सुरज कसबे, पिंपरी चिंचवड
Sant Dnyaneshwar Mauli Palkhi Sohala 2026: संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी वारी पालखी रथाची बैलजोडी जुंपण्यावरून रानवडे कुटुंबियांमध्ये सुरू असलेला वाद अखेर आळंदी देवस्थान कमिटीच्या मध्यस्थीने मिटला आहे. यंदाचा मान रानवडे घराण्याला असताना निवड समितीने सुरुवातीला केवळ तुळशीराम आणि हर्षवर्धन रानवडे यांच्या नावांची शिफारस केल्यामुळे, डावलले गेलेले उमेश लक्ष्मण रानवडे आपल्या बैलजोडीसह संजीवन समाधी मंदिराबाहेर उपोषणाला बसले होते. यावर तोडगा म्हणून घरातील तिघांनाह मान देण्यात आला आहे. त्यामुळे वारीच्या इतिहासात पहिल्यांदाच एकाच घरातील तिघांना मान देण्यात आला असून पहिल्यांदाच तीन बैलजोड्या माऊलींचा रथ ओढणार आहेत.
TMC Recruitment: ठाणे महापालिकेत नोकरीची संधी! 'या' विभागात 601 पदांची जम्बो भरती; वाचा सर्व डिटेल्स
वारीच्या इतिहासात पहिल्यांदाच 'असं' घडणार!
याबाबत सविस्तर माहिती अशी की, यंदा संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी रथ ओढण्याचा मान रानवडे कुटुंबियांना देण्यात आला होता. त्यासाठी बैलजोडी समितीने तुळशीराम रानवडे आणि हर्षवर्धन रानवडे या दोघांची शिफारस केली होती, मात्र यातून उमेश रानवडे यांच्या घराण्याला डावलण्यात आल्याचा आरोप उमेश रानवडे यांनी केला.
यंदा मान आमच्या घराण्याला असताना आमची शिफारस का करण्यात आली नाही ? आम्हाला डावलून तुळशीराम आणि हर्षवर्धन रानवडे यांना का देण्यात आला ? अशी विचारणा करत उमेश रानवडे हे त्यांच्या बैलजोडी सह माऊलींच्या संजीवन समाधी मंदिराबाहेर सहकुटुंब उपोषणास बसले होते. मला मान नकोय पण माऊलींच्या पालखी सोहळ्यात आमच्या बैलजोडीच्या रूपाने सेवा करण्याची संधी मिळावी अशी भावना उमेश रानवडे यांनी व्यक्त केली होती.
एकाच घरातील तिघांना मान, तीन बैलजोड्या ओढणार माऊलींचा रथ
यावर देवस्थान कमिटीने सकारात्मक तोडगा काढत रानवडे घराण्यातील तिघांनाही जिल्हावार बैलजोडी लावण्याचा मान विभागून दिला आहे. त्यानुसार पुणे जिल्ह्यात जाताना व येताना हर्षवर्धन प्रदीप रानवडे, सातारा जिल्ह्यात उमेश लक्ष्मण रानवडे, तर सोलापूर जिल्ह्यात तुळशीराम ज्ञानोबा रानवडे यांच्या बैलजोड्या माऊलींचा रथ ओढणार आहेत. या यशस्वी तोडग्यामुळे रानवडे कुटुंबियांमधील वाद पूर्णतः निवळला असून माऊलींच्या पालखी सोहळ्याचा मार्ग सुकर झाला आहे.
Vashi APMC News: कचऱ्यातील सडलेल्या भाज्या मुंबईकरांच्या ताटात? वाशी मार्केटमधील VIDEO ने खळबळ