Amul Price Cut: गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन (GCMMF) अर्थात 'अमूल'ने अमूलने देशभरातील ग्राहकांना एक मोठी 'भेट' दिली आहे. केंद्र सरकारने वस्तू व सेवा करात (GST) कपात केल्याचा थेट फायदा ग्राहकांना देण्यासाठी 'अमूल'ने 700 हून अधिक दुग्धजन्य उत्पादनांच्या किमतीत मोठी घट जाहीर केली आहे. नवे दर 22 सप्टेंबर, 2025 पासून देशभरात लागू होतील. त्यामुळे बटर, चीज, तूप आणि पनीर यांसारखी उत्पादने आता अधिक स्वस्त दरात उपलब्ध होणार आहेत
काय आहेत नवे दर?
किंमतीतील ही घट प्रामुख्याने तूप, बटर, आईस्क्रीम, चीज, पनीर, चॉकलेट्स, बेकरी उत्पादने, फ्रोझन स्नॅक्स, कन्डेन्स्ड मिल्क आणि अन्य उत्पादनांवर झाली आहे. अमूलच्या या निर्णयामुळे ग्राहकांना विविध दुग्धजन्य पदार्थ अधिक स्वस्त दरात उपलब्ध होणार आहेत.
प्रमुख उत्पादनांचे सुधारित दर (22 सप्टेंबरपासून लागू) होणार आहेत.
बटर (100 ग्रॅम): 62 रुपयांवरुन वरून 58 रुपये
तूप (1 लिटर): 650 रुपयांवरुन वरून थेट 610 रुपये, म्हणजेच प्रती लिटर 40 रुपये कपात.
अमूल प्रोसेस्ड चीज ब्लॉक (1 किलो): किंमत 575 रुपयांवरून 545 रुपये, म्हणजेच 30 रुपयांची कपात.
फ्रोजन पनीर (200 ग्रॅम): 99 रुपयांवरून 95 रुपये
काय आहे कारण?
अमूलने दिलेल्या निवेदनानुसार, किमतीतील या कपातीमुळे दुग्धजन्य पदार्थांचा वापर वाढण्यास मदत होईल. भारतात प्रति व्यक्ती दुग्धजन्य पदार्थांचा वापर अजूनही कमी असल्याने, या निर्णयामुळे विशेषतः आईस्क्रीम, चीज आणि बटर सारख्या उत्पादनांची मागणी वाढेल, अशी अपेक्षा आहे.
( नक्की वाचा : iPhone 16 Price Cut: आयफोन 16 वर सुपर डुपर सूट; 50 हजारांच्या खाली मिळतोय 'हा' स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत )
शेतकऱ्यांनाही फायदा
36 लाख शेतकऱ्यांच्या मालकीच्या अमूलने सांगितले की, किमतीतील कपातीमुळे उत्पादनांची मागणी वाढेल, ज्यामुळे त्यांचा एकूण व्यवसाय (turnover) वाढेल. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नालाही चालना मिळेल.
अमूलने यापूर्वीच वितरक (distributors), अमूल पार्लर आणि किरकोळ विक्रेत्यांना (retailers) या बदलांची माहिती दिली आहे. अमूलसोबतच 'मदर डेअरी'ने देखील 22 सप्टेंबरपासून आपल्या काही उत्पादनांच्या किमती कमी करण्याची घोषणा केली आहे.