Baramati Bypoll 2026: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली असून आता निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट झाले आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेसाठी ही पोटनिवडणूक होत आहे.या निवडणुकीतून काँग्रेसने शेवटच्या क्षणी आपला उमेदवार मागे घेतला असला तरी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विरोधात आता 22 उमेदवार रिंगणात उरले आहेत.
या पोटनिवडणुकीसाठी 23 एप्रिल रोजी मतदान होणार असून 4 मे रोजी मतमोजणी केली जाईल. बारामतीचा गड राखण्यासाठी सुनेत्रा पवार रिंगणात असताना त्यांना इतर 22 उमेदवारांच्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे.
सुनेत्रा पवार यांच्याविरोधात कोणते 22 उमेदवार रिंगणात?
1. प्रा. आर वाय घुतुकडे - शिट्टी (न्यू राष्ट्रीय समाज पक्ष)
2. सतीश कदम - हिरा (हिंदुस्तान जनता पार्टी)
3. अभिजीत बिचुकले - टेलिव्हिजन (अपक्ष)
4. अविनाश गायकवाड - दोरी (अपक्ष)
5. करुणा मुंडे - एअर कंडिश्नर (अपक्ष)
6. गजानन पाटील - लिफाफा (अपक्ष)
7. चंद्रकांत मोटे - कॅमेरा (अपक्ष)
8. चंद्रकांत वाघमोडे - प्रेशर कुकर (अपक्ष)
9. दत्तात्रय बेडरे - सीसीटीव्ही कॅमेरा (अपक्ष)
10. बाळासो धापते - सफरचंद (अपक्ष)
11. रोहित भोसले - बॅट (अपक्ष)
12. मिथुन आटोळे - बुद्धिबळ (अपक्ष)
13. मंगलदास निकाळजे - फळांची टोपली (अपक्ष)
14. योगेश मोहन - बासरी (अपक्ष)
15. विजयकुमार भिसे - रोड रोलर (अपक्ष)
16. विराज शिंदे - गॅस सिलेंडर (अपक्ष)
17. शिवाजी कोकरे - ट्रक (अपक्ष)
18. सतीश सोनावणे - खाट (अपक्ष)
19. सागर भिसे - ट्रम्पेट (अपक्ष)
20. साजन अडसूळ - चहाची किटली (अपक्ष)
21. सीताराम रामदिवे - टॉर्च (अपक्ष)
22. सोनाली राणे - कपाट (अपक्ष)