Ashadhi Wari: लंडन ते पंढरपूर ! 11 देश, 50 दिवस अन् शेकडो विठ्ठल भक्त, जगातील पहिली ग्लोबल दिंडी

जवळपास 50 दिवसांचा हा प्रवास असणार आहे. त्यानंतर परदेशात राहणाऱ्या मराठी लोकांची ही दिंडी भारतात येणार आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
पंढरपूर:

संकेत कुलकर्णी 

आषाढी एकादशीसाठी देशभरातू विठ्ठल भक्त पंढरपूरमध्ये येत असतात. राज्यातून ही अनेक दिंड्या पंढरपूरमध्ये येतात. माऊलींचा पालखी सोहळा ही आळंदीहून 8 जुलैला पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवेल. मात्र आता जगातील पहिल्या ग्लोबल दिंडीने पंढपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवले आहे. 6 जूनला ही दिंडी लंडनहून निघाली आहे. या दिंडीचे वैशिष्ट्य म्हणजे 11 देशातून ही दिंडी 50 दिवसांचा प्रवास करून 26 जुलैला आषाढी एकादशी दिवशी पंढरपूरमध्ये दाखल होणार आहे. या दिंडी सोबत इंग्लंडमध्ये राहाणारे शेकडो मराठी विठ्ठल भक्त आहेत. ज्या वेळी ही दिंडी निघाली त्यावेळी त्यांचा उत्साह पाहण्या सारखा होता. 

महाराष्ट्राला आषाढी वारीचे वेध लागले आहेत. आषाढीच्या वारीचं सगळ्यांनाच अप्रुप आहे. आता महाराष्ट्राची संस्कृती असणारी पंढरपूरची वारी ग्लोबल होत आहे. यंदा थेट लंडनमधील विंडसर येथून पंढरपूरकडे मराठी लोकांची दिंडी निघाली आहे. ही दिंडी लंडन , नेदरलँड , बेल्जियम , फ्रान्स , लक्झमबर्ग , जर्मनी , पोलड, झेक रिपब्लिक , हंगेरी , तुर्की , जॉर्जिया अशा देशांचा प्रवास करणार आहे. त्यानंतर ती भारतात दाखल होणार आहे. विठूनामाचा गजर करत ही दिंडी युरोपातून आता भारताकडे निघाली आहे. युरोपातील वेगवेगळ्या देशात ती मुक्का करणार आहे. 

Advertisement

नक्की वाचा - Trending News: न्यूजपेपरच्या कागदात आता विकता येणार नाही वडापाव, तसं कराल तर थेट..., FDA चा मोठा निर्णय

जवळपास 50 दिवसांचा हा प्रवास असणार आहे. त्यानंतर परदेशात राहणाऱ्या मराठी लोकांची ही दिंडी भारतात येणार आहे. 6 जुलैला या दिंडीचे लंडन येथून प्रस्थान झाले आहे. पंढरपूर मध्ये 25 जुलैला पहिली ग्लोबल वारी जाऊन पोहोचेल. विशेष म्हणजे भगव्या पताका, टाळ मृदुंगाचा गजर, आणि पालखी घेऊन ही दिंडी लंडन मधून निघाली आहे. यावेळी 100 ढोल ताशांचा निनाद देखील झाला. याचा विश्वविक्रम ही मराठी लोकांच्या नावे लंडनमध्ये नोंदव लागेल आहे. अनिल खेडकर या मराठी विठ्ठल भक्ताच्या संकल्पनेतून या दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. ही वारी लंडनहून रवाना झाली त्यावेळी मोठ्या संख्येने मराठी भक्त यावेळी उपस्थित होते. 

नक्की वाचा - LPG price hike: महागाईचा भडका! सिलिंडर 29 रुपयांनी महाग, महाराष्ट्रातला दर किती?

दरम्यान आषाढी वारीसाठी वारकऱ्यांचे आराध्य दैवत असलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे प्रस्थान 8 जुलै रोजी होणार आहे. आळंदीतून माऊलींची पालखी प्रस्थान ठेवेल. 33 दिवसांच्या या  प्रवासानंतर हा सोहळा 8 ऑगस्ट रोजी पुन्हा आळंदीत परतणार आहे. आळंदी देवस्थानचे विश्वस्त आणि दिंडी समाज संघटन यांनी ही माहिती दिली आहे. या वर्षाच्या पालखी सोहळ्याचे सविस्तर वेळापत्रक ही निश्चित करण्यात आले आहे.