Ashok Kharat Case: 'मी महिला...', रुपाली चाकणकरांचा SIT चौकशीला हजर राहण्यास नकार, अजब कारण सांगितलं

याचबाबत आता मोठी अपडेट समोर आली असून रुपाली चाकणकर यांनी एसआयटी चौकशीसाठी नाशिकला येण्यास नकार दिल्याचं सांगण्यात येत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

यशपाल सोनकांबळे, पुणे:

Nashik Ashok Kharat Case:  अशोक खरात प्रकरणात कनेक्शन समोर आल्यानंतर राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. याप्रकरणी रुपाली चाकणकर यांना एसआयटीने समन्स बजावले असून त्यांना चौकशीला बोलावण्यात आले आहे. याचबाबत आता मोठी अपडेट समोर आली असून रुपाली चाकणकर यांनी एसआयटी चौकशीसाठी नाशिकला येण्यास नकार दिल्याचं सांगण्यात येत आहे.

रुपाली चाकणकर यांचा एसआयटी चौकशीस नकार 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी नाशिक पोलीस अकॅडमी येथे सुरू असलेल्या स्पेशल इन्वेस्टीगेशन टीम (एस आय टी) चौकशीला सामोरे जाण्यास नकार दिला आहे. मी महिला आहे आणि प्रवासात वेळ जात असल्याचे हास्यास्पद कारण देत रुपाली चाकणकर यांनी नाशिकला येण्यास असमर्थता दर्शवली आहे. 

Advertisement

Solapur News: करमाळ्यातून अचानक गायब होत आहेत मुली-महिला; तालुक्यात भीतीचं वातावरण!

याऊलट त्यांनी ही चौकशी पुणे किंवा मुंबईमध्ये व्हावी, अशी मागणी केल्याचेही सांगण्यात येत आहेत. महत्त्वाचं म्हणजे रुपाली चाकणकर या त्यांच्या पुण्यामधील निवासस्थानीही वास्तव्यास नसल्याचे समोर आले आहे. त्या नाशिकला पोहोचल्याचे सुत्रांनी सांगितले आहे. एकूणच रुपाली चाकणकरांच्या या भूमिकेमुळे त्यांचे खरात प्रकरणात नेमकं कनेक्शन काय? याचे गुढ आता वाढत चालले आहे. 

रुपाली चाकणकरांची खालील मुद्द्यांवर होणार चौकशी

  • भोंदू बाबा कॅप्टन खरात यांच्याशी ओळख कशी झाली? किती वर्षांपासून संपर्कात होत्या ?
  • राज्य महिला आयोगाच्या पदावर असताना पदाचा व कार्यालयाचा (प्रॉफिट ऑफ ऑफिस) दुरुपयोग करून कोणकोणते लाभ खरातला मिळवून दिले?
  • कॅप्टन खरातने निर्माण केलेल्या स्थावर आणि जंगम मालमत्तेशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध आहे का ?
  • कॅप्टन खरातने स्थापन केलेल्या चार-पाच कंपन्यांशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध आहे का?
  • जलसंपदा खात्याकडून धरणातील पाण्याचा साठा आरक्षित करून श्री शिवनिका संस्थेपर्यंत 40 किलोमीटरची जलवाहिनी टाकण्यास मदत केली होती का ?
  • सीए ललित पोफळे आणि चाकणकर एकमेकांच्या संपर्कात होते का ?
  • सीए ललित पोफळे कॅप्टन खरातचा आयपीओ मार्केटमध्ये आणणार होता त्याबद्दल काही कल्पना होती का?
  • आजी माजी मंत्री, आमदार, खासदार, प्रशासकीय अधिकारी यांचा काळा पैसा पांढरा करण्यासाठी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत केली होती का? 
  • 80G अंतर्गत श्री शिवानीका संस्थेला मिळालेल्या कोट्यवधींच्या निधीतून इन्कम टॅक्स रिबीट मिळवून दिले गेले का ?
  • कॅप्टन खरातच्या संपर्कातील पीडित महिलांवर प्रभाव टाकला होता का?