स्वानंद पाटील, बीड: बीड पोलीस दलातील 26 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तक्रार सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केली होती. याप्रकरणी तृप्ती देसाई यांना पोलिसांकडून नोटीस देण्यात आली होती. आज तृप्ती देसाई स्वतः दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पुरावे घेऊन तृप्ती देसाई बीडमध्ये दाखल झाल्या. तसेच या नोटीसच्या अनुषंगाने तृप्ती देसाई पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन पुरावेही सादर केले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाल्या तृप्ती देसाई?
"जे 26 पोलीस अधिकारी वाल्मीक कराड यांच्या संपर्कात आहेत. काही कर्मचारी दहा वर्ष एकाच पोलीस ठाण्यात आहेत. तसेच काहीजण हप्ते गोळा करतात. याचे पुरावे पेन ड्राईव्हमध्ये आणले आहे. ज्या अधिकाऱ्यांना हे दाखवायचं आहे ते अधिकारी या ठिकाणी हजर नाहीत. त्यांना मात्र याचे गांभीर्य नाही पोलीस अधिकारी वाल्मीक कराड याच्या कर्मचाऱ्यांना पाठीशी घालत आहेत," अशी टीका तृप्ती देसाईंनी केली.
तसेच "अशा अधिकाऱ्यांची तातडीने बदली केली पाहिजे. अशी आमची मागणी आहे. मुख्यमंत्री गृहमंत्री पालकमंत्री यांना मागणी आहे. आता अधिवेशन चालू आहे तोपर्यंत यांना जिल्ह्यातून बाहेर काढून निलंबित करा. तरच बीड मधील गुंडाराज रोखू शकतो. जे चुकीचे पोलीस अधिकारी आहेत. त्यांना पाठीशी घालणारे अधिकाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला पाहिजे. तरच हे थांबले जाईल, त्यामुळे तातडीने यावर कारवाई केली पाहिजे.." अशी मागणीही तृप्ती देसाई यांनी केली.
(नक्की वाचा- "बरं झालं पक्ष फुटला…", सुप्रिया सुळेंचा धनंजय मुंडेंवर जोरदार हल्लाबोल)
"धनंजय मुंडे पालकमंत्री नसले तरी राष्ट्रवादी पक्षाकडेच पालकमंत्री पद आहे. अजितदादा मात्र या ठिकाणी दिसत नाहीत. दररोज एक घटना बाहेर येत आहे मात्र त्यावर अजितदादा काहीच बोलत नाहीत. आष्टीची घटना खोक्याची घटना अनेक घटना पुढे आल्या आहेत. इथला गुंडाराज थांबवता येत नसेल तर अधिवेशनात निर्णय होणे गरजेचे आहे. जी 26 पोलीस कर्मचारी आहेत त्यात बीड घटनेतील प्रमुख आरोपींना पळून जाण्यास मदत करत होता," असा आरोपही देसाईंनी केला.