संसार सुरु होण्यापूर्वीच संपला! लग्नाच्या मंडपात नवरदेवाचा मृत्यू, मन सुन्न करणारी घटना

Groom Heart Attack News: लग्नाचे विधी आटोपल्यानंतर दोन तासांनी नवरदेवाला हृदयविकाराचा तीव्र झटका आला ज्यामध्ये त्याचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेने लग्नघरात शोककळा पसरली आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

शुभम बायस्कार, अमरावती:

Amravati Wedding News: लग्न म्हणजे दोन जिवांचा संगम.. दोन जिवांच्या नव्या आयुष्याला, सुंदर प्रवासाला अन् सहजीवनाच्या प्रवासापुर्वीचा सुंदर क्षण. दोन मनांसह दोन कुटुंबांना जोडणारा हा क्षण प्रत्येकासाठीच खास असतो. म्हणूनच लग्नघरात फक्त आनंद आनंद अन् आनंदाचेच क्षण असतात. मात्र अमरावतीमध्ये लग्नाच्या मांडवात काळीज पिळवटून टाकणारी दुर्दैवी घटना घडली आहे. लग्नाच्या अर्ध्या तासानंतर नवरदेवाला हार्ट अटॅक आल्याने त्याचा मृत्यू झाला. 

लग्नघरात शोककळा

समोर आलेल्या माहितीनुसार, लग्नसोहळा आटोपून सुखी संसाराला सुरुवात करण्याची स्वप्न पाहत असतानाच नवरदेवाचा मृत्यू झाल्याची मन सुन्न करणारी घटना अमरावतीच्या वरुड तालुक्यातील पुसला येथे मंगळवारी (ता.२५) दुपारी घडली. लग्नाचे विधी आटोपल्यानंतर दोन तासांनी नवरदेवाला हृदयविकाराचा तीव्र झटका आला ज्यामध्ये त्याचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेने लग्नघरात शोककळा पसरली आहे. 

T20 WC 2026: 'प्रत्येक फायनलचा सामना अहमदाबादलाच का?' आदित्य ठाकरेंचा संताप; ICCला सवाल

अमोल प्रकाश गोडबोले (३२, रा. पुसला), असे मृत नवरदेवाचे नाव आहे. तो पुसला येथील तलाठी कार्यालयात कोतवाल म्हणून सेवा देत होता. त्याचा विवाह नागपूर जिल्ह्यातील मोवाड येथील २६ वर्षीय युवतीशी ठरला होता. मनमिळाऊ स्वभाव यामुळे त्याच्या लग्नाच्या तयारीसाठी गावातील सर्वांनीच हातभार लावला होता. पुसला येथील मंगल कार्यालयातच २५ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजता सनई-चौघडे वाजले, मंगलाष्टके झाली. 

नवरदेवाचा मृत्यू

फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. लग्नसोहळ्यानंतर प्रत्येकजण आनंदात होता. अशातच दोन तासानंतर गाठजोड्यात खुर्चीवर बसलेला नवरदेव अमोल हा खाली कोसळला. त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. नातेवाइकांनी त्याला खासगी रुग्णालयात हलविले; परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

Advertisement

( नक्की वाचा : IND vs SA : ऐतिहासिक ! बुमराहने मार्करमचा स्टंप उखडताच 'तो' ब्रेक आला; 148 वर्षांत न पाहिलेला क्षण )

दरम्यान, अमोलचे पार्थिव शवविच्छेदनानंतर पुसला येथे आणण्यात आले. सायंकाळी लग्नासाठी गोळा झालेल्या वऱ्हाडींच्या उपस्थितीत त्याच्यावर अंत्यसंस्कार पार पडले. ज्या घरात लग्नाची लगबग सुरु होती, ज्या दोन जिवांचा सुखी संसार सुरु होणार होता, त्याच सोहळ्यात अशी दुर्दैवी घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 

Advertisement