Competitive Exam Training : आता 28 ऑगस्टपर्यंत अर्ज करा! ‘आर्टी’ देणार स्पर्धा परीक्षांचे मोफत प्रशिक्षण

Competitive Exam Training :  स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मातंग समाजातील विद्यार्थ्यांसाठी एक चांगली बातमी आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
प्रतिकात्मक फोटो ( Gemini AI)
मुंबई:

Competitive Exam Training :  स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मातंग समाजातील विद्यार्थ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (ARTI) तुम्हाला चांगल्या संस्थेत मोफत प्रशिक्षण देणार आहे. या प्रशिक्षणासाठी अर्ज करायची तारीख आता 28 ऑगस्ट 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे, जर तुमचा अर्ज करायचा राहिला असेल, तर तुम्ही लगेच ऑनलाईन अर्ज करू शकता.

कुणाला करता येईल अर्ज?

मांग, मातंग, मिनिमादिग, दखनी- मांग, मांग- म्हशी, मदारी, गारुडी, राधेमांग, मांग गारोडी, मांग गारुडी, मादगी व मादिगा समाजातील जे उमेदवार 12 वी आणि पदवीधर परीक्षा उत्तीर्ण आहेत अशा पात्र उमेदवारांनी https://barticet.in/ARTI या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन ऑनलाईन स्वरुपात अर्ज करावेत.

29 ते 30 ऑगस्ट 2025 हे दोन दिवस उमेदवारांनी त्यांच्या ऑनलाईन अर्जात दुरुस्ती आणि प्रिंट काढण्यासाठी देण्यात आले आहेत. त्यानंतर या प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांची सामयिक प्रवेश परीक्षा (Common Entrance Test-CET) घेऊन गुणवत्तेनुसार निवड करण्यात येणार आहे.

( नक्की वाचा : Home Loan : तुमचा EMI कमी होणार, 'या' बँकांनी कमी केले व्याज दर, इथे करा चेक )
 

11 महिन्यासाठी स्पर्धा परीक्षेचे पूर्व प्रशिक्षण

राज्यातील पात्र व इच्छुक उमेदवारांसाठी 11 महिन्यांकरीता यूपीएससी, एमपीएससी राज्यसेवा, अराजपत्रित सेवा, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा (एमईएस), न्यायिक सेवा (जेएफएमसी) आणि सहा महिन्यांसाठी बँक (आयबीपीएस), कर्मचारी निवड आयोग (एसएससी), पोलीस- सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण खासगी नामांकित व्यवसायिक प्रशिक्षण संस्थेमार्फत देण्यात येणार आहे.

Advertisement

विशेष म्हणजे, 11 महिन्यांच्या प्रशिक्षणादरम्यान तुम्हाला दर महिन्याला 6 ते 13 हजार रुपये stipend (विद्यावेतन) दिले जाईल. तसेच, पुस्तकांसाठी आणि इतर खर्चांसाठी 12 ते 18 हजार रुपये वेगळे मिळणार आहेत. 
 

Topics mentioned in this article