रेवती हिंगवे, पुणे: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यामध्ये दिवसभर त्यांचे विविध कार्यक्रम असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे अमित शहा यांच्यासोबत सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहतील. दुसरीकडे अमित शाह यांच्या दौऱ्याकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र पाठ फिरवली आहे. अमित शाह यांच्या दौऱ्यामुळे पुण्यातील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
1) विद्यापीठ चौकाकडून बाणेर रोडने राधा चौकाकडे जाणाऱ्या वाहनांनी गणराज चौकामधून डावीकडे वळून किया शोरूम अंडरपास किंवा ननावरे अंडरपास मार्गे जावे.
2) मुंबई-बंगळुरू बायपासवरून बाणेर रोडवर जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांनी बालेवाडी जकात नाका येथून डावीकडे वळण घेऊन हायस्ट्रिट मार्गे गणराज चौकातून इच्छितस्थळी जावे.
3) पुणे शहरातून हिंजवडी, वाकड, लोणावळा, मुंबईकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी पुणे विद्यापीठ चौकातून बाणेर रोडमार्गे न जाता पाषाण रोडवरून चांदणी चौकमार्गे जावे अथवा पुणे विद्यापीठ चौकातून औंध रोड मार्गे जावे.
जड, अवजड वाहनांना बंदी...
1) पुणे विद्यापीठ चौक ते चांदणी चौक- पाषाण रोड
2) पुणे विद्यापीठ चौक ते राधा चौक- बाणेर रोड
3) पुणे विद्यापीठ चौक ते राजीव गांधी पूल - औंध रोड या रस्त्यावर सर्व प्रकारच्या जड, अवजड वाहनांना शनिवारी मध्यरात्री 12 ते रविवारी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत प्रवेश बंद राहणार
जड वाहनांना शहरात 24 तास बंदी..
शनिवार (दि. 22) मध्यरात्री 12 ते रविवार मध्यरात्री 12 वाजेपर्यंत शहरात सर्व प्रकारच्या जड, अवजड वाहनांना तसेच मिक्सर, डंपर, हायवा व स्लो मूव्हिंग (जेसीबी, रोड रोलर) वाहनांना सर्व रस्त्यांवर बंदी घालण्यात आली आहे.