Amravati Airport: 'अमरावतीचे माझ्यावर कर्ज, मी कायम कर्जात..', CM फडणवीस काय म्हणाले?

Amravati Airport Inauguration: विमानतळच नाही तर, उडान योजनेअंतर्गत केंद्र सरकारने आपलं पहिलं विमान दिले," असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

जाहिरात
Read Time: 2 mins

अमरावती: अमरावती विमानतळावरुन पहिले विमान आज मुंबईच्या दिशेने झेपावले. अमरावती विमानतळाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन, आकाश फुंडकर  तसेच विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचे विधान केले. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?

"अमरावती शहराचे माझ्यावर कर्ज आहे. माझी आई इथली आहे. मलाही कायम या कर्जामध्येच राहायचे आहे. त्यामुळे अमरावतीकरांसोबत माझे विशेष नाते आहे. अमरावतीत काही चांगलं झालं तर माझ्या आईला आनंद होतो. विमानतळच नाही तर, उडान योजनेअंतर्गत केंद्र सरकारने आपलं पहिलं विमान दिले," असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

"उडान विमान अंतर्गत विमान घेऊन अमरावती विमानतळावर येण्याची संधी मला मिळाली. डबल इंजिन सरकार असलं म्हणजे काय होतं, आमचे डबल बूस्टर सरकार आहे. त्यामुळे आमचे सरकार फास्ट चालत आहे. उडान अंतर्गत पहिलं विमान राज्य सरकारला मिळाले, त्यामध्ये बसून येता आले. अमरावती फक्त विमानतळ म्हणून ओळखले जाणार नाही त आशिया खंडातली सर्वात मोठे पायलट प्रशिक्षण अमरावतीत सुरू होणार आहे.दरवर्षी 180 पायलट अमरावतीत तयार होतील.. 34 विमान यासाठी राहणार आहेत.." अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. 

नक्की वाचा - अल्पवयीन मुलगी गर्भवती, नांदेडमध्ये प्रसुती, नवजात अर्भकालाही...; 55 वर्षीय उपसरपंचाच्या गुन्ह्यांची परिसीमा

त्याचबरोबर "देशातील 7 टेक्सटाईल पार्क मधील 1 पार्क अमरावतीला मिळाले. आपल्या टेक्स्टाईल पार्कमधून 2 लाख बेरोजगारांना रोजगार मिळणार आहे.कापूस उत्पादकांना टेक्सटाईल पार्कच्या माध्यमातून मोठा फायदा होणार आहे. नदी जोडचा प्रकल्प हाती घेतला. पश्चिम विदर्भातील पाच जिल्हे आणि पूर्व विदर्भातील दोन जिल्हे या प्रकल्पाला जोडले जाणार आहेत, असे म्हणत अमरावती विभाग महाराष्ट्र सरकारच्या पूर्णपणे त्या ठिकाणी अजेंड्यावर आहे," असे प्रतिपादनही त्यांनी केले. 

(नक्की वाचा-  Cabinet Meeting: यापुढे कोठडीत मृत्यू झाल्यास... राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 7 मोठे निर्णय!)