उलट्या पायाने चालणारा वारकरी, वारीमध्ये 'या' अवलियाची चर्चा

वारीची एक वेगळीच परंपरा आहे. वारकरी ती पाळतात आणि आषाढी एकादशीला पंढरपूरात पोहचतात. अनेक वारकरी हे माऊलीच्या पालखी बरोबर पायी वारी करतात. तसाच एक वारकरी आहे. तो ही पायी वारी करतो. पण त्याची पायी वारी थोडी वेगळी आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
पुणे:

आषाढी एकादशीच्या निमित्ताने वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघाले आहे. अनेक जण पायी वारी करत आहेत. माऊलींच्या पालख्याही पंढरपुरच्या दिशेने निघाल्या आहेत. वारकरी आपल्या परीने पंढरपूर गाठतात. विठ्ठलाचे दर्शन घेतात आणि आपली वारी पुर्ण करतात. वारीची एक वेगळीच परंपरा आहे. वारकरी ती पाळतात आणि आषाढी एकादशीला पंढरपूरात पोहचतात. अनेक वारकरी हे माऊलीच्या पालखी बरोबर पायी वारी करतात. तसाच एक वारकरी आहे. तो ही पायी वारी करतो. पण त्याची पायी वारी थोडी वेगळी आहे. हा वारकरी उलट्या पायाने पंढरपूर गाठतो. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

या वारकऱ्याचे नाव आहे बापूराव... बापूराव हे पुणे जिल्ह्यातलील फुरसुंगीचे रहीवाशी आहेत. विठ्ठलाचे ते भक्त आहेत. आषाढी एकादशीला न विरसरा ते वारी करतात. आता पर्यंत त्यांनी 44 वाऱ्या केल्या आहेत. त्यात त्यांनी खंड पडू दिला नाही. पण यांची वारी करण्याची पद्धत इतरां पेक्षा थोडी वेगळी आहे. हे पायीवारी करतात. फुरसुंगी ते पंढरपूर हा त्यांचा पायी वारीचा मार्ग आहे. मात्र हे पायी वारी करताना सरळ चालत नाहीत. तर ते उलट्या पायाने चालतात. उलट्या पायाने चालतच ते पंढरपूर गाठतात. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - पापाचा घडा कोणाचा भरला? शिंदेंचे ठाकरेंना जशास तसे प्रत्युत्तर

आपण विठ्ठलाचे भक्त आहोत. काही तरी वेगळं केलं पाहीजे या भावनेतून आपण उलटे चालतो असेही त्यांनी सांगितले. या आधी आपण वैष्णव देवीला ही उलटे चालत गेले होतो असेही ते सांगतात. शिवाय वारीसाठी वेगळा पालखी मार्ग झाला पाहीजे या मागणीसाठी दिल्लीत जंतर मंतरवर आंदोलन केल्याचे त्यांनी सांगितले. ते वारीत उलटे चालत असल्याचे पाहून अनेक जण त्यांना भेटत होते. त्यांची चौकशी करत होते. उलटे का चालत आहात याची विचारणाही करत होते. बापूराव आषाढी एकादशी दिवशी पंढरपूरात पोहचतील. वारीला निघताना त्यांच्या खांद्यावर भगवा झेंडा त्यांनी घेतला आहे. तर गळ्यात विठ्ठलाची माळ त्यांनी घातली आहेत. भगवा वेश ही त्यांनी धारण केला आहे. शिवाय डोक्यावर विठ्ठलाच्या प्रतिमेचा मुकूट त्यांनी घातला आहे. गळ्यात माळ ही आहे. 

Advertisement