल्क 100 रुपये आहे. यंदा अपंगांसाठीही व्हील चेअरची  सुविधा देवल कमिटी कडून  उपलब्ध करण्यात आलेली आहे. नवरात्र उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी यावेळी भाविकांना भेटणार आहे यामध्ये भजन संध्या, भक्ती गीते, प्रवचन असे अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत.

( नक्की वाचा : नवरात्रीसाठी 400 रुपयांमध्ये मिळतील घागरा चोळी आणि जॅकेट, मुंबईतल्या 'या' मार्केटला लगेच द्या भेट! )

अष्टमीला होम हवन पूर्णाहुती नंतर  दसऱ्याला देवीची पालखी सिमोलंघनासाठी जाते. योगेश्वरी मंदिर पासून,मंडी बाजार, रविवार पेठ,खडकपुरा वेस,परळी वेस, अण्णाभाऊ साठे चौक,बस स्टँड,मोंढा , छत्रपती शिवाजी महाराज चौक गुरुवार पेठ या मार्गावरून पालखी पुन्हा मंदिरात दाखल होते.कोकणवासीयांची कुलदेवता अशी योगेश्वरी देवीची ओळख असल्याने राज्यातील भाविक तर दर्शनासाठी येत असतात याचबरोबर परराज्यातील  भाविक देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दर्शनासाठी येतात.

काय आहे आख्यायिका?

माता योगेश्वरी हे पार्वतीचे रूप मानले जाते. योगेश्वरी देवीचा विवाह  जवळच असलेल्या हत्तीखाना सभागृहात परळीच्या वैद्यनाथा सोबत होणार होता. हा विवाह सकाळी कोंबडा अरवायच्या आतच हा होईल अशी अट योगेश्वरी देवीकडून घातली गेली होती.अट पूर्ण न झाल्याने हत्तीखाना येथे आलेले सर्व देवता तिथेच मूर्तीरूपात स्थापित झालेले आजही दिसतात. तेव्हापासूनच योगेश्वरी देवीचे वास्तव्य आंबेजोगाईत आहे.

हेमाडपंथी बांधकाम

मंदिराचे बांधकाम हेमाडपंथी आहे, आभाऱ्यासमोरील मंडप खांबावर उभा केलेला दिसतो.योगेश्वरी मंदिराच्या कळसाला पाच मजले असून शिखरावर गणेशाचे योगिनी रूप ,देवी तसेच विष्णूंच्या वेगवेगळ्या अवताराचा मूर्ती असलेला कळस भाविकांचे लक्ष वेधून घेतो. यामुळे मंदिराच्या भव्यत्वाची प्रचिती येते.