अक्षय सावंत, बीड: बीडच्या जिल्हा मध्यवर्ती कारागृहात असलेला संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याच्या प्रकृतीबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. वाल्मीक कराडची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे बीड जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय पथकाने तातडीने त्याची तपासणी करण्यात आली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, वाल्मिक कराडची शनिवारी (ता. 26 ) अचानक प्रकृती बिघडली. त्याला दुपारच्या सुमारास अस्वस्थ वाटू लागले. त्याची प्रकृती बिघडल्याने जेल प्रशासनाने तातडीने त्याची दखल घेत डॉक्टरांना बोलावले. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांकडून त्याची तपासणी करण्यात आली. यावेळी डॉक्टरांनी त्याच्या रक्त चाचण्या करण्याचा सल्ला दिला. वाल्मिक कराडच्या रक्त चाचणीचा अहवाल आल्यानंतर त्याच्यावर पुढील उपचार केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
जिल्हा कारागृहात दाखल झालेल्या डॉक्टरांनी प्राथमिक तपासणीनंतर वाल्मिक कराडला रक्त चाचण्या करण्याचा सल्ला दिला आहे. विशेषतः त्याची शुगर वाढल्याचे निदान झाले असून, त्यामुळेच त्याला त्रास जाणवू लागल्याचे देखील डॉक्टरांनी सांगितले आहे. त्यामुळे आता त्याच्यावर रुग्णालयात वैद्यकीय देखरेखाखाली उपचार सुरू आहेत.
नक्की वाचा - Sharad pawar: 'महिलांना त्यांनी सोडलं, हिंदू म्हणून मारलं याबाबत माहित नाही' पवारांच्या वक्तव्याने...
दरम्यान, संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींबाबत आमदार सुरेश धस यांनी मोठी मागणी केली आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडसह सर्व आरोपींना वेगवेगळ्या जेल मध्ये ठेवा अशी मागणी भाजप आमदार सुरेश धस यांनी केली.. बीडचे जेल प्रशासन त्यांच्याबद्दल काही तक्रार निश्चित आहेत. काही पुरावे हाती येत आहेत. त्या बाबतीत पुराव्यासह तक्रार करणार आहोत.. इतर आरोपी हलवता आणि मोक्काचे आरोपी इथे ठेवता. संतोष देशमुख यांच्या खुन्यांना एका जागेवर ठेवू नये अशी मागणी आम्ही करणार असल्याचे सुरेश धस म्हणालेत.